जुन्या आठवणी: Page 3 of 38

संभव दिसला. तेव्हा फार दिवस वाचकांपासून दूर राहीलेले ठाकरे पुन्हा वाचकांपुढे आले म्हणून मला आनंद वाटला.तरी हा मारकट लेखक पुन्हा कोणकाणाला शिंगे मारून महाराष्ट्रांत नवी कोणती भांडण म्हटले म्हणजे मला शिसारी येते.आम्ही महाराष्ट्रीय लेखकांनी भांडणे उकरून व माजवून महाराष्ट्राचे जेवढे नुकसान केले आहे. तेवढे दुसरे कशानेंहि झाले नसेल. म्हणून ठाकरे यांचा लेख समोर येतांच मी बिचकलो! पण लेख वाचून पाहिला तो अगदीच वेगळयाा प्रकारचा आढळला. वर वर्णन केलेल्या गुणदोषांतले गुण सारे यांत आहेत. पण दोष मुळीच नाहीत. आठवणी हा वाड्.मय प्रकार मराठीला नवा नव्हे. पण आठवणी कितीही नम्रपणे लिहिलेल्या असल्या तरी त्यांत खुशामत, अहंकार, व्यक्त व अव्यक्त द्वेष, लुब्रेपणा, प्रौढी वगैरे काही ना काही असायचेच अशी रीत आहे. अशा आठवणी संग्रहाचे उल्लेख करून मी येथे कोणाची निंदा करूं इअिच्छीत नाही. कोणाची केवळ तात्विक प्रबंध असतात, ठाकरे यांच्या या आठवणी या पुष्कळा जड अभ्यासाचे तात्विक प्रबंध असतात.ठाकरे यांच्या या आठवणी रूढ प्रकारांहून अगदी वेगळया आहेत. अनेक महत्वाच्या व किरकोळ घटना त्यांनी दुरून व जवळून पाहिल्या आणि त्या त्यांनी अतिशय लीलेने पण मार्मिकतेनें लिहून काढल्या आहेत. त्यांत विषय साधे आहेत. मोठया माणसांच्या साध्या गोष्टी आहेत आणि त्या साध्या गोष्टींतहि मोठयांचे मोठेपण उठावदारपणें रेखाटलेले आहे. फेरोजशहा, रानडे, विष्णुबुवा पलुस्कर काशीनाथपंत छत्रे वगैरे प्रसिध्द थोर पुरुषांचे बाणेदार व्यक्तितत्व ठाकरे यांनी अगदी उत्कृष्टपणे दाखविले आहे. जनूभाऊ निंबकर, केशवराव भोसले, कृष्णराव गोरे वगैरेबद्दलच्या आठवणी मराठी नाटया सृष्टीचे विस्मृत वैभव सूचित करीत आहेत.

'सखूबाईची खानावळ' हा महाराष्ट्रातील सामान्य लोकांत दिसून येणाऱ्या ध्येनिष्ठेच्या अत्युकृष्ट नमुना आहे. ज्यांनी ठाकरे यांचे 'प्रबोधन' वाड्.मय वाचले असेल. त्यांना ठाकरे यांच्या या आठवणींच्या रूपाने अगदी नवी ओळख होणार असून, मराठी वाड्.मयांत आठवणी वाड्.मयाच्या एका आकर्षक प्रकाराची भर पडणार आहे. यांतील लेखनांत वक्तृत्व आहे. गोष्टी चटकदारपणे व बोधप्रदतेने कशा सांगाव्या याचा हा आदर्श आहे, असे मला वाटले. ता. 23-11-1948 पां. वा. गाडगीळ संपादक लोकमान्य -: एक अभिप्राय :- प्रबोधनकार श्री. ठाकरे ह्यांच्या आठवणी वाचून मला कवि माधव केशव काटदरे ह्यांच्या देखावे गतकालचे निशिदिन दृष्टीपुढें नाचती त्या माजी नयनां असंख्य दिसती छायामयी आकृती कांही निद्रीत भासती क्षितितली कांही उभ्या निल, ज्या व्यक्ती इतिहासवास करिती त्या मात्र येथे चल. ह्या उक्तीचे प्रत्यंतर अनुभवण्यास मिळाले. श्री. ठाकरे यांची वैयिक्तक मतें कांहींही असोत. ती कोणास रूचोत वा नरुचोत; पण ह्या आठवणी मात्र अत्यंत रुचकर व समाजहितास सर्वस्वी पोषक आहेत. उतरतील अशाच आहेत. कारण त्यांत श्री. ठाकरे यांनी व्यिक्तविशेषांचे फार मार्मिक रसग्रहण केले आहे. निवडलेले प्रसंग औत्सुक्य निर्माण करणारे असून ते ज्या भाषेंत सांगितले आहेत ती भाषा घरगुती आणि गंभीर तितकीच विनोदी आहे. कुठलीही आठवण पहा.'आणखी लेखकाने का बरे लिहिले नाहीं? इतकेंच कां? असे वाचकास वाटतें. हेंच ह्या 'छोट्या' पुस्तकांचे खरें यश. दुसरें म्हणजे श्री. ठाकऱ्यांचे हे अनुभव केवळ व्यक्तिचे अनुभव म्हणून आता राहिलेले नाहीत. ते सार्वजनिक अनुभव म्हणून झाले आहेत. अशा सार्वजनिक आठवणींचे लेखक आपल्याकडे थोडेच आहेत. श्री. ठाकरे यांच्याकडून अशा साहित्याचीच जनतेने सक्तीने मागणी केली पाहिजे.

जव्हेरी व्हिला दुर्गा भागवत गिल्डर लेन, मुंबइ 8 [M.A.] आठवणींची अनुक्रमणिका क्रमांक नांव नि विषय पान 1 सर फिरोराजशहा मेथा (मुंबईटाईम) 383 घडयाळयाचेराजकारण एक लेख 385 2 सर फिरोजशहा मेथा (पुतळा) 389 3 सर भालचंद्र भाटवडेकर (बॅकेचेदिवाळ)े 391 4 पंडित विष्णु दिगंबर (कोकोनाडाकाँग्रेस) 393 5 मिस आवडाबाई(लूपिंग ध लूप) 395 6 माधवराव पाटणकर(दिल्ली दरबार) 399 7 केशवराव भोसले(मूर्तिमंत भीति) 402 8 जस्टिस रानडे(सोनापूरचा लढा) 406 9 स्वदेशी चळवळीचे स्वदेशी शत्रू 409 10 गव्हर्नर