जुन्या आठवणी: Page 10 of 38

घेऊन पंडितजी मुद्दाम तेथे गेले होते. व्यासपीठावर वाद्यवृंद सूरबद लावून ठेवला होता. अध्यक्ष मौलाना महंमदअल्ली यांची स्वारी बॅण्ड वाजत्र्यांच्या दणदणाटात सभास्थानी येऊन स्थानापन्न झाली. पंडितजी आणि त्यांचे छात्रगण ईश प्रार्थनेसाठी पुढे सरसावले. वाद्यवृदांचा झंकार चालू झाला. काय झाले असेल ते असो! अध्यक्ष महाराजांचे पित्ता एकदम खवळले ते म्हणाले'' बंद करा ही वाद्ये, हे काय हिंदूचे मंदिर आहे तर हा जलाशाचा थाट? बंद करा.'' अध्यक्षांची ही डुरकणी अैकताच सारे सभाजन विस्मित झाले. महात्मा गांधी, देशबंधु दास प्रभृति मंडळी तेथे होती. पण एकाचीही छाती झाली नाही अध्यक्षांच्या प्रतिबंधाला विरोध करण्याची अथवा त्यांची समजूत घालण्याची. वाद्यांचे झंकार चालूच होत, ईशप्रार्थनेच्या संगीताच्या पाठपुराव्याला कोणीतरी धाऊन येतो की काय, याची आतुर डोळयाानी पंडितजी सभाजनांकडून अपेक्षा करीत टकमक पहात होते. वाद्यांचे झंकार थांबत नाहीसे पाहून महंमदअल्ली पुन्हा दटावणीत म्हणाले:-''काय हो, बंद करा म्हणून सांगतो ना? बंद करा'' थेट मऱ्हाठा वीरांच्या अवसानात पंडितजी खाडकन उठून उभे राहिले आणि (हिंदी) भाषेत आपल्या दणदणाटयाा आवाजात सभागृहाला उद्देशून म्हणाले-'' हिंदवी राष्ट्रसभेच्या मंडपात ईश प्रार्थनेच्या संगीताला मज्जाव? कोण राष्ट्रभिमानी हे सहन करील? अध्यक्ष म्हणतात, हे काय हिंदूंचे मंदिर आहे? मी त्यांना विचारतो, ही काय तुमची मशिद आहे? अध्यक्ष महाराजांना वाद्यांचा एवढा तिटकारा, तर बॅण्ड, चौघडे, वाजंत्री एवढी मोठी स्वताची मिरवूणक सभेच्या दारापर्यंत वाजत आली. तेव्हा कां नाही त्यानी प्रतिबंध केला? आता ईशप्रार्थनेच्या संगीताला प्रतिबंध? कोण मला प्रतिबंध करतो तेच आता पाहतो.'' असे म्हणून त्याच आवाजाच्या चढत्या टिपेत''जय जगदीश हरे'' या त्यांच्या पेटंट ईशस्तवनाला सुरूवात केली. पांच मिनिटेपर्यन्त हजारो सभाजनांचा तो प्रचंड जनसमूह पंडितजीनी नादमग्न डोलविला. वन्दे मातरम् गीताचे सूर काढताच सारी सभा तडाड उभी राहिली. राष्ट्रसभेच्या तीन दिवसात प्रारंभला ईशस्तवन आणि अखेर वन्दे मातरम् गीत पंडितजीनी नियमित गाऊन दाखवून, ते एकाद्या विजयशाली मऱ्हाठा वीराप्रमाणे हजारो लोकांचे धन्यवाद घेत घेत मुंबईला परत आले. जुन्या आठवणी 395 आठवण 5 वी ता. 7 नवेंबर 1942, शनिवार हिंदी माणसाची किंमत काय फक्त शंभर रूपये? - मिस आवडाबाई वंगबंग नि स्वदेशी चळवळीने हिंदुस्थानात राष्ट्रीय भावनेचा प्रसार केला. त्या पूर्वी विलायतेहून येणारा प्रत्येक गोरा अधिकारी नि व्यापारी हिंदी लोकांना जंगली समजत असे. कर्नल विल्सनची घोडयाांची सर्कस प्रथम मुंबईला आली. तेव्हा तोहि लेकाचा प्रत्येक खेळाला जाहीर बोंबलून सांगायचा की'घोडयाांकडून असली बुध्दीची कामे आम्ही गोऱ्या बृहस्पतीनींच करून घ्यावी. ते हिंदी आदमीचे काम नव्हे.' त्याची ही घमेण्ड कै. प्रो. विष्ण्ाुपंत छत्रे यानी जिरवली. मागची स्वाभिमानी पिढी आजकाल पुरोगामीपणाच्या वल्गाना केवढाही ताशेढोलवजा जोर चढलेला असला. तरी कोणत्याही क्षेत्रात नि कोणत्याही बाबतीत परक्यांची मुजोरी अथवा माजोरी लवमात्र न जुमानता त्यांचा जागच्या जागी हात धरून,' तूं करशील त्यापेक्षा आम्ही कांकाणभर अधिक काही तरी करून दाखवायला समर्थ आहोत' ही आमच्या गेल्या पिढीची स्वाभीमानी हिरीरी आजच्या मंडळीत फारशी दिसत नाही. सर्कस महटली की छत्रे यांचे नांव प्रामुख्याने पुढे येते. त्यांच्या मागून जगन्ननाथ गाडगीळ, डुबरेकर, पटवर्धन, शेलार, कार्लेकर, देवल प्रभृति अनेक नावे नामांकित आहेतच. पण ंहिंदी सर्कशीचा आद्यमान विष्णपंत छत्र्यांचा. छत्रे नांव आठवले का मिस आवडा या धाडशी बाईचे नांव कोणाला विसरता येणार नाही. अगदी लहानपणापासून या बाईने तारेवरील, घोडयाावरील, सायकलीवरील, झुलत्या बारवरील, त्याच्रपमाणें वाघ ंसिंहादि हिंस्त्र पशूंना खेळवण्याची अचाट धाडसाची प्रेक्षण्ाीय कामे करण्यात फार मोठा लौकीक मिळवला होता. तिच्या अंमदानीत या कामांत तिची बरोबरी करणारा फार मोठा लौकीक मिळवता होता. तिच्या अंमदानीत या कामांत तिची बरोबरी करणारा अगर करणारी एकही बुवा अथवा बाई पुढे आली नाही. तरूणपणी ती सडपातळ बांध्याची होती. मागाहून ती फार सुटली होती. तरी