बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 15 of 22

भटाच्या बापाचा – ब्रह्मदेवाचा बाप आला म्हणून काय होणार ?
(पान क्रमांक 37, शेवटच्या चार ओळी)
मुंजीच्या सबबीवर चुटकी सरसे घडवून आणले. आता कोण मानवाचा कार्टा विघ्न आणणार ? गीताबाईची वाणी ऐकताच
अच्युतराव कोठारी पळाला
आणि सुपरिटेंडंट रणदिव्यांच्या घरी गेला. ते घरी भेटले, तिथून तसाच तडक मोती बंगल्यावर धावत गेला व जनरल बोराडेंना झालेला वृत्तांत कळविला. जन. मिनिस्टरने चीफ ऑफीसरला हकीकत कळविली आणि डेप्युटी पोलीस सुपरिटेंडंट यांना बरोबर घेऊन अच्युतरावांसह ते निघोजकरांच्या घरी आले. त्यावेळी घरच्या अगदी मागल्या बाजूस या
चोरट्या लग्नाचे चोरटे शुभमंगल
आणि पुढच्या लटूमटूच्या विधीची एक भटजी धडपड करीत होता. ‘हं. आटपा, हं, आटपा’ म्हणून गीतामावशीबाई भटांना तगादा लावीत होत्या. बिचारा नवरदेव आधीच फेफऱ्या आणि ------------- (पान क्रमांक ३८, शेवटचा शब्द) निखळलेला. या जबरीच्या विवाहविधीने तो इतका घाबरत गेला होता की हूं का चूं न करता आजूबाजूचे लोक करतील ते करीत होता. कोणत्याही खुनी माणसाला पकडतात तसे त्याला अवघ्या अर्धा-पाऊण तासाच्या अवधीत आरोप ठेवून ---------------- करून फाशीची शिक्षा फर्मावण्यात आल्याचे ऐकवीत होते. पण लक्षाधीश जहागिरदाराला मुंजीच्या पानसुपारीच्या निमित्ताने फसवून आणून त्यावर अचानक लग्नविधीची बळजबरी करण्याचा हा दाखला कारस्थानी भटी वृत्तीच्या इतिहासात पहिला तर नव्हे, हा प्रश्न इरसाल संशोधकांचा असला तरी कल्पनातीत काय या चोरट्या जबरी विवाहाची जागा घाणेरडी व कोंदड गोविंदराव निघोजरकरांच्या घरची मंडळी दोन, दोन भट व गीतामावशी एवढेच काय ते साक्षीजन व वऱ्हाडी. घराबाहेर सगळे सामसूम. आत एखादे लग्न किंवा काही मंगल कार्य होत आहे, ही कोणालाही कल्पना न येण्यासारखे होते.
चोरीचा मामला हळूहळू बोंबला
अशा अवस्थेत केळीचे खांब लांबच राहिले, तर ताशे वाजंत्र्यांची दलामल करायची कोणी आणि का ? वधू-वराकडील उपाध्यांना या लग्नाची दखल नव्हती. देवादिकांनाही चाट मिळाली. पळशीकर दिवाणांचा घरात पाय पडताच त्यांना गीताबाईने घराच्या मागील दारी नेऊन तडक बोहल्यावर उभे केले व अंतरपाट धरून ‘शुभमंगल साssवधान्’ गर्जना करण्याची भटांना ऑर्डर फरमावली. लागलीच
लक्ष्मीssकौssस्तुभ पाss
ला सुरुवात झाली. ‘अति समिप’ झाले असेल नसेल तोच जनरल मिनिस्टर लछमनसिंग, डे. पो. सु. कार्लेकर व काही पोलीस अच्युतराव कोठाऱ्यांसह तेथे येऊन थडकले. मग काय विचारता ? कटवाल्यांची छातीच धडधडू लागली. लछमनसिंग “खबरदार, काय हा फाजीलपणा चालवला आहे. बंद करा तुमचे विधी,” असे दरडावून म्हणताच सर्व कारभार थंड पडला. भटजी बाजूला सरले. निघोजकरांच्या घरच्या मंडळींनी – विशेषतः नवरी मुलगी सुंदराबाई, १तिची बहीण व आई यांनी चौपदरी गळे काढून आक्रदनास सुरुवात केली. त्या ऊर बडवून घेऊ लागल्या. कांचनभटा गोविंदराव दगडी पुतळ्याप्रमाणे उभा राहिला. भट तर घाबरून गेले.
लछमनसिंग – कोणाच्या हुकमाने दिवाणसाहेबांना येथे आणले ? कोणी आणले ?
गीताबाई – कोणी म्हणजे ? मी आणले, मी दिवाणांची मावशी आहे. समजलात. माझ्या मुलासारखे ते आहेत. त्यांचे लग्न लावण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी काही चोर आहे की काय ?
लछमनसिंग – अहो बाई, तुम्ही चोर असा नाही तर सांब, तुम्ही दिवाणाच्या मावशी असा नाही तर प्रत्यक्ष आई असा. मला याच्याशी काही कर्तव्य नाही. पण दिवाणांना येथे आणण्यासाठी सरकारी परवानगी लागते, हे तुम्हाला माहीत असेलच पाहिजे.
गीताबाई – (कंबरेवर हात ठेवून, तुच्छतेच्या मानेच्या हिसक्याने) – मला नाही माहीत. करायची आहे काय परवानगी लग्न लावायला.
लछमनसिंग – अहो, दिवाणसाहेब फर्स्ट क्लास जहागिरदार आहेत. आणि त्यांचे लग्न अशा चोरट्या रीतीने घराच्या मागील दारी, कोंदड आणि घाणेरड्या जागेत ? कोणाला न सांगता लावता हा कोठच्या गावचा शहाणपणा ?
गीताबाई – (हात ओवाळून संपाताने) आणि तुम्ही काय आजपर्यंत दिवाणाची मोठीशी जोपासना केली, ती आहे माहीत. त्यांचे लग्न लावले आणि ते त्यांच्या कल्याणासाठी लावले. आता तुम्हाला काय करायचे असेल ते करून