ग्रामण्यांचा इतिहास : Page 6 of 132

भरारा वाहत असतांना, वरवर पहाणाऱ्याला असा भास होणें शक्य आहे कीं हिंदु मुसल्मान वगैरे ठळक ठळक भेद तर आज समूळ नष्ट झाले आहेत, इतकेंच नव्हें तर खुद्द हिंदुहिंदुंमधील जातीभेदमूलक कल्पनांचाहि नव्या मन्वंतराच्या रामरगाडयांपुढे चक्काचूर झाला आहे. परंतु ही भावना वरवर पाहणाऱ्यांची झाली; आणि असे वरवरच पाहून हुरळून जाणारे लोक बहुश: बरेच असतात. वास्तविक स्थिति काय आहे, किंवा निदान कशी असावी, इतका पोंच ठेवून तारतम्यानें विचार करणारीं डोकीं फार थोडीं! रसभरीत व्याख्यानें देऊन किंवा वर्तमनापत्रांतून चुरचुरीत लेख लिहून देशभक्तीची स्वयंमान्यतेची पदवी पटकाविणारे लोक बोलतात किंवा लिहितात तसेच खरोखर वर्तन करतात काय, हा प्रश्न आमच्यांतील शेंकडा 80 लोकांस सुचत नाही; इतकी विचारशिथिलता अजून अस्तित्वांत आहे. दिसतें तसें नसतें ही साधी गोष्ट विचारांत घेण्याइतक्या विचारक्षमतेचा ्मच्या गरीब श्रध्दळु देशबांधवात अजून उदय व्हावयाचा आहे. श्रध्दळुपणा हा गुण कांही वाईट नव्हे! परंतु त्याला देखील कांही मर्यादा आहे. महाराष्ट्राच्या गतवैभवाचें आपण सिंहावलोकन केलें तर या श्रध्दळुपणाच्या पायींच मऱ्हाठी साम्राज्याचा सत्यानाश आपला आपण कसा करुन घेतला, हें चांगलें ध्यानी येईल. ज्या समाजांनी श्रध्दळुपणापेक्षा अधिक उच्च ध्येयावर नजर टाकून, क्रोधानें किंचित अस्तन्या वर सारल्या असत्या तर राष्ट्रक्रांतीच्या वेळींसुध्द विजयदेवतेनें धावत येऊन त्याला माळ घातली असती, असे चांगले चांगले प्रबुध्द समाज ऐनवेळी श्रध्देच्या फाजील स्तोमाच्या भरीं पडून आपले आपण वैरी कसे झाले, हें सिध्द करणारीं स्थळें महाराष्ट्राच्या इतिहासांत अनेक दाखवितां येतील चिकित्सक पाश्चिमात्यांचा आणि आमचा गेल्या शतकभर इतका निकट परिचय होऊनसुध्दं आमच्यांतील बरेच सुशिक्षित लोक अजून या श्रध्दळुपणाच्या इन्फ्ल्युएंझापासून मुक्त होऊ नयेत आणि वाटेल त्या चलाख गारुडयांच्या भजनीं हां हां म्हणतां लागण्याइतके हुरळून जावेत हें फार शोचनीय होय. थोडक्यांत सांगावयाचें तर कोणत्याहि गोष्टींवर एकदम विश्वास टाकण्यापूर्वी त्याच्या बाह्यांगाचें व अंतरंगाचें सूक्ष्म पृथ:करण करण्याची संवय अजून पुष्कळांना लागावयाची आहे. 8. बाजू अंगावर घसरुं लागली कीं सैतानसुध्द बायबलाचा आधार घेतो, अशी एक इंग्रजीत म्हण आहे. सैतानानें बायबलांतील वेदांताचा पाठ धडाधड म्हणून दाखविण्यास सुरुवात केली म्हणून तो सैतानाचा साधू झाला असें मानणें बरेच धोक्याचें आहे. कदाचित वेदपठनाच्या अनेक आवृत्त्यांमुळे त्याचें नैसर्गिक सैनानीपणाचें पाणी निवळण्याचा संभव असतो खरा, तथापि वेदाची पोथी गुंडाळून ठेवल्यावर श्रोत्यांच्याच बोकांडी तो सैतान बसणार नाहीं कशावरुन? ज्याची मूळ संस्कृतीच सैतानी, ज्याच्या सैतकनी अत्याचाराचा इतिहास कित्येक शतकांच्या पृष्टांत खच्चून भरलेला आणि ज्याच्या सैतानी तांडवनृत्याच्या दणक्याखाली कित्येक साम्राज्यें चिरडून जमीनदोस्त झाली असता सैतान साधुत्वाचा मोठा आंव आणून वेदांताचीं प्रवचनें झोडू लागला म्हणून कां आम्ही त्याचीं स्तुतिस्रोत्रें गाण्यास एकदम प्रवृत्त व्हावे? वेदांत आवडत नाहीं कोणाला? सर्वांनाच तत्वज्ञान आवडतें. परंतु त्यावरुन तत्वज्ञानांचीं पुराणें झोडणारे सर्वच पुराणिक साधु समजावयाचें कीं काय? ज्याला बोलता येतें तो चांगलेंहि बोलतो आणि वाईटहि बोलतो. परंतु बोलणें आणि आचरण यांत बराच भेद असतो, हें मात्र विसरतां कामा नये. बोलणाऱ्याच्या आचरणाचा गत इतिहास काळाकुट्ट असल्याचें प्रत्यंतर आपणाला जर धडधडीत प्रत्ययाला येत आहे, तर त्याच्या तोंडातून बाहेर कोसळणाऱ्या वेदांतप्रवचनाच्या पांढऱ्याफेक फेंसानें त्याच्या अंतस्थ कारस्थानी वृत्तीचा नैसर्गिक काळेपणा स्वच्छ धुवून काढलाच असेल, असें मानण्यास काय आधार? ग्रामण्यांच्या इतिहासात महाराष्ट्रातील बऱ्याच प्रमुख समाजांची अंतर्बाह्य संस्कृति ठळक रीतीने चित्रित केलेली आढळते. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील या समाजांचा दर्जा काय होता, याचेंही स्पष्ट चित्र या इतिहासफलकावर मुद्देसूद रेखाटलेलें आपणांस पहावयास मिळतें. अर्थात सध्याच्या मन्वंतरांत जे जे तत्ववेत्ते पुराणीक राष्ट्रीय तत्वज्ञानांची पुराणें झोडण्यास पुढें सरसावलेले आहेत, त्यांची कुवत, त्यांची मूळ संस्कृति आणि त्यांच्या मनोवृत्तीची रचना काय आहे, या सर्व गोष्टींची पंचराशिकें सोडविण्याच्या कामीं आणि कोठें कोणतें प्रमाण व्यस्त येतें किंवा सम येतें हें बिनचूक दाखविण्याच्या कामी ग्रामण्यांचा