जुन्या आठवणी: Page 2 of 38

लोकमान्य दैनिकांत प्रसिध्द होउन लोकमान्य ठरलेल्या त्यांच्या 'जुन्या आठवणी' चे पुस्तक सत्कार समिति प्रबोधन भक्तांना नि महाराष्ट्रीय रसिकांना अत्यादराने सादर करीत आहे. देणग्या नि नाटयप्रयोगाचे उत्पन्न एकंदर रू. 2502-11-0. असा निधि जमला नि तितकाच सत्कार समारंभ,नाटयाप्रयोगाचा खर्च आणि या पुस्तकाची छपाई यांत खर्च झाला. मुंबई सरकारने नाटयाप्रयोगावरील कर माफ करून समितीवर मोठे उपकार केले आहेत. त्याचप्रमाणे लहान मोठयाा रोख देणग्या देऊन अनेक ठाकरे-भक्तांनी समितीला सहाय केले आहे. कृतज्ञतेने त्यांचे जाहीर आभार समिति येथे मानीत आहे. काही ठळक देणग्या- श्री. दत्तात्रेय रामचंद्र देशमुख, घाटकोपर, रू. 201 श्री. गोविंद काशीनाथ चित्रे] जळगांव रू. 101 चां. का. प्रभू सभा, दादर रू. 150 चां. का. प्र. को. क्रेडिट बँक, दादर '' रू. 101 धक्का क्लब दादर ठाकरे यानां रोख रू. 129-12-0 लोकमान्य दैनिकाचे विद्वान संपादक महाशय पां. वा. गाडगीळ यानी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिल्यामुळे समितीला आणखी विशेष काही सांगायचे नाही. सर्व सहायकांचे आम्ही आभारी आहो.

वि. दा. कोतवाल, कार्याध्यक्ष सभासद वि.अ.ताम्हणे खजिनदार वि. गं. मोकाशी ना. गो. तवकर, कै. गो. वि. दिघे म. वि. प्रधान 31 मे 1946 रा. ना. दिघे प्र. वि. नाचणे शां. बा. कुळकर्णी ज. आ. देशपांडे व. आ. प्रधान 1 जून 1946 पासून चिटणीस. रा. म. कर्णिक ज. प्र. कर्णिक हिशेब तपासनीस. ता. 18 दिसेंबर 1948 (ठाकरे सत्कार समिति) कार्यालय 100 शिवाजी बाग, शांतिलता, मुंबई नं. 28.

दादरचे नेत्रशास्त्रज्ञ शस्त्रवैद्य डॉ. श्रीधर विट्ठल ओक, एम. बी.बी. एस. यांना ही वीस आठवणींची फुलांची ओंझळ कृतज्ञ भावनेने अर्पण असो.

ऑक्टोबर 1941 चा पहिला आठवडा. एका दिवशी सकाळी झोपून उठतो तों काय! विलक्षण चमत्कार घडला. माझी दृष्टी अज्जीबात गेलेली. मी आंधळा झालो. काही केल्या काही दिसेच ना! अखंड लेखन वाचन हे तर माझे सारे जीवन, आंधळा झालो जिवंत असून मरणाचीच ती दशा! काल रात्री दीड वाजेपर्यंत वाचन चालू होते. आणि आज सकाळी दृष्टी गेली! सारी सृष्टी मला मेली! चित्रकार चिरंजीव बाळ याने हात धरून संध्याकाळी डॉ. ओक यांच्या दवाखान्यात नेले. डॉ. ओकांचा माझा ऋणानुबंध फार जुना नि जिव्हाळयााचा त्यांचे वडील बंधू अमेरिका निवासी चि. विष्णुपंत यांचे कॉलेजातले अध्ययन माझ्या देखरेखाली झाले आणि त्यांच्या विविध सार्वजनिक चळवळ माझ्याच कदरीखाली त्यानी केल्या. डॉ. ओकानी डोळयांच्या बुबुळात इंजेक्शने देऊन दीड महिन्यात मला दृष्टी येऊन सृष्टीचे पुन्हा दर्शन घडवले. मला नवा जन्मच दिल म्हणा ना. जुन्या आठवणींचे हे पुस्तक त्या क्रांतिकारी घटनेच्या आठवणीसाठी, कृतज्ञतेचे एक बारीकसे पारिजातकाचे फूल म्हणून डॉ. ओकाशिवाय मी कोणाला वहावे? केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकारांचे पनवेल प्रस्तावना प्रसिध्द साहित्यिक, सुधारक आणि इअितिहास संशोधक श्री. केशवराव ठाकरे यांच्या या वीस आठवणी आहेत आणि शिवाय बर्मा टाईमवर विचार व्यक्त करणारा'नवशक्ती'त आलेला एक चिकित्सक लेख आहे. शेवटच्या तीन आठवणी नवीन व अप्रसिध्द आहेत आणि सतरा आठवणी 'लोकमान्य' दैनिकांत प्रसिध्द झालेल्या आहेत. ठाकरे हे चांगले शैलीवंत साहित्यिक आहेत. प्रतिपक्षावर टीका करतांना अथवा प्रतिपक्षाची टीका उलटविताना त्यांचे लेखन मुद्देसुद असून मोठे प्रहारी असते. ठाकरे यांच्यावर अनेकांनी लेखणीचे तडाखे दिले आहेत व ठाकऱ्यांनीही अनेकांना लोळविले आहे. ते टवाळीत उपरोध फार निष्ठुरपणे करतात. पण त्यांच्या अंत:करण स्वच्छ व प्रेमळ असून त्यांच्या खटयाळ लेखनांतही एक प्रकारचे औदार्य आहे. ठाकरे यांचे वाड्.मय ज्यांनी वाचले आहे त्यांना त्यांच्या केवढयाहि थोडया लेखनांत वरील गुण दोष दिसून येतात.

ठाकरे यांच्या लेखनासंबंधाने माझे वर दिलेले मत मी केव्हांतरी एकदा'प्रबोधन'च्या फायली चाळल्या त्यावरून बनलेलें आहे. म्हणून श्री ठाकरे यांची पहिली आठवण 'लोकमान्यांत छापण्यासाठी मजकडे आली व आणखी आठवण येणार असा