जुन्या आठवणी: Page 38 of 38

रंगभूमीवर आले तर मला ते पहाण्याची फार इअिच्छा आहे. प्रत्यक्ष भेटीसारखाच योग असतो तो.'' स्वताचे सोंग पाहून टिळकाना गोपाळराव आगरकरांची आठवण झाल्याचे ऐकून श्रोतृवृंदाला गहिवर आला. टाळयाांच्या कडकडाटात टिळक घरी परत गेले. 'आठवणी'च्या मागील कव्हरवरील तत्कालीन जाहिरात जातीयवादाने मरहाठयाांचे स्वराज्य कसे ठार मारले? फिरंगी बोका आमच्या घरात कोणी नि कसा घुसवला? मऱ्हाठदेशी क्रांतिकारकांचे सारे यत्न वाया कां गेले\ प्रबोधनकार ठाकरे कृत प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी हा 616 पानी अस्सल पुराव्यानिशी लिहिलेला दणदणीत इअितिहासग्रंथ वाचा, मनन आणि नव्या विवेकाने संयुक्त महाराष्ट्राची आघाडी तयार करायला अस्सल शिवशाही मऱ्हाटी बाण्याने सज्ज व्हा. अनेक जुने फोटो, देखाने, चित्रे नकाशे. िकंमत रुपये 10 मनिऑर्डरीने पाठवून मागणी केल्यास ग्रंथ रजिस्टर्ड बुकपोस्टाने रवाना होईल. मागवण्याचा पत्ताा.-- केशव सीतारात ठाकरे, जोशी बिल्डिंग, रानडे रोड, एक्स्टेन्श मुंबई नं 28. जुन्या आठवणी कि. 2 रुपये म.ऑ. पाठविणारास रजि. बु. पो. ने. तात्काळ रवाना.