हिंदवी स्वराज्याचा खून: Page 5 of 9

आहे. परंतु बिनचौकशीने घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल, तर माझे राज्याधिकार आताच घ्या, मी खुशाल भीक मागून आपले पोट भरीन. माझ्या चिटणिसाप्रमाणे मला उचलून तुरुंगात टाकावयाचे असेल, तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन, आता मी आपल्या बंगल्यावरच आहे. मी येथून घरी परतच जात नाही, म्हणजे झाले!

सर जेम्स :- असे करू नका. मी सांगतो याप्रमाणे या कागदावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हा. नाहीतर मला निराळीच तजवीज करावी लागेल,

महाराज :- तुम्हाला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊ काय? ही गोष्ट प्राणांतीही होणार नाही. प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचे स्पष्टीकरण करताना त्यावेळी पार्लमेंटपुढे व्याख्यान देताना मेजर जनरल रॉबर्टसननी जे उद्गार काढले तेच मी आपणास सांगतो. ते म्हणाले, The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome, and is, in my opinion, in itselt a sufficient refutation of all that has been urged against him. (भावार्थ – प्राचीन रोमन साम्राज्याचा नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेसे वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफीतच त्यांच्याविरुद्ध रचलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे.) महाराजांविषयी भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करताना रॉबर्टसननी काढलेले उद्गार चालू घटकेलासुद्धा विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यपुराणांच्या चालू धामधुमीत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा. The Rajah had many reekless and influential enemies, and particulary that he had incurred the enmity of the Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also, that there are no persons so unscrupulous as Brahmins when they have a Brahmanical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that, in such a cause the end hollows the means…… I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tribe as the nost numerous, virulent and influential. I may state that, upon political grounds, there exists mush jealousy and ill will on the part of that race to his Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys, results from the political overthrow of the Brahmin power. (भावार्थ – राजाचे आणि ब्राम्हण लोकांचे भयंकर हाडवैर होते. विशेषतः त्याचे मूळ धर्मविषयक तंट्यांत असल्यामुळे तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाखडीत असे. मी असे स्पष्ट म्हणतो की, या भटांना एकादी भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागेपुढे पाहत नाहीत; कारण त्यांना पक्के माहित असते की हेतू साध्य झाला की साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी होते कसली?...... राजाच्या दुष्मानांत ब्राम्हणांचा नंबर अगदी पहिला. शिवाय ते बरेच असून जितके ते राक्षसी व दुष्ट आहेत. तितकेच वजनदारही आहेत.

राजकारणाच्या बाबतीतसुद्धा ब्राम्हणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीने तर ब्राम्हण लोकांच्या डोळ्यात तो रात्रंदिवस सलत असतो. याचे कारण काय, तर पेशव्यांची ब्राम्हणी राज्यसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडीबहुत राज्यसत्ता जिवंत राहिली, हेच) सन १८४० सालचे हे उद्गार