हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 2 of 58

हे भावनावश लेखक नाहीत,. त्यांच्य विधानांचा आणि चिकित्सेचा सर्व आवेश तिहाससिद्ध भरभक्कम पुराव्यांवरच विशेष असल्यामुळे, त्यांच्या सिद्धांताकडे आणि शुद्ध राष्ट्राभिमानाने केलेल्या अनेकविध सूचनांकडे विवेकी व विचारी हिंदुजनांचे आदरपूर्वक लक्ष वेधले जाणे अगत्याचे आहे. हिंदु जनांच्या सामाजिक आत्मप्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणा-या समाजसुधारकांनाही आपापली कार्याची दिशा ठरविण्याच्या कामी अनेक उपयुक्त सूचनाचे भआंडार या ग्रंथाच्या अध्ययनाने आज खुले होतआहे.

हिंदुसमाजाच्या काळजाला झोंबलेल्या भिक्षुकशाही ब्राह्मणांच्या मुर्दाड स्वभाव-प्रवृत्तीची या ग्रंथात दिलेली इतिहासप्रसिद्ध चित्रे अत्यंत मननीय आहेत. हिंदुजनांच्या आत्मोद्धाराच्या प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्य कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन, जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन, एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येते. भिक्षुकू वर्चस्वस्थापनेची कारस्थाने पार पाडण्यासाठी परक्यांना हाताशी धरून, वेळी त्यांचे पाय धरून, ब्राह्मणेतर स्वदेशबांधवांना चिरडून टाकण्याचे भिक्षुकशाहीने केलेल प्रयत्न, रजपूत विरुद्ध बौद्ध, शंकराचार्य विरुद्ध बौद्ध इत्यादी प्रकरणात निःसंदिग्ध पुराव्यानिशी आढळून येतात. बौद्धधर्माच्या पाडावाची भिक्षुकी कारस्थाने चालू मन्वंतरात विचारी वाचकांना नानाविध विचारांचे ब्रह्मांड खुले करून दाखवतील, यात मुला मुळीच शंका वाटत नाही. विशेषतः पृ. १५८वर बौद्धांच्या ससेहोलपटीतूनच आद्यशंकराचार्यांनी हिंदू समाजात अस्पृश्यता प्रथमच निर्माण केली, हा इतिहास विचार करण्यासारखा आहे. कितीही आणि कसाही विचार केला तरी ``जातीभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय.’’ हा भारतमहर्षि प्रफुल्लचंद्र रॉय याचा रोखठोक अभिप्रायच सर्वत्र प्रत्ययास येत आहे. असा स्थितीत या हिंदुभारताच्या आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळावा, हे प्रस्तुत ग्रंथाच्या वाचन मनन निदिध्यासाने अखिल हिंदू भगिनी बांधवांना नीट कळेल, असा मला भरवसा आहे.प्रबोधन कचेरी ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर. ता. १ डिसेंबर १९२६ देशबांधवांचा नम्र सेवक केशव सीताराम ठाकरे

-------------------------------------

 

 प्रस्तावना

श्रीयुत मुकर्जी यांचा `हिंदु जनांचा –हास वन अधःपात, हा प्रबंध मी वाचला व तो मला अत्यंत हृदयगंम वाटला. अभिनव भारताचा उषःकाल होत आहे. अशा वेळी भारताचे कल्याण चिंतणा-या प्रत्येक व्यक्तीने आपल्या राष्ट्रीय अवनतीचे प्रस्तुत प्रबंधात केले विचार-परिपूर्ण पृथःकरण अवश्य विचारात घ्यावे, असे मी निःसंकोच सांगतो. हा प्रबंध श्रीयुत मुकर्जी यांच्या दीर्घ परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाचे विचारपरिलुप्त असे फळ आहे. रोगाची कारण जर समजली नाहीत तर रोग कधीही बरा करता येणार नाही. हाच नियम आजच्या राष्ट्रीय अवनतीलासुद्धा लागू पडतो. प्रस्तुत प्रबंध म्हणजे `भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’ आहे, असे माझे ठाम मत आहे. जातिभेदाचा पुरस्कार करमारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय. इतर अनेक गोष्टीपेक्षा या भिक्षुकशाहीनेच आमच्या प्रगतीला कुंठितकरून, राष्ट्रीय भावनांची कलमछाट केलेली आहे.

सारांश, भिक्षुकशाही म्हणजे आमच्यावर्तमान दुर्दैवी अधःपाताची खाणचम्हटली पाहिजे. ज्या तोंडाने राजकीय हक्क आणि ब्रिटिश नागरिकत्वाचे अविछिन्न अधिकार मागण्यासाठी आम्ही मोठमोठ्याने वल्गना करतो, त्याच तोंडाने अवनत देशबांधवांच्या बुचाडून घेतलेल्या हक्कांना परत देण्याविशयी अथवा त्यांच्यावरील आपल्या सत्तेचा चाप लवमात्र ढिला करण्याविषयी, आम्ही कधी क ब्र तरी काढला आहे काय? वातावरणात आता लोकशाहीचे मेघ जमू लागले आहेत. सारे वातावरण लोकशाहीने दुमदुमू लागले आहे. अशा वेळी आमच्या अवनत देशबांधवांना जर आम्ही हात देऊन वर उचलणार नाही, उदार मनाने सामाजिक क्षेत्रांत योग्य ठिकाणी त्यांची स्थापना करणार नाही, तर राजकीय हक्कांसाठी नित्य चालणारा आमचा हलकल्लोळ म्हणजे पोकळ वल्गनांचा शुद्ध तमाशा होय, असे मानण्यास काही हरकत नाही.श्रीयुत मुकर्जी हे उच्चजातीय ब्राह्मण आहेत. तथापि हिंदू जनांचा –हास व अधःपात यांच्या कारणांची तात्विकदृष्ट्या मीमांसा करताना त्यांनी आपली सहृदयता आणि राष्ट्राभिमानाची तडफ अत्यंत उत्कटतेने व्यक्त केलेली आहे. माझ्या सर्व देशबांधवांनी प्रस्तुत प्रबंध अवश्य विचारात घ्यावा, असी माझी शिफारस आहे. पी. सी. रॉय धी युनिवर्सिटी सायन्स कॉलेज २१ डिसेंबर १९१९