बावला-मुमताज प्रकरण: Page 19 of 19

शवाची अशी हेळसांड होऊं देणें अयोग्य आहे. परंतु हिंदी राष्ट्र जित आहे तेव्हा त्यांतील राजा काय आणि रंक काय ते क:पदार्थ मानन्यात येणें साहाजिकच आहे परंतु अशा राष्ट्रांत जाऊन दोन्ही हातांनी पैसे उधळणा-या राजेमहारांना हीच योग्य शिक्षा आहे असे एकवार मनात आले तरी यात राष्ट्रीय अपमान होत आहे ही गोष्ट मनांत येते व त्यामुळें अशा प्रकारची चीड येणे स्वाभाविक आहे. आपले धनाढ्य लोक यावरून धडा घेतील काय ?” वरील मजकूर साप्ताहीक ज्ञानप्रकाश ता. १२ जुलै १९२५ च्या अंकातुन घेतला आहे हा ‘ राष्ट्रीय अपमान ‘ तर खरच, पण हा चिमटा बसण्याइतकी व भासण्याइतकी राष्ट्रीची मनोवृत्ति आत्माभिमानी (self- respecting ) राहिलेली आहे की नाहीं, याचा वास्तवीक शोध झाला पाहिजे. ‘ धनाढ्यांनी धडा घ्यावा ‘ ही नुसती एडीटरकीची सूचना झाली. त्याची किंमत तेवढीच. परराष्ट्रीय लोक आम्हां हिंदीजनांना गुलामांच्या दावणींतच बांधतात, हें काहीं नवीन सत्य नाहीं. ही फार जुनी आणि रास्त परंपरा आहे. पश्न एवढाच कीं परराष्ट्रीय लोक आम्हांला फाटक्या पायताणा एवढाहि किंमत देत नाहींत हें त्यांच्या स्वातंत्र्याला व स्वयंनिर्णयाला खास शोभते; परंतु आम्ही हिंदी लोक तरी एकमेंकाचा असा काय मोठा आदर राखतो, तर या परकीयांनी आमच्या ख-या खोट्या राष्ट्रीयत्वाला पंचा रत्या ओवाळून आमच्या माणुसकीला मान्यता द्यावी ? आमच्या स्वदेशी पुरुषोत्तमांची , व स्त्रयंनिर्णयी नृपतीची आम्ही काय अशी इज्जत राखतो, तर त्यांची फ्रेंच इंग्लंड जर्मनीवाल्यांनी किंमत राखावी ? ज्या राष्ट्राला स्वाभिमानच नाहीं, त्यानें ‘ राष्ट्रीय अपमानाचे चोचले ‘ मिरवू नये, हेंच चांगले ! Printed & published by :- K. S. Thackeray At ‘ PRABHODHAN PRESS’ 345 sadshiv peth POONA CITY