बाजी प्रभु देशपांडे यांचा पोवाडा

प्रबोधनकार हे कवी होते. नुसते कवी नाहीत तर ते शाहिर होते. त्यांनी लिहिलेले तीन पोवाडे आज उपलब्ध आहेत. तिन्ही बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरश्रीवर लिहिलेले आहेत.

(पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकायार्त आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या कवितेत वर्णिला आहे.) (चाल:-- उद्धवा, शांतवन.)

शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- ‘वीर हो! असा निकराचा । येई न समय बहू वेळां, पातली सुदैवें संधी । जनिं तुह्यां अमर होण्याला ! निज शौर्य शत्रुला दावा, रग पुरी तयाची जिरवा, नृपभक्तजनीं या मिरवा, क्षणभंगुर या देहाचीं । आपणांस परवा कसची!” ।। १ ।। “ जावोत आपुले प्राण । राहोत सुखी शिवचरण, हा हेतु मनीं दृढ धरुन । शत्रुची करा धुळधाण, विजयांती कीर्ति वराल । ना तरी अमरिं सुख पूर्ण । अंबिका-नाम गर्जून शिवचरण मनीं आणून समशेर चालवा कसुन” आवेशायुक्त या बोलें । रणमदें वीर फुरफरले ! ।। २ ।। मा-यांच्या रोखुनि जागा । जागजागिं मोर्च दिधले ! कमटेकरि, बरकंदाज, । एक्कांडे गोफणवाले, चहुंफेर धूम चालाया । गिरिदरीं वीर बसविलये, छातीचे निधडे बहुत झंजार वीर समवेत धरुनिया दबा खिंडीत जणु व्याघ्रचि बाजी बसला । सावजांस झडपायाला ! ।। ३ ।। तांतडिने धावत येतां । त्या स्थलास अरिची सेना घेउनी उडी लवलाही । मावळे उडविती दैना ! सर्वांच्या पुढती बाजी । ‘ असि ‘ धरुनि करावि थैमान ! अनिवार बघुनि तो मार जोहार मानसीं चूर परि फाजल खवळे फार देउनी धाक निज चमुला । उद्युक्त करी समराला ! ।। ४ ।। १ ) १. असि-तलवार, २. सिद्दी-जोहर, ३. फाजल-महमद दों दळे भिडुनि शौर्याने । भडिमार सारखा करिती ! चहुंकडुनि बाण सणसणती । गोफणगुंडे फणफणती, खणखणाति जवें तरवारी । रणवाद्ये नाना झडती ! गर्जती वीर बहुसाळ, खेंखाळति हय तेजाळ, जाहला समरकल्होळ, प्रतिशब्द तयाचे उठले । दरि, खोरीं, गिरी दुमदुमले ! ।। ५ ।। येउनी उपलिं आदळती । भंगतात जलधीवीची ! निर्दळी वीर तो पथकें । मा-यामधिं येतां अरिची ! भिडतसे धावुनी वेगें । मारुनी धडक जोराची ! गति चक्राकृति घेऊन, रवंदळी देइ उडवून, रक्ताने भूमि न्हाणून, चालवी शत्रुसंहार । गजयूथिं सिंहसा वीर ! ।। ६ ।। बेफाम रणमदें झाला । दृष्टि लाल धुंदी चढून ! तनु सर्व रक्तबंबाळ । अरिरुधिरामधिं न्हाऊन ! छाती न होत काळाची । ते बघण्या भीषण वदन ! आवेशें स्फुरती गात्रे करकरां चावि रदनांतें गर्जुनि ‘ जय हर ! हर! ‘ शब्दें पाडीत ढीग शत्रूचे । रणभैरव जैसा नाचे ! ।। ७ ।। अरिरुधिरि होउनी स्नात । न्हाणि तेविं भूदेवीला ! तद्दिव्य भव्यशा भाळीं । जयकुंकुम-मळवट भरिला ! विच्छिन्न करुनि शत्रुंच्या । तनु, लेववि भूषणमाला ! पूजी शिरकमलें अमित ! तत्प्राण निवेद्यीं देत ! पाजळुनि यशाचा पोत ! पथ दरिचा उल्लंघाया । बेहद्द’ यत्न अरि करिती ! हतवीर्य प्रतिक्षणिं बनुनी । किति जीव देति, किति पळती, डोंगरी मार्ग अडचणिचा । घसरुनी बहुत आदळती ! तैशांत मावळे वरुन पथिं दगड देति लोटून, बंदुका, गोफणी, बाण – वरि झडतां कुणिहि न परते । अरि, वृत्त कळविण्या चमुतें ।। ९ ।। झगडला जवें बहु काळ । शौर्याची शर्थ करुन ! परतवी शत्रुला कितिंदा । विक्रमें बहुत चिरडून परि अमित तयाची सेना । लोटती वीर उसळून बाजिशीं अल्प चमु उरली तनु फारचिं जखमी झाली रक्ताने न्हाउनि गेली ! तसुभरहि