ग्रामण्यांचा इतिहास : Page 9 of 132

ही गोष्ट प्रत्येक इतिहासज्ञाला कवूलच केली पाहिजे. शिवाजीच्या स्वताज्योपराक्रमाचें जहाज हांकारण्यास संध्याच्या नामदारी-किंवा नामदार म्हणा वाटेल तर-देशभक्तांपेक्षा अधिक कसदार नावाडयांची आवश्यकता होती, यांत संशय नाहीं. सध्याहि सरदाऱ्या किंवा दिवाणगिऱ्या गाजविणारे कायस्थेतर कोणी नाहींत किंवा शिवकालई नव्हते असें नाहीं. परंतु शिवाजीच्या देशकालवर्तमानाचा सूक्ष्म दृष्टीनें विचार केला तर नुसत्या सरदार किंवा दिवाण-परंपरेच्या लोकांच्या हांतून तो स्वराज्यस्थापनेचा विश्वव्याप खात्रीनें तडीला जाणें शक्य नव्हतें. चां.कां.प्रभू समाजाची प्राचीन संस्कृति शिवकालापर्यंत नुसत्या सरदारी दिवाणगिरी ज्ञिविंा किलज्ेदारी येवढयाच दर्जापर्यंत उन्नत झालेली होती, यापेक्षा अधिक उंचीपर्यंत तिची भरारी गेलेलीच नव्हती, असे जर गृहीत धरलें तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांनीं जी मुत्सद्देगिरी दाखविली, जी धाडसाचीं अनेक पराक्रमी कामें केलीं आणि शिवाजीच्या प्रत्येक महत्वाकांक्षेच्या उत्साहाला प्रत्यक्ष दृश्य स्वरुप आणण्याच्या कामीं त्यांनी जी कल्पनातील समयसूचक धोरणें लढविलीं, ती सारीं 'अवचित घडून आलेला चमत्कार' तरी मानला पाहिजे एक; याशिवाय या प्रश्नाचा उलगडा लागणें शक्य नाहीं. आजलाहि हिंदुस्थानाच्या चारी भागांवर दृष्टी टाकली आणि निरनिराळया प्रांतांतील निरनिराळयां समाजांची आधुनिक उन्नति व मनोधर्म यांचें नीट निरीक्षण केलें तर असें दिसून येईल कीं पाश्चात्य विद्येचा मुलामा जरी सर्व ठिकाणीं सारख्याच प्रमाणांत चढलेला दिसत आहे, तरीसुध्दं प्रत्यक्ष कार्याचा प्रसंग येतांच जो तो आपापल्या पूर्वसंस्कृत्यनुरुप अशाच क्षेत्रांत काय तो बहाद्दरी गाजवूं शकतो. ज्या ज्या समाजांनी पूर्वी राज्यें केलीं किंवा प्राचीन राज्यकारभारांत ज्यांचे पूर्वज प्रत्यक्ष पडत होते, त्या त्या समाजांतील लोकच सांप्रतच्या राजकीय वातावरणांत टिकाव धरीत आहेत. पिढयान्पिढया ज्यांनीं नुसता व्यापार केला, अशा समाजांतील मंडळी जरी आजकाल राजकीय उलाढालींत पडत आहेत, तरी राजकीय तलवारीच्या मुठीचा आणि त्यांच्या हाताचा यावज्जन्म कधी संयोगच घडून न आल्यामुळें राजकीय क्षेत्रांतलें त्यांचें वर्तन विशेषसें दणकट किंवा अधिकारी होत नाही. इतकेंच नव्हे तर त्यांना त्या बाबतींत आत्मसंतोषानें म्हणा अथवा लोकमताच्या विरोधानें म्हणा केव्हांतरी माघार घ्यावीच लागते, अशीं अनुभवांचीं उदाहरणें शेंकडो दाखविता येतील. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे पूर्वसंस्कृतीच्या अभावीं एखादी व्यक्ती अगर समाज राष्ट्रीय पुनर्घटनेसारखें जगय्डव्याळ कार्य घडवून आणील हें शक्यच दिसत नाहीं. संस्कृतीचा संस्कार कितीहि मलीन झालेला असो, पण त्यालाहि अवसर मिळतांच तो आपला पराक्रम गाजविल्याशिवाय कधींहि राहनार नाहीं. उलटपक्षी संस्कृतीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करुन भलत्याच क्षेत्रांत बहाद्दरी मिळवूं पाहणाऱ्यांची स्थिती किती शोकजनक होते, याची उदाहरणें आज प्रत्यहीं आपल्या नजरेसमोर शेकडों घडत आहेत, शिवाजीला ही संस्कृती-परिक्षणाची कला, प्राचीन इतिहासाच्या अभ्यासानें असो अथवा निसर्गदत्त असो, फार चांगली अवगत झाली होती, यांत संशय नाहीं. हिच्या सहाय्यानेंच त्यानें महाराष्ट्रींय इतर समाजांकडे आपली नजर फेंकण्यापूर्वी चां.का.प्रभू समाजाला तयाने पोटाशी धरलें. शिवाजीच्या एकंदर चरित्रावरुन 'मनुष्याची पारख' करण्यांत त्याचा हात किती खंडा होता, हें चांगलेंसच व्यक्त होत आहे. अर्थात् चां.का.प्रभूंना प्रथम जवळ करण्यांत त्याची रसिकता आणि दूरदृष्टी जरी व्यक्त होत असली तरी ती रसिकता निवळ काकतालीय न्यायाच्या भुसक्या पायावरची खास नसून, ती शिवाजीच्या संस्कार-परिक्षणाच्या अंतर्वेधदृष्टियरच उभारली गेली होती. पूर्वसंस्कृतीच्या बलवत्तर तेजाची साक्ष पटल्याशिवाय नसत्या भिडेसाठी किंवा कार्याची निकड म्हणून रिव्रूच्टांची खोगीरभरती करणारे शिवाजीमहाराज तरी खास नव्हते! 12. चां.का.प्रभू समाजाची अशी पूर्वसंस्कृती तरी काय होती, कीं तिकडे शिवाजीचें लक्ष एकदम धांवून गेलें? शिवाजीच्या मनांतील जन्मजात स्वराज्य स्थापनेकरिता मदतगार म्हणून त्याची दृष्टी याच विवक्षित समाजानें कां वेधून घेतली? काय त्या वेळीं खुद्द शिवाजीचे नातलग आणि जातभाई मराठे शूर नव्हते? स्वत:चे जरी स्वराज्य नव्हतें तरी परराज्याची यंत्रें तेच हालवित होते ना? णग घरच्यांना वगळून दारच्यांकडेच शिवाजी का वळला? ही प्रश्नमालिका नि:पक्षपणानें सोडविणारालाच चां.का.प्रभूंच्या प्राचीन इतिहासाची ओळख पटणें शक्य होईल. इतर कोणी कितीहि जाडा व्युत्पन्न असला किंवा ऐतिहासिक जुनीं कागदपत्रें हुडकिणारा सूक्ष्म दृष्टीचा संशोधक उंदीर असला तरी त्याच्या दृष्टीला