हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 6 of 58

जैन आणि बौद्ध अथवा शीख, असे तुमचे निरनिराळे पंथभेद, मतभेद, धार्मिक आचार-विचार-भेद, सामाजिक रूढीभेद कितीही असले, तरी या भेदांना सप्तसमुद्रापलीकडच्या त्या भव्य आणि विस्तीर्ण जगात कवडीचीही किंमत नाही. तेथे धार्मिक आणि अनुवंशिक भेदाभेदांचे शुद्ध देशीय राष्ट्रीयत्वात (Territorial Nationality) आमूलाग्र पर्यवसान होत असते, हे लक्षात ठेवा. त्या विस्तीर्ण जगात हिंदू काय अथवा हिंदी (इंडिअन) काय, दोनही शब्दांची किंमत सारखीच (कवडीमोल) आहे; आणि हिंदुविरुद्ध ज्या बहिष्काराची तयारी चाललेली आहे, तो अमलात आला की या दोन शब्दांऐवजी तितकाच निंद्य असा दुसरा शब्द इंडियन डोमिसाइल (हिंदुस्थानात माणसाळलेला) हा उपयोगात आणला जाईल. यावर कोणी अशी पळवाट सुचवतील की मुसलमान, ख्रिश्चन, पार्शी इ. मंडळी तरी निदान या बहिष्काराच्या रामरगाड्यातून निसटतील. गोष्ट सोडून द्या. या रामरगाड्यात त्यांचीसुद्धा हिंदुमुसलमान, हिंदुख्रिस्ती, हिंदुपारशी या संज्ञेने चटणी झाल्याशिवाय राहणार नाही; आणि हिंदुंना जो राष्ट्रीय अपमान सोसावा लागणार तो त्यांच्याही कपाळचा चुकणार नाही. अर्थात जो जो म्हणून हिंदुस्थानात जन्मलेला असेल, मग तो हिंदु मुसलमान, ख्रिस्ती, पारशी कोणीही असो, त्याने या प्रसंगाचा नीट विचार करण्याची वेळा येऊ ठेपली आहे. विचार! हा विचारच इतका भयंकर आहे की त्याचा उच्चार करताना आमचे अश्रू ठिकच्या ठिकाणी थिजतात व छाती भरून येते. या बाबतीत आमच्या देशी कायदेमंडळात पसार केलेला अथवा खुद्द इंपिरियल ब्रिटीश पार्लमेंटने जाहीर केलेला एखादा ठराव आमच्या उपयोगी मुळीच पडणार नाही. बादशाहकडे, अमेरिकन प्रेसिडेंटाकडे किंवा राष्ट्रसंघाच्या अध्यक्षाकडे अर्ज्या पाठवून तोंड वेंगाडण्यात आमच्या राष्ट्रीय इभ्रतीला जी काही थोडीबहुत इभ्रत शिल्लक राहिली असेल तिलाही ते साजेशोभेसे दिसत नाही. पण आता काय उरले आहे. निकाल दिला गेला. शिक्षाही ठोठावली गेली. या शिक्षेवर अपील करण्याचीही सध्या सोय नाही. उद्या परवा मात्र या अपीलाचा परिणाम घडवून आणण्याची एक बारीकशी फट आहे. आपण सर्व हिंदवासी जर एकजूट झालो. आम्हाला जगत्बहिष्काराची शिक्षा ठोठावणा-यांच्या मनात आमच्या संयुक्त कर्तबगारीने जर आम्ही आदर व विश्वास उत्पन्न केला आणि आम्हीही तुमच्यासारखीच (विचार-विकारमय) माणसे आहोत असे त्यांना पटवून दिले, तर त्यांची सदसद्विवेक बुद्धी जागृत होऊन या शिक्षेचे परिमार्जन करील. आशेला जागा एवढीच! प्रसंग येऊ नये, आला. अर्थात् सत्य, न्याय आणि हक्क या सनातन सर्वव्यापी तत्त्वांवर पूर्ण विश्वास ठेवून निधड्या छातीने आपण त्याला तोंड दिले पाहिजे; आणि आपल्या प्रिय भारतमातेप्रमाणे `यह भी दीन चले जायेंगे’ हाविश्वास अढळ राखिला पाहिजे. आपल्या संतमंडळींनी आपल्या हृदयांवर एक बिनमोल उपदेश बिंबविलेला आहे, तो हा की कोणी कितीही धिःकार करो, निंदा करो, आपल्या दुस्मानाची दुस्मानगिरी कितीही करडी असो, तरी आपण आपला आत्मविश्वास निर्लेप ठेवून नुसते स्मितहास्य करीत राहावे. आपण या जगड्व्याळ विश्वरचनेचे एक घटकावयव आहो आणि आपण आत्मप्रतारणा केली नाहीतरत्या विश्वरचनेच्या सनातन नियमाने आपोआप बु-याचे भले होत असते. या तत्त्वावर विश्वास ठेवून आपण खुशाल निर्धास्त रहावे. ``हाती चाले अपने चालसे; कुत्ता भूकत वांकु भुंकवा दे’’ परंतु आपल्या पुढचा प्रसंग मात्र भयंकर आहे. अशा वेळी यावर जर काही तोडगा शोधून काढावयाचा असेल तर तो आत्मनिरिक्षणानेच काढला पाहिजे. ००० एकजात सबंध राष्ट्राच्या मानववंशाच्या शीलावर कलंक अं! केवढी ही मानखंडना! या मानखंडनेचे कारण शोधून काढण्यासाठी व कायमचे निराकरण करण्यासाठी आपल्याला एकांतात आत्मशोधनच केले पाहिजे. आमची विशिष्ट वंशसंस्कृती काय आहे, आमचा भूतकालीन इतिहास कसा आहे आणि आमच्या उत्पत्तीचा उगम कसा झाला, या गोष्टींचा आपण नीट विचार केला पाहिजे. हिंदुस्थानात मुसलमानांचा धौशा सुरू होण्यापूर्वी साम्राज्यसत्तेच्याकाळाता आमच्या हातून कोणकोणती बरी वीट कृत्ये घडली, आणि त्यावेळी आमच्या गृहस्थधर्माची नीति व त्याचे वळण कोणत्या धर्तीचे होते, याचेही पृथःकरण आपणास केले पाहिजे. इतकेच नव्हे तर, आपल्य आत्मनिरीक्षणाची दृष्टी धर्माच्या क्षेत्राकडेसुद्धा वळविली पाहिजे, आणि ज्या