बावला-मुमताज प्रकरण

बावला मुमताज प्रकरणा त इंदौरचे तत्कालीन संस्थानिक तुकोजीराजे होळकर यांची बदनामी करण्यात आली. प्रबोधनकार तुकोजीराजेंच्या बाजूने उभे राहिले. त्यासाठी त्यांनी तीन पुस्तकं लिहिली. प्रबोधनाच्या त्या बजरंगी सोट्या चे या पुस्तकात दर्शन घडते.

(मुंबई येथे सुप्रसिद्ध ‘ मुंबई समाचार ’ या गुजराथी दैनिकांत “ नामदार इंदोर महाराजांनी निर्दोषता ” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या एका गुजराथी लेखाचा सारांश खालीं देत आहोंत. सं. प्र. )

आपण प्रथम हें लक्ष्यांत घेतले पाहिजे कीं, मुमताज ही महाराजांच्या जवळ एक विश्वासपात्र अशी स्त्री म्हणून राहिलेली होती. तिच्याजवळ दिलेल्या ५०।६० लाखांच्या जवाहिरावरुन तिच्यावर महाराजांची किती मेहेरबानी व केवढा विश्वास होता हे सिद्ध होतें. परंपरा पाहिली तर असें दिसतें कीं, एखादी स्त्री, मग ती कितीही हलक्या कुटुंबांतली असो, हलक्या धंद्याची असो, हिंदु असो वा मुसलमान असो, तिला जर एखाद्या राजामहाराजाने किंवा बादशहाने आपली स्त्री मानिली तर तिला प्रत्यक्ष राणी इतकाच मान मरातब देण्याची वहिवाट आहे. याचे दाखलेच पाहायचे असतील तर गुजराथी, काठेवाड आणि हिंदुस्तान येथें रगड आहेत. तेथें हिंदुराजांत मुसलमान रखेल्यांपासून झालेली मुले त्या त्या राजांची संततीच म्हणून गणली जातात. मुमताज ही मुसलमान असूनसुद्धां हिंदु नरेशाच्या प्रीतीला पात्र झाली आणि तिचा दर्जा व मानमरातवहि प्रत्यक्ष राणीसारखाच होता. स्वत:ची योग्यता नीट अजमावून, मुमताज इमानानें महाराजांजवळ राहाती तर तिच्या पोटीं जन्मास येणारीं मुलें राजवंशीय म्हणूनच गणली गेलीं असतीं. मुसलमान रखेल्यांच्या पोटीं हिंदु राजांना झालेले राजपुत्र राजगादीचे मालक झाल्याचीं उदाहरणे काठेवाडांत घडलीं आहेत.

अशाच प्रकारची स्थिति प्रस्तुत संबंधानें कल्पिल्यास अगदींच अशक्य असें काहीं नव्हतें. प्रस्तुत संबंधांत अर्थात् एक समर्थ, लाखो प्रजाजनांचा मालिक, मोठ्या साम्राज्याचा नृपति आणि कोट्यावधि रुपये उत्पन्नाच्या भूमीचा सत्ताधारी अशा महाराजाधिराजाच्या राणीच्या पदवीला जाऊन बसलेली स्त्री-ती कोण आणि तिचा दर्जा केवढा !- अशी स्त्री नरेशाशीं बेमान होऊं शकेल काय? आणि त्या स्त्रीवर पापदृष्टीनें नजर टाकण्याची कोणाची तरी नजर होईल काय? आणि कोणी तशी नजर टाकली तर त्याला देहान्त दंडाशिवाय दुसरी कोणती शिक्षा मिळाल्याशिवाय राहील? सामान्य जनसमाजासाठीं केलेले कायदे राजेमहाराजांना मुळींच बंधनकारक होऊं शकत नाहींत. ‘ नराणांच नराधिप: ’ अशा महाराजाधिराजानें स्वीकारिलेली, राणीच्या पदवीला चढलेली स्त्री स्वच्छंदी बनली, इतरे जनासारखी दुष्ट वृत्तीची झाली आणि उघडमाथ्यानें परपुरुषाशी व्यभिचार आचरुं लागली, हा काय तिचा लहानसहान अपराध ? आणि अशा स्त्रीशीं जारकर्म करणारा नराधमही काय लहानसहान पापी आणि गुन्हेगार समजावयाचा? मुमताज नर्तकी आहे, गायिका आहे, की हलक्या कुलशीलाची आहे, या मुद्द्याची येथें जरुरच नाहीं. आम्ही असे किती तरी दाखले दाखवूं शकूं कीं, हलक्यांतल्या हलक्या कुळांत जन्मलेली अथवा जन्मानें मुसलमान असलेली, परंतु राजाच्या कृपेनें राणीपदाला चढलेली, अशा स्त्रीला आजपर्यंत सर्वांनीं प्रत्यक्ष राणीच मानिली ; आणि त्या स्त्रीच्या पोटीं जन्मलेले पुत्र राज्याचे अधिकारी झाले. त्यांना चालू कायद्यानें आणि प्राचीन सनातन धर्मस्मृती पुराणांनींसुद्धां मान्यता दिलेली आहे. आमच्या सनातन धर्म शास्त्राप्रमाणें आणि मुसलमानी धर्माप्रमाणें एखाद्या राजामहाराजाच्या किंवा बादशहाच्या प्रीतिपात्र स्त्रीशीं जर एखादा अन्य पुरुष व्यभिचाराचा गुन्हा करील तर ती बेईमान स्त्री व तो पुरुष या दोघांनाही देहांत दण्डाची शिक्षा फर्मावली आहे.

मुमताजच्या बाबतींत एवढें स्पष्ट आहे कीं ती अकरा वर्षे वयापासून, म्हणजे कौमार्यवस्थेपासूनच महाराजापाशी राहात होती. तेव्हापासून तो ती तेथून पळून जाईपर्यंत तिनें आपल्या शीलाचा भंग परपुरुषाने केला नव्हता. आम्हाला कळलेली गोष्ट जर खरी असेल, तर असे समजते की मुमताजला कमळाबाई हे नामाभिमान प्राप्त होण्यपूर्वी तिला विधिवत् प्रायश्चित्त देऊन तिचा संस्कारपूर्वक हिंदुधर्म प्रवेशविधि व तदनंतर महाराजाबरोबर तिचा शास्त्रशुद्ध पाणिग्रहण विवाहविधि झाला होता. ही गोष्ट खरी असो वा खोटी असो, ती काही थोड्या व्यक्तींनाच माहीत असो