बाजी प्रभु देशपांडे यांचा पोवाडा: Page 2 of 2

हटेना मागे । तो सिंह जसा खवळून लढतसे बहुत निकराने । निज हतबल तनु सावरुन ! पद पुढति न पडति न पडु दे अरिचा । जागींच ठेवि डांबून ! सैन्यास वदे, “ हो वीर ! शिवपदिं व्हा न बेकदर ! द्या शत्रुस बेदम मार ! हाणूनि पिटाळा जलदी । मजकडे बघु नका अगदीं” ! ।। ११ ।। रणधुमाळींत या घाव । बाजीच्या वर्णी बसला । रणशैय्येवरि मग पडला । अभिमन्यु दुजा तो गमला ! शिवचरणिं लागले चित्त । कंठात प्राण घुटमळला ! सरबत्ती परिसुनि कानीं जावोत प्राण मज त्यजुनी ! हा निश्चय मनिं दृढ धरुनी निज चमूस देई धीर । घनघोर चालवी समर ! ।। १२ ।। रणचमत्कार हा बघत । रवि आला माध्यान्हीला ! क्षण निश्चल होऊनि पाहे । नरवीर स्वमिभक्ताला ! करजाल समोरच पसरी । ह्रदयींच त्यास घेण्याला ! झडतांच गडावरि तोफा । संकेत नृपतिचा पटला ! ‘कृतकृत्य जाहलो’ वदलो! शिवराजयशीं रंगेला ! मनिं अणी प्रभुपदकमला ! नि: श्वास अंतिंचा त्यजुनी । रवितेजीं मिळुनी ।। १३ ।।