जुन्या आठवणी: Page 6 of 38

अगोदर घडू लागले. राजा बोले नि दळ हाले ही पूर्वी नुसती एक म्हण होती. पण ती आता आपण प्रत्यक्ष अनुभवीत आहोत. 'सरकार बोले नि काळ डळमळे' हा प्रकार मात्र मोठा मनोरंजक खरा. सूर्यचंद्राची चैन-पण कारकुनांची? या नवा सरकारी टाइअिमाने सूर्य चंद्रावर एक प्रकारे मोठा उपकार केला असे म्हणावे लागते. साडेसहाला उगवणारा सूर्य आता साडेसाताला उगवतो आणि एक तास उशीरा मावळतो. काय बहादुर आमच्या सरकारची ही सÙkा! लेखनीच्या फटकाऱ्याने त्यानी सूर्य चंद्रादि ग्रहांना कामावर एक तास उशीरा येण्याची सवलत दिली. पण बेटयाा कष्टाळू नोकरीवाल्या कारकुनाचा मात्र एकतास लवकर धावपळ करायला लावले! लवकर यावे-उशीरा जावे अधिक उजेड देणाऱ्या नव्या टाइअिमच्या उजेडाचा फायदा नोकर वर्गापेक्षा सरकारला आणि भाण्डवलबाज देशी व्यापारी कंपन्यांना मात्र चांगला फळफळला. गुमास्ता कायदा झाल्यामुळे नोकरांना 8 ते 10 तास राबण्याच्या त्यांच्या धनिकपणाच्या हक्कांवर बिब्बा फासला गेला होता. तरीसुध्दा त्या कायद्याने अधिकात अधिक नेमलेले कामाचे तास नोकरांकडून पिळून मळून घ्यायला ते कमी करीत नव्हेतच. एका अपटूडेट फॅशनवर चालविलेल्या गुजराथी मालकाच्या विमा कंपनी हापीसांत बोर्डावर अशी नोटीस लावलेली आहे- जुन्या आठवणी ''पुढे सूचना होईपर्यन्त नोकर लोकांना रविवारची सुट्टी देण्यात येत आहे.'' याचा स्पष्ट अर्थ, गुमास्ता कायद्याखाली या कंपनीला दण्ड होईपर्यंत तेथच्या कारकुनादि पांढरपेशा हामालाना रविवारचीसुध्दा सुट्टी मिळत नसे. आत तर मायबाप सरकारच्या महाकृपेने घडîkाळेच एकतास पुढे सरकली. तेव्हा 'लवकर यावे नि उशीराने जावे' हा संभावीत खाक्या अनेक देशी व्यापाऱ्यांच्या कंपन्यात चालू झाला आहे. उजेडाच्या सबबीवर नोकरांना जास्त तास राबवले तरी ते बिचारे पोटभरू कशाला कोणाकडे मरायला तक्रार करणार? साडेसात तासांवर केलेल्या जादा कामाच्या वेतनाच्या बळजबरीच्या पावत्या लिहून घेतल्या का बसला तो गुमास्ता कायदा कंपनीच्या इअिमारतीच्या धाब्यावर! सारांश मुंबईच्या कोर्टात इअिंग्रजी दिमाखावर थाटलेल्सा बहुतेक देशी व्यापाऱ्यांच्या कंपन्यांना या अधिक उजेड देणाऱ्या टाइअिमाचा उÙkम फायदा घेता येत आहे. बिचारे नोकर हापिसांत जरी एकतास आधी गेले, तरी घरी परतण्याला त्याना अंधारातच वीजगाडîkा शोधव्या लागतात. तेव्हा नव्या सरकारी स्टॅण्डर्ड टाइअिमाची,जादा उजेडाची जाहीर झालेली सबब अथवा सवलत कोण भाग्यवान उपभोगतो, हा सुध्दा इअितिहास संशोधना इअितकाच प्रश्न होऊन बसला आहे. नव्हे का? पंचांगे नि ज्योतिषी यांची तिरपीट. नव्या टाइंमाने सूर्य चंद्राला नोटिसाचे पोटीस लावलेच आहे. पण ग्रहणे वर्तविणाऱ्या पंचागांची अंगे आरपार ठेचाळून त्यांच्या ग्रहगतीना आणि समुद्राच्या भरत्या ओहोटयााना ग्रहणे लावली आहेत. वजाबाकी बेरजेच्या अंकगणिताशिवाय आता कोणत्याही ज्योतिष्याची धडगत नाही. ता. 1 सप्टेंबर 1942 नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या जन्मवेळा मुंबई स्टॅण्डर्ड का नवे सरकारी लष्करी टाईम, याचा खुलासा झाल्याशिवाय, ज्योतिष्याना आता कुंडल्या मांडायची पंचाईत पडू लागली आहे. याशिवाय पंचांगे लिहून तयार करणाऱ्या पुरंदऱ्यादि गणकांवर तर मोठीच आपित्ता आली. ज्यांनी पुढील सालच्या पंचांगांतले सेगळे रकाने मुंबई अथवा जुन्या स्टॅण्डर्ड टाइअिमाप्रमाणे लिहिले अथवा छापले असतील, त्यांना ते सारे आकडे मुंबई टाइअिमात 1 तास 39 मिनिटे आणि स्टॅंण्डर्ड टाइअिमांत एक तास अधिक मिळवून बदलण्याची रिकामटेकडी कारकुनी करावी लागणार. लंडनबरोबर हिंदुस्थानचे 12 वाजविण्याचे महत्वाचे राजकारण निरनिराळया देशांतली घडयाळे तेथल्या सूर्योदयावर बसविलेली असतात आणि आहेत. पण ब्रिटीश लोकांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नसल्यामुळे, त्यानी आपल्या देशांतल्या ग्रिनिचच्या मध्यरात्रीनंतर अंकित भारताचे घडयााळांचे काटे बदलून टाकले आणि पुढेही ते टाकतील. सत्तााधीशाना अशक्य असे काय असते? ग्रिनिचला मध्यरात्री 12 वाजले, म्हणजे- न्यूयॉर्कला रात्रीचे 8 वाजतात. मॉस्कोला पहाटेच 4 वाजतात. कायरोला पहाटेचे 3 वाजतात. केपटाउनला रात्रीचे 2 वाचजतात. चुंकिंगला सकाळचे 7 वाजतात. सिडनेला (ऑस्टे्रलिया) सकाळचे 10 वाजतात. हिंदुस्थान, दिल्ली सकाळचे 6-30 वाजतात. म्हणजे ग्रिनीचच्या मध्यरात्रीच्या 12 ला उजाडताच आमचे साडेसहा वाजतात. आता लंडनच्या बारांत आणि आमच्या घडयाळयात फक्त साडेपांच तासाचे