बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 5 of 22

येत असे की त्यांना नाईलाजाने आपले नैसर्गिक विधी कोंडून ठेवेल्या जागेतच करावे लागत व दिवाच्या वेडेपणाचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून अधिकाऱ्यांकडून या गोष्टी पुढे करण्यात येत असतं. फेफऱ्याच्या विकाराशिवाय त्यांना कसलीही व्याधी नव्हती व त्या विकाराच्या लहरींशिवाय त्यांचे वर्तन अगदी शहाण्या माणसांप्रमाणे असे.
वरवर पहाणाराला हे वर्णन म्हणजे सत्यनिरुपणाचा काढा वाटणे साहिजक आहे. सुंदराबाईची व या वेड्या दिवाणाची जन्मात एकदाच नजरभेट आणि तीही कारस्थानी जबरीने लागत असलेल्या लटूमटूच्या ‘शुभ मंगल’ प्रसंगी. तीही १०-१५ मिनेटे. त्यावेळी सुंदराबाईचे वय सुद्धा किती म्हणाल ? तर अवघे १२. आणि दिवाणाना कसला विकार जडला आहे, तोही सांगणार ! दिवाणाच्या प्रकृतीवर खास देखरेख करणार डॉक्टर गाढव, इस्टेटीची व्यवस्था पाहणारा अधिकारी लुच्चा, होळकर सरकार दुष्ट, एवढेच जिला सिद्ध करावयाचे, त्या जहांबाज तरुणीच्या तोंडाला तोंड कोणी द्यावे ? पण वस्तुस्थिती कशी आहे आणि विपर्यास कसा चालविला आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला
डॉ. शारंगपाणी यांचीच जबानी
विचारात घेणे अवश्य आहे. प्रकृतीच्या भानगडीत डॉक्टर, वैद्यांची साक्ष ग्राह्य धरायची नाही, तर काय हजामाची धरायची ? सुंदराबाईच्या बापाची धरायची ? सासुबाई अन्ड कंपनीची धरायची का मोतद्दारांची धरायची ? डॉ. शारंगपाणी म्हणतात –
“दिवाणसाहेब वाद्य वाजवितात, पत्ते खेळतात, गायन शिकवायला वस्ताद आला म्हणजे त्याच्या निरनिराळ्या रागातले स्वर वगैरे त्यांना समजतात, परंतु आपल्या सभोवार काय काय चालले आहे, हे त्यांना नेहमीच नीटसे समजते असे मुळीच नाही. त्यांना स्मरणशक्ती मुळीच राहिलेली नाही. १० मिनिटांपूर्वी पाहिलेला माणूस पुन्हा ओळखण्याची पंचाईत. १९१५ साली हीच अवस्था होती. अपस्माराच्या झटक्यामुळे हे असे झाले आहे. प्रत्येक झटका १ ते २ मिनिटांपर्यंत टिकतो. पुष्कळ वेळा तर ते आपल्या मुलीलाही ओळखत नाहीत. हा अपस्मारोत्तर भ्रंश आहे. मला ते डॉक्टर व मॅनेजर म्हणून ओळखतात. घरातल्या माणसांना ओळखतात. दिवाणसाहेब काही वेळा चांगले शुद्धीवर असतात आणि काही वेळ भ्रमिष्ट होतात. मी १९१५ पासून दिवाणसाहेबांचा मॅनेजर व डॉक्टर आहे. मला त्यांना दररोज भेटावेच लागते. त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती आता (१९२०) आहे त्यापेक्षा पूर्वी मुळीच बरी नव्हती. कोणत्याही बाबतीत त्यांना मुद्देसुद व ताळेबंद भाषणही बोलता येत नाही. ते बिथरले म्हणजे त्यांना अवरण्यासाठी ठेवलेल्या नोकरांविरुद्ध ते कधी कधी तक्रार करतात. पण ही सुद्धा तात्पुरतीच लह. १० मिनिटांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी कोणत्याही एखाद्या गोष्टीची त्यांना आठवण सुद्धा राहत नाही. ------------------------------------------------------------------------- ” (पान क्रमांक १२, शेवटची एक ओळी)

शारिरीक व मानसिक प्रकृती इतक्या दुराराध्य व कष्टप्रद अवस्थेला पोहचेल्या आपल्या एका श्रीमंत सरदाराच्या जहागिरदारीची व्यवस्था इंदोर सरकारने आपल्या देखरेखीखाली न ठेवावी, तर काय ‘हितचिंतक अन्ड कंपनी’सारख्या बाजार बुणग्यांच्या बारभाईत तिचे बारा वाजवून घ्यावे ? पण सरकारी कदरेची छाया पडल्यामुळे ज्यांच्या मतलबावर पाणी पडले, त्यांनी सुंदराबाईप्रमाणे उधळपट्टीच्या दडपशाहीच्या, अन्यायाच्या, अमानुषतेच्या, अनीतिच्या, वंशपरंपरा, हक्काच्या कितीही कर्कश किंकाळ्या मारल्या, तरी त्यातले खरे रहस्य कोणाला कळतच नाही, किंवा कळणार नाही, असे थोडेच आहे ? आधीच भटाची जात म्हणजे लोचट, अवचट, हातात आलेला एवढ्या मोठ्या मालमत्तेच्या लोण्याचा गोळा चुटकीसरसा हातातून निसरल्यावर इंदोर सरकारच्या नावाने गुजराथी ऊर बडवून घ्यायला ‘हितचिंतका’च्या छावण्या भिजक्या हरभऱ्याप्रमाणे टवरून का फुटणार नाहीत ? २५-३० हजाराच्या सालाना उत्पन्नाची जहागिर, जहागिरीदार तरुण पण वेडसर व खुळा, पहिली बायको वारल्यामुळे पत्नीपदाची जागा रिकामी, अशा अवस्थेत एवढ्या मोठ्या घराण्याचा वंश पुढे चालावा म्हणून आपापल्या परीने घबाड लाटणाऱ्या ‘हितचिंतका’च्या सेना भराभर इंदोरात जमू लागल्या, सुंदराबाई म्हणतात –
“दिवाणासारख्या वंशपरंपरागत जागेला वारस असणे ही सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय म्हणून दिवाणाचे दुसरे लग्न होणे अत्यंत आवश्यक होते व अशा वेळी त्यांना अडथळा करणे मुर्खपणाचे होते. दिवाणाच्या हितचिंतकांनी त्यांच्यासाठी वधू शोधण्याचे काम जारीने सुरू केले. कारण