ग्रामण्यांचा इतिहास : Page 3 of 132

मदतीस घावण्याइतका तो मनाचा उदारही आहे. बिकट परिस्थितीच्या उलटया लाटा नाकातोंडात पाणी कोंबून राष्ट्राचा जीव गुदमरुन टाकू लागला की प्राचीन संस्कृतीच्या पुण्याईचा ''लाई बॉय'' घेऊन इतिहास पाठीमागे त्यास हात देण्यास दत्त म्हणून उभाच असतो. राजकीय किंवा धार्मिक जुलमांची तात राष्ट्राच्या मानेला लागतोच, प्राचीन संस्कृतीच्या व अनुभवाच्या तीव्र शस्रांने ती तात ताडकन तोडून राष्ट्राचा कासावीस झालेला जीव वाचविणारा कोण? इतिहासच. पोटांत एक आणि ओठात एक अशा दांभिक गारुडयाच्या चलचल मदारीच्या हालचलाखीने खोटयानाटया कल्पनांची धूळ डोळयात गेल्यामुळे राष्ट्र जेंव्हा होळे चोळू लागते आणि आत्मविनाशक शाबरी मंत्र्याच्या 'पासेस' मुळे त्यांची आत्मविश्वास शक्ती लंजूर होऊन त्याची प्राणज्योत मिणमिण करु लागते, तेव्हा केसरीवत् गर्जना करुन त्या डोंबाऱ्याच्या पांतप्यावर झडप घालून त्याची हाडके नरम करणारा आणि राष्ट्राच्या कानांत त्याच्या पूर्वसंचिताचा दिव्य मंत्र पुंच्कून त्याला निमिषार्धात सचैतन्य करणारा इतिहासाशिवाय दुसरा अश्विनीकुमार कोण? 2. सत्कृत्यांचा योग्य तो अभिमान असणें आणि त्यांचा निरंतर उपचार करुन स्तुती करणे हे जितकें स्वाभाविक आहे, तितकेंच दृष्कृत्यांकडे कानाडोळा करणें हेंही अस्वाभाविक नाही. हा मनुष्याचा स्वभावच पडला. परंतु उत्क्रांतीतत्त्वाला पातकांचा उच्चार आणि तत्संबंधी पश्चाताप ही जितकी पथ्यकारक होतात, तितका सत्कृत्यांचा जयघोष उपयोगी पडत नाहीं. पुराणकालाबद्दल फाजील अभिमान बाळगुन जुनें तितकें सोनें अशा प्रवृत्तीमुळे राष्ट्राच्या भूतकालीन पातकांवर पांघरुण घालणे म्हणजे नव्या मन्वंतराच्या नव्या आशिर्वादास आम्ही कुपात्र आहोत, अशी जबानी देणेंच होय. प्राचीन ग्रीक व रोमन राष्ट्रांच्या वैभवाबद्दल, बुध्दीमत्तेबद्दल आणि संस्कृतीबद्दल योग्य तो आदर राखून, त्यांच्या हातून जाणूनबुजून अथवा नकळत घडलेल्या पातकांची शक्य त्या निस्पृहतेनें छाननी केल्यामुळेंच आज पाश्चात्य राष्ट्रें लक्ष्मीसरस्वतीच्या प्रसादास पात्र झाली आहे. खुद्द इंग्लंडकडे जरी पाहिले तरी तेथील लोकांच्या राष्ट्राभिमानाची मुळतत्त्वे त्यांनी जरी अभंग ठेविलीं आहेत तरी सुध्द त्यांच्या प्राचीन इतिहासातील कृष्णकृत्यांचा खरमरीत निषेध करण्याला त्यांची मनोदेवता किंचितसुध्द कचरत नाहीं. एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत ब्रिटिशांच्या नव्या मन्वंतराचा उदय झाला, म्हणून तिच्या चरित्राकडे ब्रिटन लोक जितक्या अभिमानाने पाहतात व त्याचे स्तुतिपाठ गातात, तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने त्याच राणीच्या अंमदानींत बोकाळलेल्या ढोबळढोबळ अनीतीमूलक गोष्टींचे बाभाडे काढायला त्यांची सत्यप्रियता मुळींच मागेंपुढें पाहत नाही. प्रजासत्ताक राज्यपध्दतीचे उध्दरक म्हणून अग्रेसरत्वाचा धौशा चौखंडी गाजविणारे अमेरिकन लोक, गुलामगिरीच्या व्यापाराचा प्रश्न डोळयांपुढे येताच त्याचा तितक्याच जोराने निषेध करायला ते अझूनही दिक्कत बाळगीत नाहीत; उलटपक्षी त्या काळयाकुट्ट इतिहासांतील बारीकसारीक बाबतींचें संशोधन करण्यात ते अजुनही अविश्रांत श्रम करीत असतात. दिव्याखाली अंधेर हा असावयाचाच. परंतु जेव्हा एखादे राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच इतिहास तेवढा पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणूनबुजून अज्ञान दाखविते, तेंव्हा तें राष्ट्र त्याची प्राचीन संस्कृती कितीही उज्वल असो-नवीन मन्वंतराच्या प्रसादाला पात्र होणें कधींही शक्य नाही असे ठाम समजावें. 3. महाराष्ट्राच्या इतिहासांतील ग्रामण्याचा इतिहास हा एक काळाकुट्ट परंतु अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्रामण्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक दिव्याखालचा अंधार आहे. हा इतिहास हे एक कटुतम सत्य आहे. या सत्यावर मुद्दाम घालून ठेवलेले अनुपलब्धतेचें आणि क्षुलज्कपणाचें पांघरुण आमच्या राष्ट्रीय आकांक्षाचे पाय मधूनमधून खोलवर ओढीत नेत असतात. आमच्या आकांक्षारुपी गजेंद्राचा पाय या ग्रामण्यांच्या ........ पकडला आहे; परंतु आपला पाय कोण व कां ओढीत आहे याची जाणीव आम्ही नीट न ओळखल्यामुळे भगवंतालासुध्द आमच्या हाका आरोळयांना उत्तर देण्याची पंचाईत पडली आहे. पाश्चात्य देशांतील गुलामांच्या व्यापाराचा इतिहास वाचणाऱ्या पुष्कळ महाराष्ट्रीय इतिहासवाचकांस कदाचित कल्पनाही नसेल की गुलामगिरीच्या अमदानींत सुधारकपणाची शेख मिरविणाऱ्या पाश्चातांच्या हातून जी अमानयष कृत्ये घडली, त्यापेक्षा अधिकपटीनें हलकट पशर्ुवृत्तींचे वर्तन आमच्या महाराष्ट्रातील राष्ट्रधुरीणांच्या आणि धर्मसंरक्षक (?) वर्गाच्या हातून घडलेले आहे. अर्थात या पातकाला चव्हाटयावर बांधल्याशिवाय त्याच्या पुनरावृत्तीचा बंदोबस्त करणारा ''दवा'' कोण कसा सांगू शकेल? म्हणून आम्हीं हा राष्ट्राच्या सडक्या भागाचा इतिहास-आमच्या