जुन्या आठवणी: Page 7 of 38

अंतर शिल्लक राहिले आहे. मध्यरात्र काय नि पहाट काय, या सगळया मानायच्या गोष्टी आहेत. लंडनबरोबरच हिंदुस्थानचे बारा वाजले अथवा वाजवले, तर इअिंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्या जिवस्य कंठस्य दोस्तीचे ते एक ठळक उदाहरण हाईल आणि आज येथे स्वराज्याच्या प्रश्नावर जो राजकारणी बाधा पडला आहे तोसुध्दा, मला वाटते, या घडाळयाच्या राजकारणाने अथवा राजीकरणाने सुटण्याचा संभव आहे. शिवाय उजाडताच आमचे बारा वाजू लागले, तर जुन्या मऱ्हाठशाही आणि पेशवाई टाइअिमाचा जीर्णोध्दार केल्याचेही पुण्य सरकार आणि जनता यांच्या पदरी पडेल. इअिंद्रप्रस्थाच्या उत्तुंग विधिमण्डळात घुसलेल्या आमच्या देशी चाणक्यानी हा घडयााळाच्या राजकारणाचा नाजूक प्रश्न तेथल्या खलबतखान्याच्या खलबत्तयांत खलून पहाण्यासारखा आहे. जुन्या आठवणी 389 आठवणी 2 री} { 23 सप्टेंबर 1942, बुधवार ''का नाही? ईश्वर करील तर तसेहि होईल!'' - सर फिरोजशहा मेथा मुंबई म्युनिसिपालीटीच्या समोर सर फिरोजशहा मेथा यांच्या पुतळयााच्या चौथऱ्याभोवती कठडयााचा कंपाउण्ड आहे, ती जागा म्युनिसिपालटीची इअिमारत बांधली तेव्हापासून किती तरी वर्षे रिकामीच होती.सभोवार लोखंडी कठडा आणि आतल्या जागेवर गवत वाढलेले,तर कधि ते कापलेले. आजूबाजूला मोठमोठयाा प्रेक्षणीय इअिमारती झाल्या तरी तो रिकामा कंपाउण्ड तसाच पडून होता. ही रिकामी कठडा घातलेली जागा ठेवली आहे तरी कशाला? असा ज्याला त्याला मोठा आचंबा वाटायचा, लहानपणी पनवेलहून मी मुंबईला यायचा तेव्हा कोटातल्या बाल भटकन्तीत ही जागा पाहून मलाहि तसेच वाटायचे एकदा- असेन त्या वेळी मी 13-14 वर्षाचा- मी तेथल्या शिपायला विचारले,'' काहो, ही रिकामी कठडयााची जागा कशाला ठेवली आहे?'' शाळेत जाणारा एक पोरगा दुपारच्या वेळेला एकटा भटकतांना पाहून त्या शिपायाने मला सांगितले''शाळा सोडून जी पोरं कोटात उनाडक्या करायला येतात. त्याना येथे कोडून ठेवतात. हा उनाड कोंडावाडा आहे.'' साल काही बरोबर आठवत नाही पण सन 1900 नंतर केव्हा तरी कोल्हापूरच्या छत्रपति शाहू महाराजानी मुंबई म्युनिसिपालटीकडे छत्रपति शिवजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाासाठी त्या जागेची मागणी केली होती. एक लाख रूपये रोख म्युनिसिपालटीला देऊन, स्वताच्या खर्चाने मी शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभा करतो. म्युनिसिपालटीने परवानगी द्यावी अशी ती मागणी होती. फिरोजशहा मेथानी त्या मागणीचा विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते.''छत्रपति शिवजी महाराज मला वंद्य आहेत. ते त्रिभुवनवंद्य आहेत. पण त्यांचा मुंबईशी सबंध काय? मुंबईच्या नागरिकी जीवनाशी ज्यांचा निकटचा सबंध असेल, त्याच थोर लोकाग्रणींचे पुतळे मुंबईच्या शहरांत मुंबई म्युनिसिपालटी स्वताच्या खर्चाने अथवा सार्वजनिक वर्गणीने उभारले पाहिजेत. इअितरांचा या शहरांशी सबंध काय मुळी?'' फिरोजशांचे वक्तृत्व म्हणजे महांकाळी तोफच ती! एकदा धडधडाट सुरू झाला का सारे प्रतिस्पर्धी चकाणाचूर जागच्याजागी थंडगार पडायचे! शिवाजीच्या पुतळयााचा ठराव फेटाळला गेला. पुढे पंचम जॉर्ज बादशहांच्या राज्यभिषेकाचा योग आला. त्यावेळी-सध्या म्यूझियमच्या आवरात जो'सेलर ंकिंग'(खलाशी राजा) म्हणून बादशहाचा पुतळा उभा आहे तो विलायतेहून इअिकडे आणविलेला होता. तो पुतळा म्यनिसिपालटी समोरच्या त्या रिकाम्या जागेवर उभा करावा,असा काही मेंबरांनी बेत केला आणि तसा कार्पोरेशनमध्ये ठरावहि आणला त्याला तर फिरोजशहानी फारच कडाक्याचा वाद करून विरोध केला.''मुंबईच्या नागरी जीवनाशी बादशहांचा संबंध काय? पंचम जॉर्ज असतील भरतखंडाचे बादशहा पण त्यानी मुंबईच्या नागरी जीवनासाठी काय केले आहे?'' ठरावावर मते घेतां ती समसमान पडली. प्रेसिडेण्ट नात्याने सर फिरोजशानी नकाराच्या बाजूला आपले जादा मत (कास्टींग व्होट) टाकून ठराव फेटाळला. त्यावर सर दिनशा एडलजी वाच्छा संतापून उठले नि म्हणाले''काही वर्षांपूर्वी छत्रपति शिवाजीच्या पुतळयााचा ठराव आला होता. त्याला सर साहेबांनी विरोध करून तो फेटाळला. आज प्रत्यक्ष आपल्या सार्वभौम बादशहाच्या पुतळयााचा ठराव आला. तो सुध्दा मेथांनी खाली पाडला. मग त्या कंपाउण्डात स्वताचा पुतळा त्याना उभा करायचा आहे की काय? फिरोजशहा ताडकन उठले आणि ठासून म्हणाले,'' कां नाही? का नाही? ईश्वर करील तर तसेही होईल.'' (Why not? Why