बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 6 of 22

सरकारकडून या लग्नाला संमती मिळणार अशी त्याची (हितचिंतकांची) व त्यांच्या भोवती असलेल्या अधिकारी वर्गाची खात्री होती.”
लोकव्यवहारात अनेक ---------------------- (पान क्रमांक १३, शेवटच्या दोन ओळी)
मोली बहुगुणी फास आहे की त्याचा फास पडताच फासावर न चढता वाटेल त्याच्या फासात वाटेल तेवढी संपत्ती पशी पडते. जरठ कुमारी-विवाहाचे मूळ याच फासेपारधीपणात सापडते. केवळ संपत्तीकडे पाहून आपल्या कोवळ्या अज्ञान मुलीची लग्ने प्रत्यक्ष प्रेताशी लावण्यात ज्या ब्राह्मण समाजाची मनोवृत्ती कधी बाचकली नाही किंवा शरमली नाही, त्याच ब्राह्मण जातीतल्या गोविंदराव निघोजकरानी आपला १२ वर्षांची अल्लड सुंदराबाई पळशीकर दिवाणाच्या सपत्तीवर लक्ष देऊन, त्या फेफऱ्या वेडपिराच्या गळ्यात बांधण्याचा उपद्व्याप का करू नये ? या उपद्व्यापातच
सुंदराबाईच्या दुर्दैवाचे मूळ
आहे. वेडापीर तर वेडापीर, पण पोरीचे तर कोटकल्याण होईल. शिवाय आपण काय पेनशनर बुद्रुक, काम ना धाम. पोर पडलीच दिवाणाच्या पदरात तर एवढ्या मोठ्या जहागिरीची दिवाणगिरी माझ्या नाही तर कोणाच्या पदरात ? शिवाय हा लग्नाचा सट्टा जमलाच तर भाडोत्री हितचिंतक नात्यापेक्षा रक्ताची हाडामासाच्या नात्यात आयतेच प्रमोशन मिळणार, या कल्पनेच्या धाब्यावर गोविंदरावने अचाट कारस्थानाचा पाया घातला. दिवाणा कृष्णराव दिवाण हा सरकारचा ‘वार्ड’ झाल्यामुळे खासे सरकारी हुकुमाशिवाय त्याच्या कपाळी मुंडावळ्या बांधणे कोणालाच शक्य नव्हते. म्हणून पहिल्या प्रथम सुतोवाचे अर्ज गोविंदरावाने इंदोराधिपतींकडे पाठविला. पळशीकर दिवाणांची पहिली बायको १९१३ च्या सुमारास वारली. खाली उदृत केलेला गोविंदरावांचा पहिला अर्ज २९ ऑक्टोबर १९१४ रोजी पाठविला गेला तो असा – “आज रोजी प्रात काळी सुमारे चार-पाच वाजण्याचे सुवेळी आमचे कुळस्वामी ब्राह्मण रुपीने माझ्या स्वप्नात आले आणि मला आज्ञा केली की, तुझी मुलगी लग्नाचे योग्य झाली आसल्याने तिचे लग्न व्हावे अशी तुझी इच्छा आहे व तू स्थळ पाहण्याचे विचारात आहेस. तरी येथील श्री. पळशीकर दिवाण यांचे कुटुंब हल्लीच देवलोक झाले आहे. सरकार त्यांचे दुसरे लग्न करणार आहेत. तरी त्याजला मुलगी द्यावी. मी विनंती केली, की दिवाणसाहेबांस मिरगी येत असल्याने ते बिमार राहतात असे स्थितीत आपण होऊन तेथे मुलगी कशी द्यावी, त्याजवरून पुनः आज्ञा झाली की, ही गोष्ट परमेश्वर इच्छेने होणे ठरली आहे. लग्न झाल्यावर प्रकृती चांगली होईल. तेव्हा मी विनंती केली की, माझे गरीबाची दाद कशी लागावी. त्याजवरून पुनः आज्ञा झाली त्याजकडील काम पाहणारे सांगरपाणी डॉक्टर आहेत, त्यांस हकीगत कळवावी म्हणजे ते खटपट करतील व कार्य होईल. इतके सांगून अदृश्य झाले व मी जागा झालो.”
“मी जुन्या चालीचा गृहस्थ असल्याने माझी परमेश्वरावर पूर्ण निष्ठा आहे. यामुळे त्याचे आज्ञेप्रमाणे मला करणे आहे. दिवाणसाहेबांची प्रकृती नीट नसते हे मी ऐकतो आहे. मुलीचे कल्याण व्हावे ही माझी इच्छा आहे. तथापि परमेश्वर वचनावर भरवसा ठेवून मी मुलगी त्याजला निश्चयाने देण्यास तयार आहे. त्याचे व माझे गोत्र जुळत आहे. मुलीची पत्रिका नसल्याने मी प्रीतिविवाह करण्यास तयार आहे.”
“दिवाणसाहेबांचे सर्व रीतीने चांगले करणे सरकारचे आधीन आहे. मीही सरकारचे पदरीच आहे. मी गरीब स्थितीत असल्याने माझे शक्तीप्रमाणे मुलीला पिवळी करून अर्पण करीन. उभय पक्षाकडून कार्य करविणार सरकार समर्थ आहेत.”
“मार्गशीषात मुहुर्त आहते. लग्न लवकर लावण्याबद्दल स्वप्नात दृष्टांत झाला आहे ------------------------------------ - (पान क्रमांक १५, शेवटची ओळ)”
१२ वर्षाचे आहे. लिहिता वाचता येते. मराठी तिसरे इयत्तेत शिकत आहे.
“येणेप्रमाणे कलमवार मजकूर सेवेशी श्रुत केला आहे. सरकारनी कृपा करून हे कार्य करण्याचा हुकूम द्यावा. हा हुकूम लवकर होईल अशी पूर्ण आशा आहे.”
“माझ्या वडीलांना कुठच्याही गोष्टीत गुप्तपणा ठेवणे किंवा व्यवहारी जगाच्या नियमाने आपले कार्य साधणे आवडत नसे. ही सुंदराबाईची सारवण मुमताझी मुत्सद्देगिरीची नाही असे कोण म्हणेल ? गोविंदराव निघोजकर म्हणजे भोळा सांब. कुळस्वामीचे दृष्टांत झाला नसता तर तो थोडाच या लग्नाच्या फंदात पडणार, पण करतो काय बिचारा. कुळस्वामीने