कुमारिकांचे शाप : Page 33 of 33

फटिंग गृहस्थाच्या मुलाचे लग्न व्हावयाचे होते. मुलाचे विद्याध्ययन अकटोविकटो. एका पुस्तकविक्याच्या दुकानी ‘सेल्समन’च्या हाताखाली हेलपाटी करीत असतो. मुलाच्या लग्नाबद्दल कोणी विचारले की हे चिंध्या पांघरलेले गृहस्थ त्याला पाच बोटे दाखवीत असत. टीप *६ – ‘मुलींना हुंडा देणे’ ही शब्दरचना मोठी फसवणूक करणारी आहे. मुलींना वास्तविक कोणीच हुंडे देत नसतो. तो देतात त्यांच्या नव-यांना. पण भाषासरणीतसुद्धा विपर्यास घुसून बिचा-या कुमारिकांना नसत्या आरोपात आणतो!