बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 2 of 22

चुकीची आहे. विधीकर्म चालविणारा भट विधीप्रसंगी कोणाला कितीही पूज्य वाटत असला, तरी साक्षीदार पंचांच्या प्रतिज्ञेशिवाय त्याच्या जबानीची किंमत कोर्टात पूज्य धरली जाते. कारण भट हा मनुष्यच असल्यामुळे, एखादी विशेष कायदेबाजाची पकड साधण्यासाठी तो बनावट साक्षीदाराची वाबळी पांघरण्यासही कमी करणार नाही कशावरून ? साक्षीपंचाचे तसे नाही. त्यांच्या एक मताच्या जबानीवरच विवाह विधीच्या सांगतेचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे, कन्यादान, सप्तपदी वगैरे विधी त्यांच्या समक्षच झाले पाहिजेत. नुसते शुभमंगल सावधान आणइ ताशे वाजंत्र्यांचा कडकडाट ही विवाह सांगतेच्या पुराव्याची चिन्हे नव्हेत. जोपर्यंत या गोष्टी न्याय कोर्टाच्या उंबरठ्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत ठिक असते. पण चालला आहे तो प्रकार मात्र मोठा घातक आहे.
हे विचार सुचण्याचे कारण सुंदराबाई निघोजकर ------------- एका तरुणीने इंदोर संस्थानाविरुद्ध चालविलेल्या -------------------- होय. ही तरुणी -------------------------- - ------------------------------------- (पान क्रमांक ३, शेवटच्या दोन ओळी)

लग्न होय की कुंवार अजूनी
अशी शंकास्पद परिस्थितीत आहे. शुभमंगल सावधानाच्या बेकायदेशीर यज्ञात तिच्या बापाने जाणून बुजून तिचे बलिदान केलेले आहे. केवळ १२ वर्षांची अल्लड बालिका असताना, तिच्या कपाळी लग्नाच्या मुंडावळ्या अडकवण्याचा त्याने नाटकी फार्स करून तिच्या जन्माचे अक्षरशः नाटक केले आहे. ब्राह्मणी संस्कृतीत उद्दाम असलेल्या कारस्थानी प्रवृत्तीच्या बळावर सुंदराबाईंचा बाप गोविंद गणेश निघोजकर – याने छातिठोक हिमतीचा व्यूह रचून, अचाट बुद्धीने बळेच लक्ष्मी मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातच त्याला
कन्यादानाऐवजी कन्या बलिदान
करण्याचा अमानुष प्रसंग भोगावा लागला. ही कथा, सुंदराबाईची ही कर्मकथा, शुभ मंगल सावधानाची ही धर्मव्यथा, जितकी हृदयद्रावक आहे, तितकीच विचारार्ह आहे. जितकी संतापजनक आहे, तितकीच चिंतनीय आहे. जितकी मनोरंजक आहे, तितकीच खेदकारक आहे. या एकाच बहुरंगी कथेतून विचारवंतांना अनेक तत्त्वांवर विचार करता येण्यासारखा आहे. या कथेत पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टी असल्या, तरी या गोष्टीला फाजील महत्त्व खुद्द सुंदराबाईनेच आणल्यामुळे, त्या महत्त्वातला फाजीलपणा उघड चव्हाट्यावर आणणे क्रमप्राप्तच आहे. हे सुंदराबाई प्रकरण आज पाच-सहा वर्षे चिघळत आहे. सन १९२० च्या फिर्याद नं. १२ आणि त्यावर इंदोर हायकोर्टाच्या निकालाचे निकालाचे मलम या चिघळणाऱ्या घटनेवर फासले गेले तरी त्याची कीड मेली नाही. उलट मधून शास्त्री बेसुमार फदफदतोच. मध्यंतरी बॉम्बे क्रॉनिकल पत्राची म्हणा, -------- बुद्धी उतास जात होती, त्या वेफळी --- प्रकरणाला पोतडी भर चढला होता की त्या रंगापुढे मुमताझ रंडीचा ढंग विवाहसंस्थाही त्यावेळी ज्याच्या त्याच्या तोंडी ----------------- (पान नं. ४ शेवटच्या दोन ओळी)
आग्यावेताळ हॉर्निमन आणि सुंदराबाई
याशिवाय दुसरा शब्द नव्हता. वाचाळ व लेखाळ देशभक्तांनी इंदोरला दुसरे कोल्हापूर बनविण्याशिवाय दुसरा कसलाच ध्यास नव्हता. कोल्हापूरप्रमाणेच इंदोरासही “कोणाचा जामाना व जनाना बिनधोक नाही” हे सिद्ध करण्याची ज्याची त्याची बेळर्वागिरी बेफाम भडकली होती. पण अखेर इंदोरच्याच प्रजाजनांनी सर हुकूमचंद शेटजींच्या मुखाने हॉर्निमनच्या शिंगावर सणसणीत लगुडप्रहार लगावताच हे प्रकरण तात्पुरते विझले. त्यानंतर यंदा मुमताझ महामायेचा थैमान उपस्थित होताच, सुंदराबाईच्या पाठीशी असणाऱ्या उपद्वाप्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मकहाणीची चिचुंद्री फुसकन् मध्येच सोडून दिली आहे, आणि तोंड पाहून काळजाची करणी पारखिण्याची मिजास मारणाऱ्या काही रिकामटेकड्या वृत्तपत्रांनी तिचे देव्हारे नाचविण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा हे सुंदराबाई प्रकरण म्हणजे आहे तरी काय असे मोठे गौडबंगाल ? याचा एकदा कायमचा मुद्यापुराव्यानिशी सोक्षमोक्ष लावणे अत्यंत जरूरीचे आहे. यासाठी या
कपटनाटकातील पात्रे
कोण कोण आहेत व त्यांनी आपापल्या भूमिका कसकशा नटविल्या ते आपणास प्रथम पाहिले पाहिजे. या भूमिकांचा खरेखोटेपणा वाचकांना पारखता यावा म्हणून खुद्द सुंदराबाईच्या जाहीर तक्रारी अर्जातील उतारे व इंदोर हायकोर्टात छाननी होऊन कै. जॉन, चीफ जस्टीस रा. ब. कोर्टाने दिलेल्या निरपृह निकालातील उतारे यांचा उपयोग करूनच या सुंदरबाईच्या कटीतले गुप्त रहस्य उघड केले पाहिजे. प्रस्तुत लेख केवळ शुद्ध सत्यशोधनार्थ लिहिला आहे. सुंदराबाईने किंवा तिच्या पाठीशी असणाऱ्या ------------- वर्तमानपत्रापासून तो थेट व्हाईसरॉय इंदोर