जुन्या आठवणी: Page 9 of 38

लोकांना दाखवायला चोपा-ठोका -जमिनदोस्त करा'' इअित्यादी आणि वगैरे. एडवर्डस कमिशनरने सरसाहेबांच्या गाडीला कौशल्याने पोलिसांचा गराडा घातला, सरसाहेब शांत मुद्रेने कचेरीत गेले. अवघ्या पांच मिनिटातं ते कचेरीच्या बाहेर पायऱ्यांवर येऊन उभे राहिले. बाजूला सेठना आणि एडवडर्स उभे होते.लोकांनी ओरडायला सुरूवात केली. सरसाहेबांनी हात जोडले. पोलिस कमिशनरने 'एका एका' अशी धमकावणी देवून शांतता केली. सरसाहेब बोलू लागले.- ''लोकहो, होऊ नये ते झाले. डायरेक्टर या नात्याने अपराधाचा माझा वाटा पत्करायला हा मी तुमच्यासमोर उभा आहे. शीलापुढे माझ्या दौलतीचीच काय, पण प्राणाचीही मला पर्वा नाही. हे माझे बँकबुक आणि सही केलेले हे कोऱ्या चेकांचे पुस्तक मी लिक्विडेटर सेठनासाहेब यांच्या हवाली करीत आहे. हिस्सेरशीने जेवढी पैशांची जबाबदारी, डायरेक्टर नात्याने, माझ्यावर येत असेल, तेवढी रक्कम खुशाल त्यानी वसूल करून घ्यावी. कमी पडल्यास माझ्या इअितर इअिस्टेटीवर भागवून घ्यावी. आपण सगळयांनी मला क्षमा करावी.'' एवढा प्रकार होताच खवळलेला सगळा लोकसमूह आश्चयाने नि आदराने एकदम गहिवरून आला. टाळयाा कडाडल्या आणि सरसाहेबांच्या उदार चारित्र्याने धन्यवाद सगळया गिरगावांत नि मुंबईवर जो तो अभिमानाने गाऊ लागला. सर्व लोकांचे आदराचे नमस्कार घेत घेत गाडीत बसून सरसाहेब घराकडे परत गेले. जुन्या आठवणी 393 आठवणी 4 थी ता. 17 ऑक्टोबर 1942 शनिवार ''ईश प्रार्थनेला बंदी? कोण करतो ते मी पाहतो.'' -पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर जलसा म्हणजे कोल्हाटणीचा तमाशा! कै. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर याच्या गांधर्व महाविद्यालयाचे निशाण मुंबई शहरांत फडकू लागेपर्यंत सगळया लोकांची हीच समजूत होती. कुलीन स्त्रियांनी गायन वादन कलांचा व्यासंग करणे, हेसुध्दा महापाप समजले जात होते.'क्वचित् गानी पतिव्रता' हा आमच्या शास्त्रपुराणांचा दण्डक! पंडितजीनी या दोनही समजुतीचा बाष्कळपणा आपल्या कडव्या नीतिमत्तोने आणि विद्यालयाच्या नैतिक शिस्तीने पार धुडकावून, जलसा शब्दाला अभिवादनीय लोकमान्यत्व दिले आणि गायन वादन नर्तन कलांतील कुलीन स्त्रियांचा नष्ट झालेला अभिजात अधिकार पुन्हा प्रस्थापित केला. या बाबतीत लोकमताला अनुकूल कलाटणी देण्याचे महान् कार्य महाराष्ट्रांत पंडितजीनीच प्रथम केलेले आहे. मुंबईतील मोठमोठया नामांकित सरकारी अधिकाऱ्यांच्या, बॅरिस्टर जज्जादि नागरिकांच्या सुना मुलींच्या गायन वादनाचा जाहीर जलसा तिकिटे लावून, गांधर्व महाविद्यालयाच्या इअिमारतीत करण्याच्या जाहिराती प्रथम जेव्हा फडकल्या, तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा केवढा तरी धक्का बसला. धोबी तलावावरील (जुन्या) फ्रामजी कावसजी हॉलमध्ये शेकडो जाहीर जलसे करून गायन विद्येची महति पंडितजीनी आधीच विलक्षण लोकप्रिय केलेली होती. तशात त्यांचे ऋषितुल्य शील नीतिमत्ताा शिस्त आणि कडवा करारी बाणा, यांच्यापुढे ते आश्चयाने नि आचंब्याने ढगार आरपार वितळून गेले. तिकिटे भराभरा खपली. त्यांचे भाव वाढले. अखेर 'जागा नाही' म्हणून पुष्कळ लोकांना परत जावे लागले. हो, थोरामोठयाांच्या सुना मुली जाहीर जलशांत गाणार! हे त्यावेळी केवढे तरी मोठे आश्चर्य नि आकर्षण! या जलशांत पंडितजींचे गुरूवर्य कै. इअिचलकरंजीकर बाळकृष्णबोवा यांच्या गायनाचा कार्यक्रम सुरुवातीला ठेवला होता. कुलीन स्त्रियांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंडितजीनी फार सुंदर भाषण केले. त्याचा मतितार्थ असा-''गायन, वादन, नर्तन कला प्राचीन काळी आमच्या देवघरांत नि माजघरांत वावरत असत, पूजल्या जात असत, त्या आमच्या संसाराचा अलंकार असत. पुढे त्यांना आम्ही घराबाहेर हुसकावून लावल्या. हिंदूच्या स्त्रिया घराबाहेर पडल्या, म्हणजे त्याना मुसलमानच पळवितात. गायन वादन विद्येचे असेच झाले. त्या परमपवित्र विद्येला गांधर्व महाविद्यालय आज सन्मानाने परत आणून त्यांची या देवघरांत पुन्हा स्थापना करीत आहे.सर्व सज्जनांचे आशिर्वाद असावे.'' बाळकृष्णबोवांचे डोळे पाण्याने भरून आले. पंडितजीनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. बोवांनी आशिर्वाद दिला. त्यांचा कण्ठ भरून आला नि उपरण्याने त्यानी आपले डोळे पुसले. श्रोत्यांत टाळयाांचा कडकडाट उडाला. त्या रात्रीचा जलसा तर रंगदार झालाच, पण पुढे 'लोकग्रहास्तव' त्याच्या अनेक आवृत्तया विद्यालयांत झडल्या. पंडितजींचे खरे सात्विक तपश्चर्येचे आत्मतेज चमकले कोकोनाडाच्या काँग्रेसच्या प्रचंड मंडपात. सर्व बालगोपाल शिष्यगणांची सेना