बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 7 of 22

स्थळ, काळ, वेळ, मुहूर्त, अध्यस्थी-मध्यस्थी सर्वांचा बिनचूक तपशील दिला. आणखी काय पाहिजे ? घबाडाचा पत्ता सागणारा देव ज्याच्या कुठाला स्वामी त्याला काय पडणार कमी. सुंदराबाई आपल्या अर्जातल्या कहाण्या अशा भाबड्या बहाण्याने रंगवू सांगतात की त्या जशा का सहज घडल्या. पण हे लग्न म्हणजे
इंदोरस्थ भटांचा एक गुप्त कट
होता, हे सिद्ध करायला फारसा त्रास पडणार नाही. सुंदराबाईच्या विधानांच्या सर्व खुलावटी किती खोडसाळ बनावटीच्या आहेत, हे यथाक्रम दाखवावयाचे आहेत. गोविंदरावांचा वरील अर्ज गेल्यावर २६ जानेवारी १९१५ रोजी चीफ मिनिस्टर दि. ब. खांडेकर यांना स्मरणार्थ पाठविलेल्या अर्जात –
“मुलीला सरदार दिवाण पळशीकर यांना द्यावी व काय करावे असा मला दैविक दृष्टांत झाल्यावरून.. माझा पक्का निश्चिय श्री. दिवाणसाहेब यांस मुलगी देण्याची झाला आहे. तरी याबद्दल विचार होऊन हुकून लवकर व्हावा.”
यावरून गोविंदरावांचा निश्चिय किती व कसा वज्रापाय झाला होता त पहा आणि सुंदराबाईच्या विधानातील साळसुदपणा पहा –
“दिवाणांच्या जहागिरीचे व्यवस्थापक रा. रणदिवे हे स्वतः बारकाईने वधूच्या लायकीकडे व गुणांकडे लक्ष देत असत व प्रत्येक वधूची परीक्षा त्यांच्यापुढे होई. अखेर सर्व मुलींमध्ये माझीच (सुंदराबाईची) दिवाणाची भावी वधू म्हणून निवडणूक झाली.”
हे विधान अक्षरशः खोटे व वस्तुस्थितीचा सपशेल विपर्यास करणारे आहे. प्रकृतीच्या बेतालपणामुळे जेथे दिवाणांच्या लग्नाचा प्रश्न मुळी उद्भवला नव्हता, तेथे रा. रणदिव्यांना वधु शोधनाच्या सफरीवर सफरी करण्याचे आणि सुंदराबाईला ‘दिवाणांची भावी वधू’ म्हणून निवडण्याची जरूरच होती कोठे ? वधूची निवड करणारे रणदिवे कोण ? ते जहागिरीचे व्यवस्थापक असलेतरी वेडा दिवाण सरकारचा ‘वार्ड’ असल्यामुळे त्याचे लग्न करणे वा न करणे हा खुद्द महाराज सरकारच्या विचाराचा प्रश्न होता. रणदिव्यांना या बाबतीत कसलाही हुकूम नव्हता आणि त्यांनी सुंदराबाईंची वधु परीक्षा घेऊन तिची केव्हाही निवडणुकही केलेली नव्हती. इतकेच नव्हे तर मार्च १९१५ त, दिवाणांच्या प्रकृतीमुळे त्यांचे लग्न करण्याच्या भरीस न पडता दत्तविधानासाठी मुलगा शोधण्याची महाराजांनी ऑर्डर सोडली होती. मग रणदिव्यांवर वधु निवडणुकीचा आरोप सुंदराबाई कोणत्या तोंडाने करतात ? सुंदराबाई लबाड बोलतात. पुढची लुच्चेगिरीची वकीली विधाने पहा –
“दिवाणाचे व माझे लग्न करावे की नाही याचा माझ्या वडिलांस मोठा प्रश्न पडून त्यांच्या मनाची चलबिचल होऊ लागली. दिवाणांचा दर्जा समाजात मोठा होता. त्यांची संपत्ती अलोट होती, परंतु या सर्व गोष्टींवर विरजण घालणारी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे त्यांचा फेफऱ्यांचा विकार हा होय. या प्रश्नावर माझ्या वडिलांनी पुष्कळ विचार केला. पण तो त्यांना समाधानकारक रीतीने सुटेना. दिवाण पळशीकर यांची मावशी गीताबाई यांनी येऊन माझ्या वडीलांना फारच गळ घातली. (गोविंदरावाने २९ ऑक्टोबर १९१४ ला पहिला अर्ज दिला व जानेवारी १९१५ रोजी दि. व. खांडेकरांना आपला वज्रनिश्चिय कळविला, तेव्हा गीताबाई इंदोरात तरी होती काय ? गोविंदराव किंवा सुंदराबाईने तिचे तोंड तरी पाहिले होते ? ही जगदंबा मागाहून या कटात घुसलेली. आणि म्हणजे वडिलांना फारच गळ घातली.)” अखेर घरच्या देवीने जर या लग्नाला आपली संमती दिली तरच मी आपली कन्या दिवाणांना देईन असे माझ्या वडीलांनी त्यांना सांगितले. मनातल्या काळजीच्या योगाने माझ्या वडिलांना स्वप्नामध्ये देवीचा दृष्टांत झाला व देवीने आमच्या लग्नाला संमती दिली.”
गीताबाईचा गळ गोविंदरावांच्या गळ्यात
पडला म्हणून तो या वेड्या व फकीर पिराला आपली मुलगी देण्याच्या भरीस पडला, हे जर खरे, तर पुन्हा मार्च १९१५ मध्ये त्याने चीफ मिनिस्टरला केलेल्या खालच्या अर्जातील विधानांची संगती कशी काय लागते किंवा लावावी, ते वाचकांनीच आजमावून पहावे. गोविंदराव या अर्जात म्हणतो –
“दिवाणसाहेब पळशीकर यास मी मुलगी देण्यास तयार आहे तर त्याचे लग्नाबद्दल परवानगी मिळावी म्हणोन दोन अर्ज केले परंतु अद्याप पावेतो हुकूम मिळाला नाही. लग्नाचे मुहूर्त जवळ येत आहेत. आमचा मुख्य हेतू श्री.