महामायेचे थैमान

बावला मुमताज प्रकरणा त इंदौरचे तत्कालीन संस्थानिक तुकोजीराजे होळकर यांची बदनामी करण्यात आली. प्रबोधनकार तुकोजीराजेंच्या बाजूने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी तीन पुस्तकं लिहिली. प्रबोधनकारांच्या त्या बजरंगी सोट्या चे या पुस्तकात दर्शन घडते.

स्त्रियश्र्वरित्र .... देवो न जानाति. इमान ही एक मोठी अजब चीज आहे. इमानाचे वास्तवीक स्वरुप काय आणि त्याची खरी किंमत किती, याचा निश्चित निर्णय अजून कोणीच करु शकलेला नाही. पुष्कळ वेळा इमानाची किंमत कवडीमोल होते, तर कित्येक प्रसंगी जगातल्या सर्व संपत्तीलाहि त्याच्या मोलाचे माप मोजवत नाही. सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे, हा तुकारामाचा सिद्धांत खरा मानला; तरी एवढे कबुलच करावे लागेल की, जवापाडे का होइना पण सुख म्हणून काहीतरी अस्तीत्वात आहेच. जगाच्या व्यवहारात दुष्टांची संख्या पुष्कळ असली, तरी सुष्टांची संख्या थोडीतरी असंतच असते. तद्वतच बेइमान प्राण्यांच्या खटपटी व्यवहाराचा प्रवाह क्षणोक्षणी कितीहि विषारी बनवीत असल्या, तरी अल्पसंख्य इमानी प्राण्यांच्या उज्वल चारित्र्याची उदाहरणे खग्रास ग्रहणोत्तर चंद्रबिंबाप्रमाणे सर्व जगाचे लक्ष चटकन वेधण्याइतकी आकर्षक खास असतात.

नानांविध आधीव्याधींच्या रामरगाड्यात हरगडी रगडून निघणा-या मानवतेला बेइमानाच्या निखारावर पाय पोळून घेण्याचे प्रसंग वारंवार येत असले, तरी कधी काळीच का होईना, इमनाचा स्वगसुखतुल्य स्पर्श उपभोगण्याचा आनंद तिला मिळतोच मिळतो. वाईल ना वांडा असा एखादा एकांतवासिप्रय सडेसोट मनुष्य, व्यवहाराच्या कांटेरी बाजारात दिवसाची उदरनिर्वाहाची दलामल करुन घरी परत येताच, टाम्या कुत्र्याच्या त्या प्रेमदर्शक उड्या, त्याचे चाटणे, भुंकणे, अंगावर खेळणे, वगैरे इमानी प्रेमाचे प्रकार अनुभवून आपल्या सर्व व्यवहारक्लेषांना साफ विसरतो आणि कुत्र्यासारख्या पशूच्या सहवासातहि वर्णनीय सुखाचा आनंद अनुभवतो. पशुपक्ष्यादिकांतहि इमान फार बलवत्तर आढळतो. कित्येकांत तर एकपतिव्रत व एकपतिव्रत मनुष्यापेक्षा अधिक निश्चयी व कमाल अव्यभिचारी असे दिसते. कुत्र्यासारखा इमानी प्राणी दुसरा आढळत नाही. पण माणसात पुष्कळ वेळा कुत्र्याचे इमानसुद्धा मिळत नाही,म्हणून जगाचा व्यवहार दिवसेंदिवस कष्टप्रद होत आहे, असा कित्येकांच्या विचाराचा सूर वहात असतो. इमानाची देणगी देवाने कुत्र्यांनाच जास्त दिली आहे आणि माणसांना कमी दिली आहे; किंवा ती पुरुषांत अधिक आहे आणि बायकांत मुळीच नाही, असा वास्तविक प्रकार नाही.

गुणावगुणांचे प्रकटीकरण व्यक्तीमात्राच्या मनोवृत्तीवर होत असते. मानवी मन हा एक गूढ विषय आहे. वेळी इंद्रधनुष्याचे रंग मोजता येतील आणि त्यांचे बिनचूक पृथ:करणहि करता येईल. पण क्षणोक्षणी आजूबाजूच्या परिस्थितीशी आघात प्रत्याघाताचा अखंड व्यापार करणारे माणसाचे मन कोणत्या वेळी कसल्या रंगाची रंगपंचमी खेळेल याचा नेम नाही. मनाचा हा तरळपणा स्त्रियांना मात्र लागू आणि पुरुष तेवढे पार्थिव मनाचे, हा भेद बेइमानी अर्थात अन्यायाचा आहे. स्त्रीजात तेवढी बेइमान हा सिद्धांत ठोकणारा शेक्सपियर स्त्री नव्हता लक्षात ठेवावे. हॅम्लेट नाटक जर एखाद्या शेक्सपियर ने लिहिले असते, तर आँफिलियेच्या तोंडी ‘पुरुषजात तेवढी बेइमान’ असे वाक्य कदाचित घातले नसते कशावरुन? मनुष्य सिंहाचे चित्र काढतो किंवा पुतळा बनवतो, तेव्हा एका माणसाने आपल्या हाताने सिंहाचा जबडा उचकून त्याला चीत केल आहे, असा देखावा दाखवितो. उलटपक्षी सिंहाच्या तडाक्यात मनुष्य सापडला तर तेथे काय देखावा दृष्टीस पडतो ? हॅम्लेटच्या भूमिकेची पूर्णता करण्यासाठी शेक्सपियरने ‘स्त्रीजात तेवढी बेइमान’ हे वाक्य त्याच्या तोंडी घातले असले तरी ते सिद्दांत होऊ शकत नाही.

शेक्सपियरच्या सर्व नाटकात हीरो कोठेही नाही म्हटले तरी चालेल. त्याने आपल्या बुद्धीवैभवाचे सर्व जरतारी लेणे वास्तवीक हिऱॉइन्स वर उधळून, त्यांचीच चित्रे उदात्त भडक रंगात रंगवली आहेत, हे विसरता कामा नये. पुरुषांनी स्त्रियांवर बेइमानपणाचा आरोप लादणे; त्यांना ‘पायांतली रेटणे’ मानणे, त्यांच्या नाकात नथ, पायांत तोडे, हातात कांकणे घालणे, तोंडावर काही ठीकाणी गोंदणें वगैरे गुलामी चिन्हांनी त्यांना ‘क:पदार्थ’ ठरविणे, इत्यादि प्रकार पुरुषांच्या सत्तामदाचे व स्त्रियांच्या सहनशील मृदुल व अडाणी मनाचे घोतक असले तरी ते अन्यायी घाशीरामीचे