जुन्या आठवणी: Page 8 of 38

not? If god so wills,) अखेर तसेच झाले. जुन्या आठवणी 391 आठवणी 3 री शनिवार ता. 10 ऑक्टोबर 1942 ''शीलापुढे मला प्राणाची पर्वा नाही'' -सर भालचंद्र भाटवडेकर प्लेग इअिन्फ्लुएन्झाच्या साथीप्रमाणेच छोटया मोठया बँक बुडण्याच्या साथी मुंबईने पुष्कळ अनुभवल्या आहेत. द्वारकादास धरमसीच्या खुनाने अथवा आत्महत्याने (हे गूढ कधीच सुटलेले नाही!) त्यांच्या पेढीचे दिवाळे वाजले, तेव्हा तर सारी मुंबई इअितकी हादरली की त्या हादऱ्यापुढे स्पीसी बँकेचे बळजबरीने दिवाळे आणि पाठोपाठ 10-15 दिवसांतच शेट चुनिलाल सरैयांच्या आकस्मिक मृत्यूच्या मुकाबल्याचा हादरा काहीच नव्हे. साल अंदाज 1912-13 असावे. जाफर जूसब नावाच्या इअिसमाने चालविलेल्या क्रेडिट बँकेचे एकाकी दिवाळे वाजले. लोकांत त्याची चर्चा चिकित्सा होते न होते तोच गिरगांवात दक्षिणी मंडळानी चालविलेल्या बाँबे बॅंकिग कं. लि. ने अचानक एक दिवस आपले दरवाजे बंद केले. बँकांची दिवाळी स्पर्शजन्य रोगांसारखीच असतात आणि ही साथ केव्हा येईल त्याचा नेम सांगता येत नाही. एकदा ती आली का मग बँकाच्या क्षेत्रांत कोठकोठे कसे नि कसले सुरूंग धडाधड उडतील ते उमगणे कठीण जाते. सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे मुंबईचे एक सुप्रसिध्द नामांकित डॉक्टर आणि नागरीक पुढारी होत. त्यांच्यासारखा लोकहितवादी,गरीबांचा कनवाळू आणि मागासलेल्या नि पुढारलेल्या समाजांत सरमिसळ दिलदाराने मिसळणारा 'जण्टलमन' माझ्या तरी पहाण्यात दुसरा नाही. सरसाहेबांचे चरित्र, चारित्र नि शील गंगाजळासारखे निर्मळ असे, त्यांची शुध्दता राखण्यासाठी पडेल तो स्वार्थत्याग करायला ते मागेपुढे पहात नसत. त्यांची डॉक्टरी प्रॅक्टीस हजारो रूपयांची होती. तरी गोरगरिबांना मोफत औषधे आणि मोफत व्हिजिट्स देण्यातहि सरसाहेबानी फार मोठी जनसेवा बजावलेली आहे. सन 1892 ते 1909 पर्यंत मुंबई शहरांत बोकाळलेल्या लुटारू सोनेरी टोळीकडून डॉक्टर भालचंद्रांना फसवून, कचाटयाात पकडून लुबाडण्याचे अनेक धाडसी यत्न गोल्डन गँगवाल्यांनी केले. त्या रोमहर्षक कथा त्यांचे वडील बंधू कै. तात्यासाहेब यानी 'मनोरंजन' मासिकात छापलेल्या आहेत. डॉ. भालचंद्राचे नैतिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच अलोट चमकत असे. अर्धचंद्राकृति गंध लावलेला त्यांचा तो शूचिर्भूत धीरगंभीर आणि आंनदी चेहरा पहाताच रोग्याचा अर्धारोग आपोआप बरा होऊन, त्याला आरोग्याचा आत्मविश्वास उत्पन्न व्हायचा. सरसाहेब मवाळांत मोडत असत. तथापि त्यांची जनसेवा आणि शील तत्कालीन अनेक मवाळाग्रणीपेक्षा किती तरी उच्च दर्जाचे असे, हे मी स्वानुभवाने म्हणू शकतो. सर भालचंद्र बाँबे बँकिंग कंपनीचे एक डायरेक्टर. तशात बँकेचे एकाकी बारा वाजले. पुष्कळ वर्षे ही बँक पालव रोडवर सध्या कोल्हापूरी संगीत चिवडेल्याचे हॉटेल आहे. त्या नाईक बिल्डिंगच्या माडीवर होती. (ऑन. गोखले मुंबईला का याच जागेत त्यांचा मुक्काम असायचा.) दिवाळयााच्या वेळाला, सध्या ऑनेस्टी कंपनी आहे. त्या इअिमारीतीत ही बँक गेली होती. भागीदारांचा नि ठेविवाल्यांचा या इअिमारतीला गराडा पडला. माझ्यासारख्या रिकामटवळयाा बघ्यानीही त्या गर्दीत भरत घातली, पोलीस कमिशनर मि. एस्. अ्म. एडवर्डस यांनी स्वत: पोलिसपार्टीचा बंदोबस्त कडेकोट ठेवला होता. बँकेचे सरकारी 'कर्मनिपटयो' (लिक्विडेटर) मे. सेठना आणि त्यांची कारकून सेना कागदपत्रांच्या ढिगारांत उंदरासारखी धडपडत होती. बॅकांच्या दिवाळयााच्या वेळी डायरेक्टर लोक हाफिसाकडे फिरकण्याचा पराक्रम सहसा करीत नाहीत. कारण खवळलेला जनसमूह कोणत्या वेळी काय करील, याचा नेम नसतो. बँकांचे काय ंकिंवा विमा कंपन्यांचे काय, डायरेक्टर म्हणजे नुसते गुळाचे गणपति असतात. प्रत्यक्ष व्यवहाराशी त्यांचा कसलाच संबंध बेत नाही आणि वेळी दिवाळे वाजलेच तर ते कशाने वाजले याचा त्यांना काही अंदाज नसतो. सारे नुसते अडवणीवरचे असतात! पण सर भालचंद्राचे गाडेच न्यार!''बँक बुडाली. दक्षिण्यानी चालविलेली बँक बुडाली लोकांचे नुकसान झाले. दाक्षिणत्यांचीं व्यापारी पत गेली. मी तिचा एक डायरेक्टर, ऑफिसकडे जाऊन मला चौकशी केलीच पाहिजे. '' असे निश्चयाने ठरवून, सर भालचंद्र बँकेच्या कचेरीकडे निघाले. त्यांची गाडी पाहतांच लोकांनी आरडयााओरडयााला सुरुवात केली. शिव्याश्रापांचा हलकल्होळ उठवला. '' आले साले हे डायरेक्टर आपले काळे तोंड