हिंदवी स्वराज्याचा खून: Page 9 of 9

ब्राह्मण वीर महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थाने आपल्या दृष्टीला पडतील. हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविलेले आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूने अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचविण्याकरिता हिंदवी स्वराज्याचे पहिले डेप्युटेशन विलायतेस घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत सोळा वर्षे विलायतेत झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, की ज्या दादजी नरस प्रभूने आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याच्या भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेत जाण्याचा प्रसंग यावा हा योगायोग विलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापूजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकातच पहावयाला मिळेल, इतके सांगून मी पुरे करितो. [विजयी मराठा, पुणे, जून १९२२] टीप *१ – लुसिअड हे एक कामिअन्स नामक कवीने, हिंदुस्थानातील पोर्तुगिजांची सत्ता, या विषयावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले महाकाव्य आहे. हे प्रथम १५७१ मध्ये प्रसिद्ध झाले. टीप *२ – ``Committing a literary suicide in their own manuscripts.’’ - Isasc Disraeli टीप *३ – शनवार वाड्याची स्थापना कशी झाली याबद्दल एक आख्यायिका आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे एकदा त्या वाड्याच्या मैदानावरून जात असता तेथे त्यांना एक ससा एका कुत्र्याची पारध करीत असताना दृष्टीस पडला. त्यावरून `आपल्या वाड्याला हीच जागा पसंत’ असे श्रीमंतांनी ठरवून त्या ठिकाणी शनवारचा टोलेजंग वाडा बांधला. परंतु प्रस्तुतच्या देशपरिस्थितीचा सूक्ष्मदृष्टीने विचार केला असता कुत्र्यांच्या मागे ससेच लागलेले दिसत आहेत. टीप *४ – A song for our banner? The watchword recall which gave the Republic her station : ``United we stand – Divided we fall!’’ It made and preserved us a nation! The union of lakes, the union of land, the union of states, none can sever the unioun of hearts – the unioin of hands. And the Flag of our union for ever! हे वर्णन सार्थ आहे!

G. P. Morris टीप *५ – श्लोक – क्वचिद्वीणा वाद्यं क्वचिदपि च हा हेति रुदितम् । क्वचिद्विद्वद्गोष्ठी क्वचिदपि च सुरामत्तकलहः ।। क्वचिद्रम्या रामा क्वचिदपि जराजर्जरतनुः। न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ।।१।।

टीप *६ – मूळ इंग्रजी कविता अशी आहे. When Briton firsr, a Heaven’s command Arose from out the azure main, This was the charter of her land, And guardian angels sung the strain, Rule Birtania! Britaia rule the waves! Britons never shall be slaves.

टीप *७ – कर्नल हेन्री पॅट्रीकच्या व्याख्यानातील एक उतारा वाचकांकरिता येथे नमूद करितो. ``Is life so dear, or peace so sweet, as to be purchased at the price of chains and slavery? Forbid it, Almighty God! I know not what course others may take, but as for me five me LIBERTY or death!-’’