जुन्या आठवणी: Page 4 of 38

यजमान, पत्रपंडित वद्यहाडी 412 11 स्थिप्रज्ञ काशीनाथपंत छत्रे 416 12 नट कृष्णराव गोरे (कर्तव्यनिष्ठा) 419 13 1894 चा दुर्गादेवी दुष्काळ 422 14 सर फिरेजशा मेथा(बेस्ट कं. वर बहिष्कर) 424 15 सखूबाईची खानावळ 426 16 गवई रहितमखां मुंबईत बेपत्ता 429 17 जी. आय. पी. रेल्वेच्या जुन्या गमति 432 18 नाथमाधवाचा विनोद(एप्रिल फूल ) 437 19 आत्मारामशेट आटवणे(सॅण्डोची भेट) 440 20 लो. टिळक नि दण्डधारी नाटक 442 मुंबईच्या 'लोकमान्य' दैनिकात प्रसिध्द झालेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या जुन्या आठवणी आठवण 1 ली ता. 1 सप्टेंबर 1942 मंगळवार ''खबरदार मुंबई टाईम बदलाल तर'' सर फिरोजशहा मेथा स्टॅंण्डर्ड टाइअिम चालू होण्यापूर्वी मुंबईमध्ये मद्रास आणि मुंबई अशी दोन टाइअिमे चालू होती. सूर्योदयाबरोबर घडयाळे लावण्याच्या प्रघातामुळे आणि मुंबईपेक्षा मद्रास पूर्वेकडे असल्यामुळे तिकडे तो अर्धा तास पुढे असे. काही सरकारी कचेऱ्या आणि व्यापारी कंपन्या मुंबई टाइअिम पाळीत, तर कांही मद्रास टाइअिम पाळीत. ज्याच्या कचेरीचा जसा प्रघात तसा तो आपल्या घरांतले घडयााळ मद्रास किंवा मुंबई टाइअिमाचे ठेवीत असे. सन 1906 साली जेव्हा स्टॅण्डर्ड टाइअिमाचा बूट निघाला, तेव्हा सर फिरोजशा मेथा यानी त्याला निकराचा विरोध केला आणि मुंबई म्युनिसिपालटीपुरते तरी मुंबई टाइअिम कायम ठेवण्याचा निश्चय केला. ज्या दिवशी स्टॅंण्डर्ड टाइअिम चालू झाले, त्या दिवशी मुंबईचे गव्हर्नरसाहेब घोडîkाच्या गाडीत बसून कारण त्यावेळी मोटारी नव्हत्या सार्वजनीक घडîkाळे तपासण्याला अगदी सकाळीच बाहेर पडले. का्रॅफर्ड मार्केटपाशी येताच तेथले मनोऱ्याचे घडयाळ पहातात तों जुने मुंबई टाइअिमावर चाललेले! गाडी थांबवून साहेब बहाद्दुरानी ते घडयााळ स्टॅण्डर्ड टाइअिमाप्रमाणे 39 मिनिटे पुढे सारण्याचा हुकूम दिला आणि म्युनिसिपालटीच्या नोकरानी काटे पुढे ढकलले. मागाहून पाठोपाठ सर फिरोजशा मेथांची गाडी तेथे आली. क्रॉफर्ड मार्केटचे घडयााळ पहातात तों तें 39 मिनिटे पुढे ढकललेले! मेथांचा क्रोधाग्नि भडकला. त्यानी तेथल्या नोकरांना जाब विचारला. नामदार गव्हर्नर साहेबांच्या आज्ञेने आम्ही तसे केले. असे त्यांनी सांगितले. सर फिरोजशा दरडावून गरजले. ''तुम्ही नोकर म्युनिसिपालटीचे, का गव्हर्नराचे? म्युनिसिपालटीच्या मालकीच्या संस्थांची घडयााळे बदलण्याचा गव्हर्नराला काय अधिकार ? मुंबई टाइअिम मुंबई टाइअिम आहे. प्राण गेला तरी मी ते बदलू देणार नाही. चला ओढा काटे मागे,खबरदार मुंबई टाइअिम बदलाल तर.'' ताबडतोब फिरोजशानी आपल्या समक्ष घडयााळाचे काटे मागे खेचवले. जुन्या आठवणी दुपारी कॉर्पोरेनशच्या सभेत फिरोजशानी जळजळीत भाषण करून मुंबई टाइअिम कायम ठेवण्याचा लोकमताचा ठराव पसार करून घेतला.त्यावेळी सर फिरोजशहा म्हणाले.-''आमचे मुंबई टाइअिम आमच्याकडच्या सूर्योदयावर ठरलेले आहे. समुद्राच्या भरत्या ओहटîkासुध्दा सगळी रयत याच टाइअिमावरून पहात असते. शिवाय ते मुंबइअिचे टाइअिमचे आहे. त्याचा अभिमान आम्ही मुंबईकरांना अभंग बाळगला पाहिजे. सरकारला काय! त्यांच्या सोयीसाठी उद्या ते हे नवे स्टॅण्डर्ड टाइअिमसुध्दा बदलतीत. म्हणून काय, आम्हीहि त्यांच्याबरोबर नाचानाच करावी? अशक्य, हा फिरोजशहा जिवंत असेपर्यन्त तरी मुंबई टाइअिम बदलणार नाही.'' आणि खरोखरच, मुंबई म्युनिसिपालिटीत मुंबई टाइअिम अभंग राहिले. मुंबई टाइअिम हे जसे मुबईच्या स्वाभामानाचे प्रतिक आहे, तसे ते सर फिरोजशहा मेथा यांचेहि स्मारक आहे. मुंबई विरूध्द स्टॅण्डर्ड टाइअिमाच्या या मेथा प्रकरणावर मुंबईच्या ''हिंदी पंच'' या ऍंग्लो गुजराथी सचित्र साप्ताहिकाचे एक विनोदी चित्र काढले होते. क्रॉफर्ड मार्केटच्या मनोऱ्यावरच्या घडाळîkाचा काटा अकीकडे गव्हर्नर दोन हांतांनी ओढीत आहे, तर तोच काटा सर फिरोजशहा मेथा अगदी विरूध्द मुद्रेने आणि दातओठ चावीत मागे खेचीत आहेत. असे ते विनोदी चित्र होते. ते इअिकडल्या अनेक पत्रांनी छापलेच होते, पण लंडनच्या रिव्यू ऑफ रिव्यूज मासिकाने सुध्दा ते उध्दत केले होते.ठाण्याच्या तात्या फडक्यांनी आपल्या हिंदू पंच या पत्रात''मेथानी सरकारची जिरवली'' असा एक मर्मभेदक विनोदी व सचित्र लेखहि छापला होता.* * टीप: ही आठवण लोकमान्याचे संपादक श्रीयुत गाडगीळ यानी इअितर मजकूर बाजूला सारून