ग्रामण्यांचा इतिहास : Page 8 of 132

प्रत्यंतर पौर्वात्य इतिहास-शास्रांनीं आपल्या वर्णनीय कर्तबगारीने दाखविले आहे, असें म्हणण्यात अतिशयोक्ति होईलसें आम्हांस वाटत नाही. विशेषत: महाराष्ट्रीय कित्येक इतिहास-संशोधकांनी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतील अलीकडे जी सेवा केली आहे ती केव्हांहि प्रशंसनीयच म्हटली पाहिजे. वास्तविक पाहिलें तर महाराष्ट्राचा अर्वचीन म्हणजे 17व्या शतकापासूनचा इतिहास जतन करण्याची कामगिरी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू बखरकारांनींच बजावलेली आहे. शिवाजीच्या स्वराज्योपक्रमाच्या अंतस्थ स्फूर्तीच्या ठिणगीवर याच जातीनें आपल्या अलौकिक कर्तबगारीचे तेल ओतून ती प्रज्वलीत केली. शिवशाहीच्या भव्य प्रासादाचा पाया खणतांना याच जातीच्या अनेक नरनारींनी केवळ आत्मस्फुर्तीने आपल्या प्राणांच्या आहुती त्यांत टांकून, त्यांतील प्रत्येक चिऱ्याचिऱ्यांत कायस्थप्रभू-रक्तांचें सिमेंट ठासून भरलें. 'हिंदवी स्वराज्याचा सूर्योधय होणार!' असा आत्मविश्वासपूर्ण कर्णा शिवाजीनें पुंच्कतांच खडबडून जागें झालेले महाराष्ट्र तरुण शिवाजीच्या निशाणाखाली येऊन दाखल होण्याच्या आधीं हाच समाज त्याच्या पाठीमागें येऊन उभा राहिला. राजपुतान्यांतील शौर्यसागर रजपुतांचे खडबडून जागें झालेले महाराष्ट्र तरुण शिवाजीच्या निशाणाखाली येऊन दाखल होण्याच्या आधीं हाच समाज त्याच्या पाठीमागें येऊन उभा राहिला. राजपुतान्यांतील शौर्यसागर रजपुतांचे रक्त नसानसांतून खेळत असणाऱ्या मराठे क्षत्रिय वीरांच्या दणकट तलवारींच्या तिखट पात्यांना चकित करुन सोडणारी तलवारबहाद्दरी, स्वराज्याच्या उष:कालापासून तों त्याच्या हतभागी अस्तापर्यंत याच समाजानें गाजविली आहे. मनगटांतल्या जोरावर क्षात्रवीर्यांचा प्रमाप गाजवीत असतांनाच, कलमबहाद्दरीनें आणि मुत्सद्देगिरीनें बुध्दिकौशल्याची शिकस्त करणारा समाज हाच; म्हणजे शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या कर्मयोगाला आपल्या निसर्गजात भक्तियोगाचें व ज्ञानयोगाचें पाठबळ देऊन, महाराष्ट्रांत मऱ्हाठी पातशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आद्यमान चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानेच मिळविला आहे, अर्थात शिव-उदयापूर्वीचा काळ दुव्वेबाज इतिहासाच्या अनुलब्धतेमुळें जरी कितीहि अंध:कारमय असा भासत असला, किंवा सेतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रांत कडाक्याची थंडी पडल्यामुळें उत्पन्न झालेल्या संशयाच्या धुक्यांनी दाही दिशा जरी आज कोंदाटलेल्या दिसत असल्या, तरी एक गोष्ट निर्विवाद सिध्द होत आहे कीं ज्या अर्थी ''आपली सेवा करण्याकरितां या घटकेला कोण तयार आहेत?'' अशी राष्ट्रानें हांक मारतांच जो समाज एकदम आपल्या अज्ञात दशेचें कवच पार फेंकून देऊन, त्याच्या हांकेला हांक देऊन राष्ट्रीय निशाणाखाली धांवून आला; इतकेंच नव्हे तर त्यानें आपल्या अवर्णनीय पराक्रमानें राष्ट्राची स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा रंगारुपासहि आणली, त्याअर्थी त्या समाजाची प्राचीन संस्कृति अर्थात् तितकीच बलवत्तर असली पाहिजे. अर्वाचीन डोळस इतिहासशास्रयांच्या चष्म्यांना या प्राचीन संस्कृतीचें स्वरुप नीट अवगाहन करतां येत नसेल तर तो दोष त्यांचा नसून त्यांच्या चष्म्यांचा आहे, ही गोष्ट केव्हांहि सिध्द करुन दाखविण्यास अडचण पडणार नाही. 11. शिवाजीचा अवतार होण्यापूर्वीच चां.का.प्रभू समाजाचा इतिहास पाहिला तरीहि इतकें सिध्द होत आहे कीं तत्कालीन मुसलमानी रियासतींत त्यांची स्मिति म्हणण्यासारखी खालावलेली नव्हती. त्यांची कलमबहाद्दरी, मुत्सद्देगिरी त्यांचें सुप्रसिध्द इमान, त्यांची क्षात्रवृत्ति त्यांचा योग्य तो परामर्ष मुसलमानी संस्थानांतले शहा ठिकठकिाणीं घेतच होते. गडावरचे गडकरी आणि किलज्यांचे किलज्ेदार होण्याचा मान व अधिकार विशेषत: कायस्थ प्रभूंकडेच असे. णुसलमानी रियासतींत वरिष्ठ सरदाऱ्या भोगणारे शहाजीराजे, जाधवराव आदीकरुन मराठे सरदारांचे सलजमसलतगार, दळपती आणि सुभेदार कायस्थ प्रभुच असत आणि तत्कालीन् मोहिमांचे डांवपेंच ठरविणाच्या कामांत याच गडकरी किलज्ेदार वगैरे सरदारांच्या सलज मसलतींचा उपयोग मुसलमान सत्ताधारी करुन घेत असत. याशिवाय जंजिरा वगैरे संस्थानांकडे पाहिलें तर तेथें चा.का.प्रभू केवळ सरदारक्या, गडकरीपणा किंवा किलज्ेदारी याच हुद्दांचा उपयोग घेत होते असें नव्हें, तर दिवाणगिरीच्या जागांवरहि हे लोक वंशानुवंश अधिकार गाजवित होते. परंतु नुसत्या दिवाणगिऱ्या केल्या किंवा सरदाऱ्या गाजविल्या एवढयाच मुद्यावर हा समाज मराठी स्वराज्य स्थापनेच्या प्रत्यक्ष कार्यभागांत पडण्यांतका स्वयं-स्फुर्तीनें अवचित उद्युक्त कसा झाला मराठी स्वराज्याची स्थापना प्रस्तुतच्या स्वराज्याच्या 'मागणी' इतकीच सरळ आणि सोपी होती काय? सांप्रतच्या 'सनदशीर मागणी'ला जेवढे म्हणून आज अडथळे आहेत, जितके प्रतिरोध करणारे संघ आहेत आणि जनतेच्या मनाची 'सनदशीर तयारी आहे' आहे, त्यापेक्षां सहस्रपट अधिक तीव्र विरोधाला तोंड देऊन, शिवाजींने धुळीच्या कणांतून एवढे प्रचंड स्वराज्यमंदीर निर्माण केलें,