जुन्या आठवणी: Page 31 of 38

तपास करतात तो काय! खांसाहेब डब्यात नाहीत! घाबरले बिचारे. सगळे डबे तपासले. पोलीसांना खबर दिली. दादर ग्रांटरोडपर्यंन्त रेल्वे अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाली. काहीच पत्ताा लागेना. छत्र्यांच्या छावणीत पोलिसांनी ही बातमी नेताच मोठीच धापवळ नि धामधूम उडाली. मुंबईचे पोलीस, रेल्वेचे पोलीस, साष्टीचे पोलीस, यांच्या सेना रातोरात तपासाला निघाल्या. काशीनाथपंत सबंध रात्रभर जिकडे तिकडे टेलीफोन करीत जागत बसले. सर्कशीतले लोकसुध्दा तपासासाठी भराभर बाहेर पडले. त्या रात्रीचा सर्कशीचा खेळ बंद पडला. मुंबईत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच बोलवा- ''छत्र्यांचे रहिमतखां एकाकी बेपत्ताा.'' दुसऱ्या दिवशीची स्थानिक दैनिके ( टाइअिम्ससकट) मोठमोठयाा मथळयाांनी बाहेर पडली. खांसाहेबांचा पत्ताा लावून देणाराला एक हजार रुपयांचे बक्षिस काशीनाथपंतानी जाहिर केले. सगळीकडे हाहाकार उडाला. एक दिवस नि दोन रात्री अशाच विवंचनेत गेल्या. पत्ताा नाही. खुद्द खांसाहेबांची वृत्तिा पहावी तर आधी अफीणधुंद कोणाची धड बोलतील विचारतील सांगतील, असे काहीच नाही. पाय नेतील तिकडे जायचे नि कोठेतरी बैठक ठोकायची एवढेच त्यांना माहीत. विलेपार्ले त्या वेळी जवळ जवळ जंगल होते. वसती झालेली नव्हती. एका पहाटेला शेतकरी कामाला जात असताना, एका झुडपात कोणी त्याला गुणगणत असल्यासारखे वाटले. भीतभीत जवळ जाऊन पहातो तों एक म्हतारा दाढीवाला, चांगला जामानिमा केलेला, शेजारी मोठी चमकदार जरीची टोपी पडलेली. डोळे मिटून गाणे गुणगुणत आहे, असे दिसते, त्याने गावांत येऊन बोंब केली. पोलीस धावले. मुंबईला फोन झाले. स्वता काशिनाथपंत आणि त्यांची मंडळी धावली. ओळख पटली. काशिनाथपंतानी हाक मारताच स्वारीने डोळे उघडले आणि जसे काही कोठेच काही झाले नाही अशा बेदरकार वृत्ताीने हासत हासत विचारले,'' देख छोटे भैय्या, ए हमारे नोकर बिलकुल बेहय्या है. दोन रोज हुवे मेरे डिब्बीभि नाहि दिया उन्ने. क्या आपने लाया है मेरी डिब्बी?'' काशिनाथपंतानी चटकन डबी पुढे केली स्वारीने एक गोळी टाळयााला चिकटवली आणि मुकाटयााने पंतांच्याबरोबर मुंबईला परत आली. दोन दिवस काय करीत होता म्हणून विचारले, तर उत्तार दिले,-'' गाना चलता था. बहोत मजा आई. सबलोक खूष हो गये.'' काशिनाथपंतानी त्या शेतकऱ्याला नि तपासाच्या कामी मदत करणाऱ्या सर्व मंडळींना रोख रखमा वाटल्या. जुन्या आठवणी 432 आठवण 17 वी जी. आय. पी. रेलवेच्या काही जुन्या गमति. (पाहिलेल्या अैकलेल्या नि वाचलेल्या) कमाल आहे बुवा या इंग्रेजांची! मुंबई प्रांतात रेलवे असावी असा ठराव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजिभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यानी केला. मूळजी जेठा, मोरारजी गोकूळदास आदमजी पीरभाई. डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेटजींचे अर्थात त्यांना पाठबळ होते. सन 1853 त ग्रेट इअिंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून विंग्रज आगीन गाडी चालवणार, ही कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याची वाटली. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लाऊन 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इअिंजिनावर आंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यांत गादीच्या खर्ुच्या. कोच. त्यांवर रेलवेचे डायेरेक्टर, सर जमशेटजी जिजिभाई, नाना शंकरशेट आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखावर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पहायला आ वासून उभे होते, ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करीत लोखंडी रुळांवरून! कमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आधीच, आंग्रेज लोक म्हणजे सीता रामाच्या वरदानाने हिंदुस्थानावर राज्य करायला आलेली लाल तोंडाची वानरे. त्यांच्यापुढे कोणाचे काही चालायचे नाही, अशा थापा क्रिस्ती मिशनऱ्यानी