हिंदुजनांचा –हास आणि अधःपात

बुकबाजी हे प्रबोधनकारांचं मोठं व्यसन आणि इतिहास हा आवडता विषय. त्यामुळे या विषयातली सगळी महत्त्वाची पुस्तकं त्यांच्याकडे असत. उत्पन्न बेताचं असतानाही त्यांनी कधी त्यात पुढेमागे पाहिलं नाही. अशाच प्रसंगी त्यांना `डिक्लाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ हा एस. सी. मुकर्जी यांचा ग्रंथ सापडला. त्यांच्या भारतीय इतिहासाच्या लाईनवर हा ग्रंथ फिट बसत होता म्हणूनच त्यांनी याचा अनुवाद मराठीत मोठ्या आवडीने केला आणि छापला.

-------------------------------------

हिंदुजनांचा –हास आणि अधःपात बॅरिस्टर एस. सी. मुकर्जी कृत THE DECLINE & FALL OF THE HINDOOS नामक इंग्रेजी ग्रंथाचा मराठी अनुवाद अनुवादक, मुद्रक व प्रकाशक – केशव सीताराम ठाकरे प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर किंमत एक रुपया हे पुस्तक श्रीयुत केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर येथे छापून प्रसिद्ध केले. या मराठी अनुवादाचे व त्यावरून इतरदेशी भाषात भाषांतरे करण्याचे सर्व हक्क श्री. ठाकरे यांच्या स्वाधीन आहेत पुस्तके मागविण्याचा पत्ता व्यवस्थापक, प्रबोधन कचेरी, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर.

-------------------------------------

ग्रंथ परिचय मराठी पेहरावात म-हाठ्यांच्या हाती पडणारा हा निबंध प्रथम इंग्रजी भाषेत कलकत्त्याच्या इंडियन रॅशनॅलिस्टिक सोसायटीच्या सभेत तारीख ७ सप्टेंबर १९१९ रोज लेखक श्रीयुत एस. सी. मूकरजी, बार-अट-लॉ यांनी वाचला. सोसायटीच्या मासिक बुलेटीनच्या नोव्हेंबर १९१९च्या अंकात तो छापून प्रसिद्ध झाला. यातील विचारांचा विद्वज्जनात एवढा गौरव झाला की,कलकत्त्याच्या इंडियन डेली न्यूज पत्राच्या संपादकांनी हा निबंध ५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत आपल्या दैनिकाच्या अंकांत हप्त्याहप्त्याने छापून पुनर्प्रकाशित केला. त्यामुळे या निबंधाला इतकी विलक्षण मागणी आली की अखेर इ. रॅ. सोसायटीला तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावा लागला. भारतमहर्षि डॉ. सर पी. सी. रॉय यांनी या निबंधाला प्रस्तावनेचा आशीर्वाद देऊन, ``भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’’ अशी त्याची सूत्रबद्ध स्तुती केल्यानंतर, प्रस्तावनेदाखल अधिक कोणी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ``रंगविण्या लिलि धजला’’ या शेक्सपियरोक्ती प्रमाणे स्वतःस उपहासास्पद करून घेणेच होईल. प्रस्तुत निबंधाचे इंग्रजी पुस्तक `डिकलाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ सन १९२० साली माझ्या वाचनात आले आणि त्याचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणाही त्याचवेळी माझ्या मनात आली. माझे परममित्र बॅरिस्टर मुखर्जी (पाटणा, बिहार) यांना हा मनोदय कळविताच, त्यांनी कसल्याही प्रकारच्या अटी न घालता मराठी अनुवादाची शुद्ध दार भावनेने आणि राष्ट्राभिमानाने परवानगी दिली. भाषांतरास सुरुवात केली आणि प्रबोधन पाक्षिकातून त्याच हप्ते छापण्यास १९२१ साली आरंभ केला.

पुढे हे भाषांतराचे काम माझे स्वर्गवासी स्नेही व प्रोबधनाचे सह-उपसंपादक कै. श्रीयुत रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे, बी.ए. यांनी सर्वस्वी आपल्याच हाती घेतले. गुदस्त साली त्यांचा अकाली शोचनीय मृत्यू होईपर्यंत, हे भाषांतर-प्रकाशनाचे कार्य हळुहळू प्रबोधनद्वारा होत होते. गेली पाच वर्षे रेंगाळत पडलेले आणि बापूसाहेबांच्या निधनाने मध्येच अर्धवट तुटलेले हे कार्य संपूर्ण तडीला नेण्याची प्रेरणा गेल्या सप्टेंबरात उद्भवली आणि `शोधन -प्रकाश’ नामक स्वतंत्र ग्रंथाच्या लेखनाचे काम तात्पुरते बंद ठेवून, मी या कामाकडे वळलो. श्रीहरीच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण होऊन, आज आपल्या सेवेला सादर रुजू होत आहे. बॅरीस्टर, मूकरजींनी वेदपूर्व काळापासून तो थेट मुसलमानांच्या स्वा-यांपर्यंत भारतीय इतिहासाची चिकित्सक छाननी करून, हिंदु जनांच्या –हासाची आणि अधःपाताची मीमांसा केली आहे. एका निबंधाच्या आकुंचित जागेतच हा सर्व मीमांसेचा चित्रपट त्यांना दाखवणे भाग पडल्यामुळे, त्यांची विवेचनपद्धती विहंगम निरीक्षणासारखी झालेली हे. `थोड्यात फार -’ दिसावे, असी त्यांची धावती लेखनशैली असल्यामुळे, वाचकांनी फार सावकाश व मननपूर्वक चन केले तरच त्यांना `सूत्रातले सार’ स्पष्ट पटत जाईल. बॅरिस्टर मूकरजी हे उच्चजातीय ब्राह्मणच असल्यामुळे, भिक्षुकशाहीची त्यांनी केलेली निर्दय छाननी वाचून, त्यांच्यावर ब्राह्मणद्वेषाचा आरोप करताना, इरसाल ब्रह्ममुखोत्पन्नांना तोंड नसले, तरी लाज वाटेल, असा मला भरवसा आहे. बॅरिस्टर मूकरजी