महामायेचे थैमान: Page 5 of 12

असेल. पण एवढ्यानेहि त्याच्या थोरवीचे मंडण होणे नाही. तो एक श्रीमंत तरुण होता. बराच रंगेल होता. कोणाच्या आगीदुगीत फारसा पडणारा नव्हता. आपले काम, आपला दाम, आपली व्यसने आवांत संभाळून मोटारी उडविणारा एक उमदा जवान होता. इतकेच इंदोर सरकारला बगल मारुन बावलाच्या बगलेंत मुमताझ घुसण्यापूर्वी त्याने तीचा कोणत्या मुद्द्यावर स्वीकार केला असावा? ती काय अशी मोठी अस्मानाची परी होती, की शुद्ध प्रेमाची गंगाभगीरथी होती, की कोणी अनाथ अपंग होती म्हणून या धनाड्याने तिला आश्रय दिला? मुमताजच्या पूर्वाश्रमाचा सर्व इतिहास कळल्याशिवायच त्याने तिला आपल्या उंबरठ्यावर घेतले. या म्हणण्यात कांही अर्थ नाही. असे होणेच शक्य नाही. सदगुणांप्रमाणेच दुर्गुणांतहि एक प्रकारची चुरशीची अहमहमीका असते. राज्यक्रांती घडविणा-या वीराला जसे वाटते की मी अमक्या तमक्या राजाची राजधानी हस्तगत केली, त्याची गादी मी पटकावली, त्याचप्रमाणें वेश्यागमनी लोकांतहि अमक्यातमक्याची रखेल मी पटकवली म्हणून वहण्याची एक आसुरी अहमहमिका असते. ही बहुधा बिनधोक पचली जात नाही. हिच्यापायी खुनासारखे प्राणांतिक प्रकार अनिर्वायच असतात, हे न समजण्याइतका बावला खरोखरच बावळा असावा काय? होळकर सरकारला फसवून पळून आलेली मुमताज आपल्या घरांत घेताना, वरील आसुरी अहमहमिकेने बावला जरी क्षणभर फुरफुरला असला, किंवा तिच्या बरोबर असलेल्या लाखी डबोल्याच्या वासाला भुरळला असला, तरी या महामायेच्या मुळे पुढे मागे आपणांवर काही संकट येणे शक्य आहे की काय, याचाहि ज्याला काही विचार सुचला नाही, किंवा सुचला असल्यास जुमानला नाहीं, तो बावला एक तर मुमतजप्रमाणे धाडसी धूर्त असावा, नाहीतर मूर्ख असावा, यापेक्षा तिस-या कोणत्या संज्ञेत त्याला बसविता येईल? असेहि म्हणतात की मुमताजला बावलाने आश्रय दिल्यापासून त्याला धमक्यांची अनेक पत्रे येत होती; पण तीहि त्याने विचारांत घेण्याचे टाळले. यावरुन मुमताजच्या जीवाला जीव देण्याचा त्याचा आसुरी अहमहमिकेचा निश्चय वज्रप्राय दिसतो. अर्थात् असल्या व्यभिचारी लफड्याचा होणारा तोच अनिवार्य परिणाम झाला आणि मुमताजच्या जीवासाठी बावला आपल्या जिवाला मुकला ! विषाची परीक्षा पहाणा-याला मृत्यूशिवाय सुटका कोठली? सामान्य विचार करणा-यांना ‘हें असे होऊ नये‘ असे वाटते खरे आणि बावलाच्या दुर्दैवी प्राणान्ताबद्दल वाईटहि वाटते. पण खुद्द बावलाच जेथे काट्यावर धड टाकतो, तेथे तुम्हा आम्हा त्रयस्तांचा ऐदी विचार काय कामाचा? सारांश, ज्याला आपण ‘कल्चर्ड समाज’ [सुसंस्कृत समाज ] म्हणतो, त्याला न शोभेसे बावलाचे वर्तन होते. बाह्यात्कारी जरी जो मुंबई म्युनिसिपालटी कारपोरेशचा सभासद होता, तरी त्यांचे खासगी वर्तन निंद्य होते, असे म्हणण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. मुमताज त्याला पचली असती, तर आता उघडकीस आलेली त्याची सर्व व्यसने व व्यभिचारी कृत्ये पैशांच्या दमावर सफाईत झाकली गेली असती. मेल्या म्हशीला दूध फार या न्यायाने कोरुन उकरुन काढलेल्या त्याच्या कांही गुणांचे पोवाडे गाणे स्तुतीपाठकांना भागच आहे. पण सामान्यत: इतर रंडीबाज माणसापेक्षां बावलाला संस्कृतीच्या बाबतीत फारसे अधिक मार्क मिळणे शक्य नाही. या नाटकांतले तिसरे आणि विशेष निंदेला पात्र झालेले, किंबहुना काही हुल्लडखोर पोटभरू पत्रांना किफायतशीर झालेले पात्र म्हणजे श्रीमन्ममहाराज तुकोजीराव होळकर हे होय. सेशन कोर्टात आतापर्यंत झालेल्या उलट सुलट छाननीत, श्रीमंतानी मुमताजला दिलेल्या राजवैभवाची कल्पनाच नाही, राजेलोकांच्या राहणीची माहितीच नाही, ज्यांचा सारा जन्म ‘ये रे दिवसा भर रे पोटा‘ अशा दलमलीतच जाणारा, त्या लोकांना होळकरांनी मुमताजला दिलेला आश्रय ‘दोष’ वाटणे साहजिक आहे. होळकरानी मुमताजला काही पट्टराणी बनविली नव्हती! राजे लोकांच्या दिमतीत कितीक तरी अशा मुमताजा पडलेल्या असतात. ज्यांचे जोडे पुसणा-या हुज-यांच्या हातात सोन्याचे तोडे झळकतात, ज्यांच्या शौचकुपाच्या झाडूला विशेष आनंदाच्या प्रसंगी हजार हजार पांच पांच हजार रुपये केवळ बक्षिसादाखल मिळतात, त्यांनी मुमताजसारखीला लाखों रुपयांच्या जवाहिरांत गर्द गाडली तर त्यांत विशेष ते काय? माल जिचा जन्मच नुसता सैयामैयावर जायचा, तिला देवयोगाने होळकरांचा आश्रय ‘विशेष’ वाटणे साहजिक