बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 4 of 22

या तरुण श्रीमंतीकडे वळणार नाही ? फंडगुंडाप्रमाणे हिंतचिंतकाचे पेव फुटणार नाही ? कोरून उकरून काढलेल्या नात्यागोत्याच् गोतावळ्यांना त्या ‘बिचाऱ्यांचा लळा का येणार नाही ? त्यातून दिवाणांना फेफऱ्याचा विकार ! गोतावळ्यांनी व विशेषतः दिवाणांच्या रक्तामासांच्या जातभाई ब्राह्मणांनीच जर आपल्या आतड्यांना पीळ पाडले नाहीत, तर हो काय ? दृष्ट इंदोर सरकार सारी जहागीरीच्या जहागिर गिळंकृत करून बसायचे ! स्वराज्य गेले तरी हरकत नाही, पेशव्यांच्या ऐवजी इंग्रज आले तरी कुछ फिकरी नाही, छत्रपतींचे छत्र फाटले किंवा पेटले तरी त्याची पर्वा नाही, पण जाहागिर ? ब्राह्मणांची जहागिर ? छे छे ! ती कशी जाऊ द्यायची ! जहागिरदार फेफऱ्या असला, वेडा असला, निर्मार्तुक असला, विधूर असला, तर दत्तक आई व दुसरी बायको पुरविणारे हितचिंतक काय सारे आजच मेले ? इंदोर सरकार या जहागिरीत ढवळाढवळ करणार कोण ?
दिवाण इंदोर सरकारचा कोण ? कोणी नाही. स्वयंभू अधिकारी, पुरातन सरदार, अखंड जहागिरदार, खुद्द पेशव्यांनी होळकरांप्रमाणेच त्यांच्या दिवाणाचीही वंशपरंपरागत नेमणूक करून दिलेला ब्राह्मण राजा. असल्या अनैतिहासिक, भिक्षुकी, म्हणूनच मुर्ख कल्पनांनी शकिराचा इतिहास व्हाईसरॉय साहेबांना शिकविताना सुंदराबाई पांडित्य करतात की –
“मराठी राज्याचे लहान लहान भाग होऊन त्याची संस्थाने बनली, व पेशव्यांच्या सत्तेला उतरती कळा लागली. त्यावेळी पेशव्यांनी होळकर सरकारची इंदूर येथे वंशपरंपरागत नेमणूक केली व उत्तर हिंदुस्थानचे आपले प्रतिनिधी म्हणून त्यांना इंदूर येथे ठेवले (ब्राह्मणांचे धनगरांवर उपकार). होळकर सरकारच्या नेमणूक करण्यात आली आणि त्यांना चरितार्थासाठी इंदूर संस्थानच्या हद्दीत व बाहेरही स्वतंत्र जमीन जहागिर म्हणून तोडून देण्यात आली.” (पान क्रमांक ९, वरील शेवटच्या तीन ओळी इथे टाईप करयाच्या आहेत.)
लहा विलक्षण इतिहास वाचून व्हाईसरॉयसाहेब अगदी चारीमुंड्या चीत झाले असतील. इंदोर सरकारच्या पोटात हे स्वतंत्र व स्वयंनिर्णयी भिक्षुकी नृपतीचे सल पेशव्यांच्या कृपाप्रसादाने अजून शिल्लक असल्याचे व्हाईसरॉय साहेबांना काय माहीत ? पण सुंदराबाई इतिहासबहाद्दर. वय १९ वर्षांचे, पण वीस पिढ्यांची खडा न् खडा माहिती. पळशीकर दिवाण स्वतंत्र, त्यांची जहागिरी स्वतंत्र, पेशव्यांचा खास प्रसाद, होळकरांची त्यांच्यावर काय सत्ता ? इतकी सुंदर ऐतिहासिक पुराव्याची माहिती सुंदराबाईशिवाय कोण देणार ? म्हणून त्या पुढे म्हणतात –
दिवाणावर वेडेपणाचा आरोप
दिवाणांना फेफऱ्याचा विकार असल्यामुळे त्यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर त्यांची हितचिंतकांनी (?) दिवाणाच्या सासूला बोलावून आणले व त्यांच्या दोन विधवा मुलीही आल्या. थोड्याच दिवसांनी इंदूरच्या दरबारी माणसांची दिवाणांच्या घरी ये जा सुरू झाली. (जहागिरीच्या व्यवस्थेचा मामला ‘सासुबाई हिंतचिंतक अन्ड कंपनी’ वर सोपविण्याइतके दरबाराला गाफील राहून चालणार नाही, सुंदराबाई)
दिवाणांना हे फारसे आवडल नाही. (दिवाणांना की सासुबाई अन्ड कंपनीला ?) इंदूरच्या महाराजांनी काही दिवसांनी असा हुकूम काढून संस्थानातील व संस्थांना बाहेरील सर्व मालमत्ता सरकारनी आपल्या ताब्यात घेतली. (अरेरे ! काय हा दुष्टपणा ? सासुबाई हितचिंतक अन्ड कंपनीला काय या मालमत्तेने स्वराज्य चालविता आले नसते ?) दिवाणांची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊनच सरकार स्वस्थ बसले नाही तर दिवाणांच्या कुटुंबावरही पहारा (पान क्रमांक १०, वरील शेवटच्या दोन ओळी इथे टाईप करायच्या आहेत.)
ठेवण्यात आला व दिवाणांची मालमत्ता व शरीरसंरक्षण करण्यासाठी वर्षाला १२५०० रुपये मंजूर करण्यात आले. दिवाण वेडे नसताना त्यांच्यावर हा वेडेपणा मुद्दाम लादण्यात आला होता व त्यासाठी वरील रकमेसारख्या मोठ्या रकमेची दिवाणाच्या नावावर उधळपट्टी चालवण्यास सुरुवात केली. (उधळपट्टी नाही तर काय ? सर्व मालमत्त सासुबाई हितचंतक अन्ड कंपनीच्या हातात असती, तर जहागिरीचा, मालमत्तेचा, लवाजम्याचा, कारकूनी गाद्यांचा, गाडी घोड्यांचा, जेवणाखाण्याचा दिवाणाछ्या फेफऱ्याचा सर्व बंदोबस्त आतड्यांच्या कळवळ्याने ठाकठीक कसोशीने लागला असता आणि हिशोबाच्या कागदावर फुटक्या कवडीचाही ----- उमटला नसता) (पान क्रमांक ११, शेवटच्या ओळीतील शब्द)

)एवडेही करून दिवाणाची योग्य निगा राखण्यात येत नसे. कित्येक वेळा तर त्यांना इतका वेळ कोंडून ठेवण्यात