माझी जीवनगाथा

हे प्रबोधनकारांचं आत्मचरित्र. पण यात बाकीच्या आत्मचरित्रांसारखा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आलेख मांडलेला नाही. या आठवणीच आहेत. असं असलं तरी विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास लिहिणा-या कुणालाही हे पुस्तक टाळता आलेलं नाही, इतके महत्त्वाचे संदर्भ यात पानोपानी पसरलेले आहेत. अत्यंत रसाळ तरीही ठसठशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.

प्रस्तावनाकार धनंजय कीर म्हणतात, ‘प्रबोधनकार ठाकरे एक बहुरंगी, बहुढंगी नि कर्तृत्ववान पुरुष. जिनगर, छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, चळवळे, वक्ते, नेते, पटकथा संवाद लेखक, चरित्रकार नि इतिहासकार अशा विविध भूमिका त्यांनी वठविल्या... गोव्यापासून नागपूरपर्यंत सर्व महाराष्ट्र पायाखाली घालून महाराष्ट्रातील समाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केलेल्या महाराष्ट्राच्या एका पराक्रमी पुत्राच्या या आठवणी आहेत.’ प्रबोधनकारांच्या आयुष्यभराचा संघर्ष यात आलेला आहे. तो खूपच प्रेरणादायी आहे. कधी निराशा वाटत असेल तर कोणतंही पान खोलावं आणि नवी उमेद मिळवावी. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक. माझी जीवनगाथा प्रबोधनकार ठाकरे सत्यशोधक प्रबोधनकार प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. या विचारप्रणालीच्या प्रसारासाठीच त्यांनी ‘प्रबोधन’ हे नियतकालिक अनेक वर्ष प्रकाशित आणि संपादित केले. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणा-या त्यांच्या लेखनशैलीमुळे ‘प्रबोधन’ त्या काळात खूपच गाजले आणि त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना प्राप्त झाली. वृत्तपत्रातील त्यांची कर्तबगारी ज्यांच्या नावाश कायमची निगडित झाली आहे असे जे थोडे पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे. लोकहितवादींनी सूचित आणि ज्योतीराव फुल्यांनी प्रवर्तित केलेली सत्यशोधक चळवळ ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाची क्रांतीकारक घटना.

समाज जीवनाच्या सर्व स्तरावर समतेची आणि न्यायाची स्थापना करू पहाणारी अशी सर्वस्पर्शी आणि व्यापक चळवळ भारतात अन्यत्र कोठेच झाल्याची दिसत नाही. फुल्यांच्या समोर एक जात नव्हती. एक उद्दिष्ट होते ते सामाजिक न्यायाचे. म्हणून त्यांनी दलितांच्या दास्याला विरोध केला तसा ब्राम्हण विधवांच्या केशवपनालाही केला. शिक्षणाचा प्रकाश मागासवर्गापर्यंत महिलांपर्यंत पोहचवला आणि अनौरस अपत्यांनाही आधार दिला. विवाहविधीत मराठी मंत्र आणण्याचा आणि पुरोहित कार्य ब्राम्हणेतरांकडून करून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दारिद्र्याच्या गर्तेत बुडालेला शेतकरी आणि जनावरी जीवन जगणारा कामगार यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले समाजातील व्यवस्थेचे समग्र परिवर्तन आणि संपूर्ण शुद्धीकरण हे उद्दीष्ट फुल्यांसमोर होते. त्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची आचार विचार संहिता त्यांनी तयार केली आणि तिच्या स्थापनेसाठी अजिंक्य रणशिलतेने विरोधी शक्तींशी कडवी झुंजही दिली. त्यांनी आंदोलन उभे केले. पण त्याच्या प्रसाराला त्या काळच्याच मर्यादा होत्या. या चळवळीचा संदेश त्याच्या हयातीत महाराष्ट्रात सर्वदूर पोहचला नव्हता. पुणे शहरही त्या काळात महाराष्ट्राची वैचारिक आणि सांस्कृतिक राजधानी होती. रेलगाडीच्या डब्यांना गती, दिशा आणि नियंत्रण देणा-या इंजिनासारखे पुण्याचे स्थान होते. फुले पुण्यातलेच आणि त्यांचे विरोधकही पुण्यातलेच. तेथील सनातनी आणि समेटवादी शक्तींशी मुकाबला करण्यातच फुल्यांना आपली हयात खर्ची घालावी लागली. गंगेचा अवतार गंगोत्रीत झाला, पण त्याखालील माळमैदानावर तिचे अवतरण झाले नाही. हे कार्य फुल्यांच्या निधनानंतर दोन दशकांनी झाले. १८९० मध्ये फुले दिवंगत झाले. मधल्या काळात क्षीण झालेल्या या आंदोलनाला चेतना आणि गती देण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी स्वीकारली. त्यांना साथ देऊन अथवा स्वतंत्रपणाने, ज्या विचारवंतानी, कार्यकर्त्यांनी, पत्रपंडितांनी या विचारप्रणालीचा धूमधडाक्याने महाराष्ट्रात प्रसार केला त्यात प्रबोधनकारांची गणना प्रामुख्याने होते. शाहू महाराज आपल्या संघटना कौशल्याने आणि आर्थिक मदतीने या चळवळीला पुढे नेत होते तर प्रबोधनकार आपल्या लेखनाने आणि वक्तृत्वाने. त्यांनी स्मरणयात्रा या पुस्तकाच्याद्वारे आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे.

समाजापरिवर्तनाचा ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तित्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते, याचा प्रत्यय या आठवणींवरून येतो. प्रारंभीच्या काळात दारिद्र्याचे दशावतार बघावे लागले. अनेक आघात सहन करावे लागले. संसारात पाय रोवून स्थिर होण्यासाठी परस्परांशी संबंध