बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 3 of 22

स्थानाविरुद्ध जी एवढी बोंबाबोब चाललेली आहे ------------------- (पान क्रमांक ५, शेवटच्या दोन ओळी)
लोकमताच्या आरोग्यावर होणारा चमत्कारीक परिणाम यापुढे तरी अधिक विपर्यस्त होऊ नये, आणि खरी वस्तुस्थिती जगापुढे येऊन या प्रकरणाची शहानिशा व्हावी, एवढाच हेतू या लेखाच्या मुळाशी आहे. सुंदराबाई या बाईचं असल्यामुळे त्याच्या धुसफुसण्यात आणि त्राग्यातही एक प्रकारचा विलक्षण करुण रस ओतप्रोत रसरसलेला दिसला, तर ती एक निसर्गसिद्ध मोहीनी आहे, आश्चर्य नव्हे, पण तिच्या तक्रारीचा एकांगीपणाच तेवढा विचारात घेऊन, त्यावर इंदोर दरबाराच्या
नालीस्तीचा कलमकसायीपणा
गाजिण्यास बरीचशी पोरसवाद एडीटरे अहमहमिकेने पुढे यावी याला आश्चर्य म्हणावे की नादानपणा ? एडीटरकीच्या दिमाखाने न्यायमूर्तींची ऐट मिरवणाऱ्या या पोटभरूंना ‘प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात’ एवढेही समजू नये हे बुद्धिमांद्य का गाळीव मुर्दाडपणा ? एक शहाणे एडीटर बरळतात “या (सुंदराबाईने व्हाईसरॉयला केलेल्या) अर्जाने अलीकडे इंदूरच्या दरबारी गोष्टीत काय काय कारस्थाने केली जात असत व दरबारी धोरण कसे राखण्यात येत होते, ते चांगल्या प्रकारे समजण्यास हरकत नाही.” एडीटर म्हणजे चित्रगुप्ताचा अवतार. सुताशिवाय स्वर्गाला जाणारा. सुंदराबाईने व्हाईसरॉयला अर्ज केला, याच गोष्टीचे त्या बेट्याला महत्त्व वाटले. लागलेच तेवढ्यावरून या क्षुद्राला इंदोर कळले, दरबार समजला, कारस्थाने उमजली, दरबारी धोरण आटोक्यात आली, सर्व काही सिनेमा-फिल्म प्रमाणे फटाफट चांगल्या प्रकारे ‘हरकत नाही’ इतके पेटले. एवढा हा दिव्य विश्वदर्शनाचा प्रकार का घडून आला ? तर सुंदराबाईने व्हाईसरॉयला अर्ज दिला ! खरेच, केवढा हा लोकोत्तर चमत्कार ! न भूतो न भविष्यति. कारकुंडेगिरीप्रमाणे एडीटरक्या खतवायला टारगट पोर बेसुमार मरती. जोपर्यंत महाराष्ट्रात होत आहे, तोपर्यंत असे पराच्या कावळ्याचे लोकोत्तर चमत्कार घडविणे या एडीटरांची ‘शाई भरल्या हाताचा मळ’च म्हटले तरी चालेल. ज्या मतिमंदांनी ब्रिटीश रियासतीत वर्तमानपत्री शब्दरचनेपलिकडे मुत्सद्देगिरीची ओळख नाही, पोटापलीकडे शास्त्र माहीत नाही आणि हुलुडगिरी पेक्षा नीतीचा व न्यायशास्त्रांचा स्पर्श नाही, त्यांनी नुसत्या एका बाईच्या एकतर्फी बरळण्यावर ‘दरबारी धोरणा’चे आंद्यत नखशिखांत चटकन् पारखल्याची मिजास मारणे, ही मनोवृत्ती आमची स्वराज्यविषयक लायकीचं सिद्ध करीत आहे काय ?
ही सुंदराबाई कोण ?
“माझे वय सध्या १९ वर्षांचे असून मी सज्ञान आहे व माझ्यावर ओढवलेल्या दुर्धर स्थितीची मला पुरती कल्पना येऊन चुकलेली आहे.” एकंदर पुढील इतिहास पहाता स्थितीच्या दुर्धरपणाबद्दल कोणाचेही दुमत होणे शक्य नाही. उलट सुंदराबाईच्या बापानेच केलेल्या तिच्या बलीदानाबद्दल उत्कट करुणा मात्र उत्पन्न होते. परंतु या ‘दुर्धर स्थिती’ची जबाबदारी खरी कोणावर पडते. याविषयी सुंदराबाईची कल्पना मात्र अक्षरशः चुकलेली आहे. “माझ्या वडिलांचे नाव गोविंदराव गणेश निघोजकर असे असून ते इंदूर संस्थानचे एक पेन्शनर आहेत.” सुंदराबाई ही एका पेन्शनर भट गृहस्थाची कन्या. एवढाच तिचा इतिहास. आता
कृष्णराव रामराव पळशीकर
हे कोण ? इंदोरात हे पळशीकर दिवाण नावाने प्रसिद्ध आहेत. हे पळशीकर घराणे ‘वंशपरंपरांगत दिवाण.’ पहिल्या प्रतीचे सरदार असे मानले जाते. यांना दिवाणगिरी करावयाची नसते, फक्त जहागिरी बोगावयाची असते. सुंदराबाई आपल्या अर्जात माहिती देतात –
त्यांचे सर्व उत्पन्न सालाना २५ हजाराचे असून त्यामधून त्यांना आपल्या दर्जाप्रमाणे आपला इतमाम ठेवता येतो. दिवाण पळशीकरांना फेफऱ्याचा विकार असून त्यांच्या आईने त्यांचे लग्न लावले. त्या संबंधांपासून त्यांना दोन मुली झाल्या. यापैकी एक सध्या हयात आहे. इस १९०८ मध्ये दिवाण पळशीकर यांच्या मातोश्री निर्वतल्या आणि दिवाणाच्या घरात कोणीच वडील माणसू राहिले नाही. (हिचे लग्न नुकतेच कडाक्याच्या थाटात इंदोर येथे झाले. बापाच्या लुटूपूटू लग्नाप्रमाणे घराच्या मागील दारी गुपचूप उरकण्याची कारवाई झाली नाही.)
असल्या गडगंज उत्पन्नाच्या व ऐषआरामाच्या जाहागिरीदारीची आई निर्वतणे आणि बायकोही कैलासवासी होणे, या गोष्टी अनुकंपनीय नाहीत असे कोण म्हणेल ? त्यातून दिवाणांना फेफऱ्याचा विकार ! मग त्यांची व त्यांच्या जहागिरीची कीव कोणाला येणार नाही ? विशेषतः घरात लग्नाळू मुलगी असलेल्या कोणत्या बापाची कनवाळू दृष्टी