बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 14 of 22

तो तुला मी कळवला. तू सोमण्णांनाच जाऊन भेट.” अच्युतराव सोमणाला भेटला. सोमण म्हणाला, “ते काही चालणार नाही. उद्या तू कचेरीला हजर राहिलेच पाहिजे. जोपू कोचमन, हरीमाला मिरजगावकर आणि गीताबाई दिवाणांना गाडीतून फिरयला घेऊन जातील. तझी जरूर नाही.” तेथून अच्युतरावांची स्वारी सुप्रिटेंडंट रणदिवे यांच्याकडे गेली आणि गीताबाई नावाची कोणी एक पाहुणी दिवाणाच्या घरी दोन दिवसांपूर्वी आली आहे, ही बातमी प्रथमतः त्यांच्या कानावर घातली. अच्युतराव परत हवेलीवर येतो, तो साधारण अंधार पडला होता. इतक्यात कोणी गोमागणेश ब्राह्मण दिवाणांच्या वाड्यात आला आणि “उदयिक सकाळी लोधीपुऱ्यात जुन्या सोयर नाक्याजवळ
सोन्या बापूच्या घरी मुंज
आहे. दिवाणांना पानसुपारीला घेऊन यावे, असे आमंत्रण देऊन गेला. हा आमंत्रण्यावेदोनारायण कोण, कुठला,काळा की गोरा, याचा कोणालाच पत्ता लागला नाही. अच्युतरावांनेही त्याला काही नाव गाव विचारले नाही. मग तो तरी लेकाचा सागतो कशाला ?”
दुसऱ्या दिवशी सकाळी (म्हणजे २४ मे १९१५ रोजी लग्नाच्या दिवशी) पळशीकर दिवांना रेसिडेन्सीकडे गाडीतून नेहमीप्रमाणे फिरवून आणले. नंतर अच्युतराव जुन्या राजवाड्यात सुपरिटेंडंटच्या कचेरीत गेला. तेथे जाताच सोमण आणि पुरदऱ्याने त्याला एकदम विचारले, दिवाणसाहेबांना मुंजीच्या पानसुपारीला नेले होते की नाही ?
अच्युतराव - दिवाणांना कोठेही पानसुपारिला वगैरे नेण्याची परवानगी नाही. मग मी कसा नेणार ?
सोमण – नसली परवानगी तर काढता येते. पुरंदरे अच्युतरावांबरोबर मेजर बोराड्यांकडे जा आणि दावणांना पानसुपारीला घेऊन जाण्याची परवानगी मागा. मुंजीची पानसुपारी, त्याला वेळ तो कितीसा लागणार ?
पुरंदरे – अच्युतराव जाईल बोराड्यांकडे, तो कशाला पाहिजे
अच्युतराव – बरे तर जातो मी.
अच्युतराव बोराड्यांकडे गेला. ‘गीताबाईला बरोबर घेऊन दिवाणसाहेबांना पानसुपारीला घेऊन जा, पण काही बरे वाईट झाले तर मी गीताबाईला जबाबदार धरीन.’ असे बोराडे अच्युतरावांना सांगतो. मेजर बोराडे म्हणतो की ‘मी परवानगी दिलीच नाही, तू सुपरिटेंडंटनाच जाऊन भेट,’ अच्युतरावाला सांगितले, ‘काहीही असो, अच्युतराव तडक कचेरीत सोमणांकडे गेला. सोमणांने त्याला सागितले, ‘आज दिवाणसाहेबांना गीताबाईबरोबर पानसुपारीसाठी गेऊन जा, मात्र जुन्या राजवाड्यापाशी गाडीतून उतरून जा. गीताबाई दिवाणसाहेबांना घेऊन जातील पुढे पानसुपारीला.’ अच्युतराव तसाच परत हवेलीकडे आला आणि गीताबाईला म्हणाला ‘ही सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेत असाल तर चला पानसुपारीला,’ ताबडतोब गीताबाई दिवाण व अच्युतराव गाडीत बसून निघाले. शहराकडे गाडी चालली असता, शियागंजात नावाचा माणूस त्यांना भेटला. तो गाडीची वाट पहात होता. त्याने गाडी थांबवली व अच्युतरावांना म्हणाला, ‘मला सोमणांनी पाठविले आहे. सोम्या बापूच्या घरी मंडळी सारखी दिवाणांची वाट पहात आहेत.’ हा माणूस दक्षिणी ब्राह्मणच होता.
(पान क्रमांक ३६, शेवटचा लहान अक्षरातील ओळी.)
अच्युतराव नको नको म्हणत असतानाही दक्षिणी ब्राह्मण गाडीत घुसलाच. जुन्या राजवाड्याजवळ गाडी येताच. “तुम्ही येथे उतरून जा असे सोमणांनी तुम्हाला सांगितले आहे,” असे त्याने अच्युतरावांना बजाविले. पण तिकडे लक्ष न देता अच्युतराव बसूनच राहिले. गाडी लोधीपुऱ्यात गेली व निघोजकरांच्या घराजवळ थांबली. दिवाणांना घरात नेल्यावर गीताबाई एखाद्या फील्ड मार्शलच्या जमकावणीत अच्युरावांना म्हणाल्या, ‘येथे मुंजबिंज काही नाही. मी दिवाणांची मावशी आहे, मी आता त्यांचे लग्न करणार आहे. म्हणून त्यांना मी येथे आणले आहे. ही पहा लग्नाची तयारी.’ गीताबाईंचा हा बेत कळताच मात्र अच्युतराव टरकला, गुप्त गटाचे प्राथमिक बातबेत ठरविताना छातीचा निधडेपणा पुष्कळांना दाखविता येतो, पण कटाच्या सांध्याचा शेवटचा घाव घालताना मात्र शेकडो ९८ वीर अवसान घातकी बनतात. गीताबाई बाईमाणूस, पण मोठ्या छातीची ! तिने निघोजकरी गुप्त कटाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून अवघ्या ४८ तासाच्या आत सरकारी निर्बंधांना सपशेल धाब्यावर बसवून युक्त्या प्रयुक्त्यांनी
दिवाणांना निघोजकरांकडे आणले
आता लग्नाला उशीर कसचा आणि अडचण कसली ? इकडे नवरा तिकडे नवरी, मध्ये अंतरपाट आणि एखाद्या गलोल भटाचे मगलाष्टक, की झाले लग्न. भटाने अंतरपाट दूर केला व नवरीने नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली की ह लग्न मोडायला