माझी जीवनगाथा: Page 2 of 277

नसलेले अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले. विविध व्यवसायांतील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. चित्रकला, नाट्य, टंकलेखन, छायाचित्रण अशा अनेक क्षेत्रात त्यांची प्रतिभा सहजतेने संचार करीत होती. पण सर्व करीत असता त्यांचे मार्गक्रमण चालू होते ते त्या ‘एकत तारा’च्या दिशेने. तो तारा होता. समाज परिवर्तनाचा, अन्याय निवारणाचा. लोकहितवादींच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर प्रथम पासून होता. पुढील काळातील त्यांचे वाचन तर अफाटच होते. कधीही न सुटलेले आपले व्यसन म्हणजे ‘बूकबाजी’ चे असे त्यांनी सांगितले आहे. फुले, आगरकर, रानडे त्यांनी पचवले. त्याप्रमाणे इंगजीतील शेक्सपीयर सारख्या अनेक अभिजित नाटककारांनाचा आणि वैचारिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. पण सत्यशोधक मताकडे ते वळले ते पुस्तकांच्या वाचनांमुळे नव्हे तर जीवनात आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे. स्वाभिमान जखमी करणारे प्रसंग त्यांनी अनुभवले आणि स्त्रियांवर, दलितांवर होणारे घृणास्पद अन्यायही त्यांनी पाहिले. लहानपणापासूनच त्यांचे मन या बाबतीत अतिशय संवेदनशील होते, हळवे होते आणि लढाऊही होते. एका जरठबाला विवाहाच्या निषेधार्थ लग्नमंडप जाळून टाकण्याचे साहस त्यांनी कुमार वयात केले होते. ही लढाऊ न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानी वृत्ती अखेरपर्यंत अबाधित राहिली. आर्थिक विवंचना असतानांही त्यांनी आपली लेखणी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही. शाहू महाराजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते, पण महाराजांनी अकारण केवळ मेहेरबानी म्हणून देऊ केलेली पाच हजारांची रक्कम (त्या काळात एका इस्टेटीसारखी) चार कडक शब्दांसह त्यांनी तिथल्या तिथे परत केली. या वृत्तीमुळेच त्यांनी सत्यशोधक विचारांचा ध्वज खांद्यावर घेतला आणि त्याच्या प्रचारासाठी प्रबोधन पत्र सुरू केले. त्याची लेखनभाषण शैली त्यांच्या वृत्तीशी मिळती जुळती म्हणजे तिखट, प्रहारशील आणि ग्रामीण आविर्भावाची होती. तात्विक विवेचनापेक्षा शाब्दिक आसूड उडविण्याकडे अधिक कल असलेली.

या शैलीमुळे सामान्य जनतेपर्यंत ते सहजतेने पोहचू शकले. शाहू महाराजांच्या प्रेरणेने सर्वत्र संचार करणारे सत्यशोधक जलसे आणि प्रबोधनकारांसारख्या काही लेखकांचे आक्रमक लेखन, यामुळे शहरापुरता मर्यादित असलेला सत्यशोधक विचार महाराष्ट्रातील, निदान काही भागात तरी बहुजन समाजापर्यंत पोहचला आणि बंडखोरीची हवा सर्वत्र धगधगू लागली. पण हे सर्व काही काळच टिकले. पेटविण्याच्या भरात तात्विक पाया सुरक्षित ठेवण्याकडे वा अधिक भक्कम करण्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे सत्यशोधक विचारप्रणालीतील एक एक कलम बाद होत गेले आणि त्या सर्वस्पर्शी चळवळीचे रुपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झाले. ते ही पर्व संपले आणि ब्राह्मणेतर चळवळीचे काँग्रेसच्या अधिक व्यापक अशा राष्ट्रीय आंदोलनात विसर्जन झाले. हे विसर्जन ऐतिहासिकदृष्ट्या आवश्यक आणि अपरिहार्य होते. तरी पण हेही खरे की सामाजिक क्रांतीच्या आणि शुद्धीकरणाच्या दिशेने जाणारा एक आशादायक प्रवाह खंडित झाला. केवळ खंडित झाला नाही तर शेवाळून गेला. परिणामतः दोन पावले पुढे गेलेली सामाजिक मानसिकता आता चार पावले मागे सरकली आहे. नागरिक शील बांधण्याचा प्रयत्न मागे पडला असून जातीय संघर्ष, अंधश्रद्धा, सहिष्णूता, भ्रष्टाचार, गुंडानुयय, नीतिहीन सत्तालालसा अशा अनिष्टांना ऊत आला आहे. संकुचित निष्ठांच्या उद्रेकांनी आकाश अंधारल्यासारखे झाले आहे. आता देश पुन्हा प्रतीक्षेत आहे नव्या सत्यशोधक आंदोलनाच्या या प्रतीक्षेला प्रबोधनकारांच्या या आत्मवृत्ताचा आधार मिळावा - कुसामाग्रज प्रास्ताविक बहुजनांचे कैवारी महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन, इतिहासविषयक व नाट्यादी क्षेत्रांतील कार्य, कीर्ती नि कामगिरी महशूर आहे. त्यांचे वादळी व्यक्तिमत्त्व विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्घटनच्या कार्यक्षेत्रात सतत गाजत राहिले आहे. अशा ह्या थोर पुरुषाच्या ज्ञानगंगेचे पाणी मी अनेकदा प्राशन केल्यामुळेच प्रबोधनकारांच्या ‘जीवनगाथे’स प्रस्तावना लिहिण्याचा हा बहुमान मला देण्यात आला असावा, असे मला वाटते.

प्रबोधनकार म्हणजे एक बहुरंगी, बहुढंगी नि बहुरुपी कर्तृत्ववान पुरुष, जिनगर, छायाचित्रकार, तैल चित्रकार, पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, चळवळे, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार नि इतिहासकार अशा विविध भूमिका त्यांनी वठविल्या. अशा ह्या महाभागाच्या गतिशील जीवनात