जुन्या आठवणी

प्रबोधनकारांनी उतारवयात लिहिलेल्या या काही आठवणी. त्यांनी त्या लोकमान्य या दैनिकात सदररुपानं लिहिल्या होत्या. हे सदर अत्यंत लोकप्रिय झालं होतं. मुंबईतील तत्कालीन स्थित्यंतरं आणि प्रबोधनकारांचं समृद्ध आयु ष्य यांचं दर्शन या आठवणींतून घडतं.

प्रबोधनकार केशवे सीताराम ठाकरे यांनी 'लोकमान्य' दैनिकातून सांगितलेल्या जुन्या आठवणी 'ठाकरे सत्कार समिति,दादर'च्या सौजन्याने प्रकाशित झालेले पुस्तक.

प्रकाशन तारीख 18 दिसेंबर 1948 मुद्रक शांताराम नारायण सापळे नवयुग प्रिटींग प्रेस पोर्तुगीज चर्च दादर मुंबई-14.

या पुस्तकासंबंधी सर्व प्रकारचे हक्क माझ्या स्वाधीन आहेत. यातल्या मजकुराचा लेखकांनी संदर्भासाठी उपयोग केल्यास माझी हरकत नाही. केशव सीताराम ठाकरे पेपर परमिट प्रकाशक नं.(65/4643/111) केशव सीताराम ठाकरे ता. 10 नवेंबर 1948 जोशी बिल्डींग रानडे रोड एक्सटेन्शन, रोड ठाकरे

सत्कार समितीचे निवेदन. प्रबोधनकार केशव सीतराम ठाकरे यांच्या एकसष्टीनिमित्ता त्यांचा गौरव करण्यासाठी ज्ञातींतील 25-30 संस्थांनी एक सत्कार समिति स्थापन केली आणि तिने ता. 16 ऑक्टोबर 1945 रोजी दसऱ्याच्या दिवशी प्राचार्य त्रिंबकराव आप्पाजी कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा संमारभ थाटाने साजर केला. या संमारंभात अनेक इअितर ज्ञातीय पुढारी व स्थानिक सार्वजनिक संस्थांनीही भाग घेतला होता. पूर्वी प्रबोधनांत प्रसिध्द झालेले ठाकरेविरचित स्फूर्तिदायक पोवाडे आणि लेखांतील समयोचित उतारे मुलांमुलींनी म्हणून दाखविले.मंडपांत ठळक प्रबोधन-सूक्तींचे फलक जागोजाग लावण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील,- म्हणाले'' प्रबोधनकार माझे गुरु तर खरेच पण ती त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य नि पूजनीय मानतो... ठाकरे मुंबईला राहत असले तरी मुंबई ही त्यांची कर्मभूमि नव्हे. त्यांची कर्मभूमि सातार जिल्हा. ''प्राचार्य दोंदे म्हणाले,- ''प्रबोधनकारांचे वैशिष्ट म्हणजे त्यांची बेडर वृत्ती.'' अणजूरकर गजानन गोविंद नाईक म्हणाले-''क्रांति मर्दाची नि शांती मुद्र्याची या प्रबोधन सूचितच ठाकरे यांचे सारे वाड्.मयीन जीवन चित्रित झालेले आहे.'' सत्कार समितीच्या वतीने प्रबोधनकाराना एका उंची फौण्टन पेनचा आहेर करताना स्वागताध्यक्ष महाशय fवश्वनाथराव कोतवाल म्हणाले,-''झुळझुळत्या लेखनाचा हा जिवंत झरा, ओजस्वी वाड्.मयाची ही जागती ज्योत, गडकऱ्यांनी कमलेश्वरी, प्रबोधनकारांच्या प्रभावी लेखणीचे प्रतिक म्हणून त्याना प्रेमदाराने अर्पण केली आहे.'' याच वेळी ठाकरे वाड्.मयांचे पुनर्मुद्रण करण्याची योजना पुकारण्यात आली व स्वंयस्फूर्त देणग्यांच्या बरोबरीने निधि जमा करण्यासाठी, तमाम महाराष्ट्रांत गाजलेल्या खरा ब्राम्हण नाटाकचा प्रयोग महाशय नंदू खोटे यांच्या विख्यात रेडियो स्टार्स नाटयसंस्थेन दादर येथे ता. 25 मे 1946 रोजी श्रीनंद नाट्यगृहात केला. अध्यक्षस्थानीं मेहेरबान जमशेटजी बी. एच. वाडिया, एम्. ए. एल्एल्. बी. एम. बी. ई. बॉम्बे रेनेसां असोसिएनशचे अध्यक्ष होते. स्वराज्यमंत्री महाशय गोविंदरावजी वर्तक अगत्याने आले होते. 'जनपवाद सोसूनहि आपण समाज सुधारण्यासाठी,विशेषत:अस्पृश्यता निवारणासाठी जे प्रयत्न केले, त्याबद्दल आपणास धन्यवाद'' असा पंतप्रधान बाळासाहेब खेर यानी संदेश पाठवला.

प्रबोधनकारांच्या 40 वर्षांच्या विचाक्रांतिकारक लेखन व्याख्यांनांचा आढावा घेताना, अध्यक्ष वाडिया शेटजी म्हणाले,- ''So powerful must have been the impact of articles written with a pen of steel in the ink of fire that the writer (Mr- Thackeray) came to be known throughout the lenth and breadth of the world of Maharashrtian literature as” Prabodhankar Thakare”------ If in Mahatma Eknath, Thackeray gives us the ”Khara Brahman”_(खरा मनुष्य)then in Thackeray himself we have the “Khara Manushya” (खरा मनुष्य)the homo sapient-“ प्रबोधनातील प्रबंध चिरकालिक महत्वाचे आहेत. ते ग्रंथरूपाने प्रसिध्द व्हावे, असा महाराष्ट्रातील अनेक साहित्य-पंडितांचा आग्रह फार जुना आहे. सत्कार समितीने या दिशेने पहिले पाऊल टाकावे, ही मनिषा पण युध्दजन्य परिस्थितीने छपाईचे नि कागदाचे प्रश्न अधिकाधिक बिकट केले. इअितक्यात प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी हा साडेसहाशे पानांचा रोमांचकारी सचित्र इअितिहास ग्रंथ लिहून प्रबोधकारांनी प्रकाशात आणला (सन 1947) आणि वयोमानाने जरी आपण वृध्द झालो तरी सत्यशोधनांची आपली तिरमिरी तगडी जवान आहे, हे त्यांनी सिध्द केले. अखेर