महामायेचे थैमान: Page 11 of 12

आहेत, तसेच मात्रृगमन्यापासून तो थेट अव्वल ब्रह्मज्ञान्यापर्यंतची माणसेहि या मेनेजरीत आम्हाला ठेवावी लागतात.” मुमताजच्या थैमानात फांशी पडणारे पोंडे दिघे व हद्दपार होणारा फणसे, या तिघांखेरीज बाकीचे लोक एकजात लोफड दिसतात. या सर्वांनी महाराजांच्या “खुषी” चे काही तरी काल्पनिक चित्र रंगवून, त्यांच्या प्रसन्नतेवर स्वत:च्या ऐश्वर्याची परासीमा गांठण्यासाठी हा गुप्तकट रचला, आणि केवळ काट्यावर धड टाकावी तशी अचाट बुद्धी चालवून बळेंच लक्ष्मी मिळविण्याचा हा उपद्व्याप केला असे दिसून येते. या गुप्तकटाचे बातबेत ठरवितांना धाडसी कृत्यांचे सिनेमा चित्रपट त्यांना ब-याच अंशी उत्तेजक प्रेरक व स्फूर्तिदायक झाले असावे, असे अनुमान करण्यास पुष्कळ जागा आहे. अचाट धाडसांचे सिनेमे पाहतांना सर्वसामान्य माणसे आश्चर्य व कौतुक करतात ;पण उमेदवार व महत्त्वाकांक्षी तरुणांवर त्यांचा कसला भयंकर परिणाम होणे शक्य आहे, याचा विचारवंतानींच विचार करावा. एक चटक चांदणी मुमताज आणि तिच्या प्राप्तीसाठी धडपड करणारी कटवाल्यांची एक टोळीच असते. त्यात मोटारी असतात, आगगाड्या असतात, गुप्त भाषेचे टेलग्राम असतात, लग्नापूर्वी हुंडा ह शफी अहमद असते. दिसेंबरात ‘ कॉलेज जॉईन ‘ करण पोंडे असतो, नाशिक रस्या ‘फ्रूटस’ पाठविणारा तरणावाला असतो, नतनजान असते, मसणजान असते, सर्व काही असते.बावलाचा खून पाडण्यासाठी रचलेला हा ‘ मुमताजकट‘ म्हणजे नेहमी आपण पहातो तसल्या धाडसी कृत्यांच्या सिनेमापटाची हुबेहूब नक्कलच नाही काय सिनेमाने करमणुकीच्या साधनांत कितीहि भर टाकलेली असली तरी त्याचेहि दुष्परिणाम समाजाला कसे भोगावे लागत आहेत पहा. सेशन कोर्टात प्रत्येक मुद्द्याचा भूस नू भूस निघाला, पण त्यात मुमताज ही होळकरंची रखेली होती यापेक्षा अधिक कसलाही मुद्दा सिद्ध झाला नाही. सेशन जज्जांनी म्हटल्याप्रमाणे या सर्व कटाचे मूळ इंदोरातच आहे, हे खरे धरले, तरी त्या मुळाची पाळे खुद्द होळकर सरकारच्या बुटाच्या टाचेपर्यंत नेऊन भिडविण्याइतका कसलाहि पुरावा पुढे आलेला नाही. खुद्द महामायेच्या जबानीतहि तिने याविषयी एक अवाक्षर काढलेले नाही. फणशाच्या जबानीवरुन या सर्व कटाचा उगम, राजद्रोह व पैशाची अफरातफर या आरोपांवरुन इंदोरच्या तुरुंगात खडी फोडीत बसलेल्या शंकरराव गावड्यातच असावा, असे मानण्यास पुष्कळ जागा आहे. अर्थात या कटांत होळकर सरकारचा संबंध कसाबसा ओढूनताणून आणण्यात ऐदी गप्पीदासांना व बुभुक्षित पत्रकारांना जरी मोठ्या दीर्घदृष्टीचा व मुत्सद्देगिरीचा भास होत असला, तरी तो चुकीचा, गैरसमजुतीचा व बहुतांशी निवळ मत्सराचा परिणाम आहे, यांत मुळीच शंका नाही. हुज-याचा हौसहोल्ड ऑफिस बनलेला शंकरराव गावडे हाणजे इंदोरचा त्रिंबकजी डेंगळा हाटला तरी चालेल. प्याद्याचा फर्जी बनलेल्या या प्राण्याच्या हालचाली श्रीमंत तुकोजीरावांना माहीत नसाव्या, असे मानता येत नाही. नाकापेक्षा जड बनलेले हे मोती इंदोरांत एक जाडे धेंड होऊन बसले होते. पण पापाचे माप भरताच होळकर सरकारने या धेंडालाहि पेंड चारण्यास कमी केले नाही. लहानशा थोर व हुज-याचा खानगी कारभारी अशा महान् अधिकारावर चढविलेल्या शंकरराव गावड्यालाहि अन्यायाची परमावधि होतांच न्यायाच्या चरकांत बोलबोलता ताडकन् चिरडून भरडून काढणारे होळकर सरकार, मुमताजसारख्या चटोर रांडरुसाठी, शफी अहमद रिसालदार, मोटर ड्रायवर बहादुरशहा व अबदुल लतिफ, असल्या लोफड लोकांच्या कटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मान्यता देतील, ही कल्पना करणारे डोके फाजील कल्पक म्हणून सांदीत टाकलेले बरे ! आता अखेर ज्या महामाया मुमताज भवानीच्या छिनाल थैमानामुळे एक तरुण ठार मारला गेला, तिघे फांसावर चढले व चौघे हद्दपार झाले, तिच्या बुद्धिवैभवाची काकड आरती करुन हा निबंध समाप्त करु. जस्टिस कंप यांनी मुमताझविषयी असा अभिप्राय दिला आहे की “ या मुमताझचे शिक्षण जरी बेतास बातच आहे तरी जात्या ही कुशाग्र बुद्धिची असून तारतम्य जाणणा-या डोक्याची ( clear head ) आहे.” जिच्या पायी इतक्या जणांची डोकी मारली गेली, ती बाई डोक्याची नव्हे असे कोण म्हणेल ? असा कोटिक्रम सहज कोणाला सुचला तर तो निव्वळ विनोद न