ग्रामण्यांचा इतिहास : Page 2 of 132

लागला याबद्दल फार दिलगीर आहोत. णराठेशाहीतील व विशेषत: पेशवाईतील मोठमोठया पुस्तकांची स्वभावचित्रे त्यांची धोरणे; त्यांची परस्परांविषयींची स्पर्धा आणि त्यांचा राष्ट्रावर झालेला परिणाम यांविषयी रा.ठाकरे यांनी केलेली साधार व सोपपत्तिक चर्चा वास्तविक याच पुस्तकात यायला हवी होती. परंतु नाईलाज आहे. मजकूर बराच मोठा असून त्याचे एक स्वतंत्र पुस्तक आम्ही लवकरच छापून प्रसिध्द करणार आहोत. त्यातून सध्या ऐतिहासिक व्यक्त्यांच्या बाप्तिस्म्यांचा धुमाकुळ सुरु झाला आहे. सावित्रीबाई ठाणेदारणीला कोणी कायस्थ ज्ञातींतून चित्पावन ज्ञातीत ढजलीत आहेत. कोणी तिला कादंबरीतील नायिका म्हणत आहेत, कोणी नाना फडणीसांच्या अंत:करणाच्या खाणीतून कोहीनुरांचे ढीगच्या ढीग बाहेर काढीत आहेत, कोणी त्यांच्या मनोमय भूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरविण्याच्या गडबडीत आहेत, कोणी गोपीनाथ पंत बोकीलाला शिवाजीची चिटणीशी वतन बहाल देण्याच्या धामधूमीत आहेत, कोणी हेमाडपंतालाही ब्राह्मणी पोशाख चढविण्याच्या तजविजीत आहेत; तर कोणी मराठया आठवल्याला चित्पावनी बाप्तिस्या देण्याच्या खटपटीत आहेत. असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलोला आहे. तेव्हा या भानगडीत काय काय उलाढाल्या होतील ते पाहिले पाहिजे. न जाणो अफजखान हा शिवाजीचा मामा ठरण्याचा बराच संभव आहे. कारण कृष्णाने कंस मामाला ठार मारले म्हणून आणि मुरारबाजी हा चित्पावन असल्याचाही दस्तऐवज पुरावा सापडणार नाही कशावरुन? ऱ्ी सगळी धामधूम किंचित शांत झाली म्हणजे निवांतीने वरील पयस्तक ्म्ही प्रसिध्द करु, सरतेशेवटी ज्या ज्या विद्वान मंडळींनी या पुस्तकाच्या बाबतीत मदत केली त्यांचे, ज्या विद्वान ग्रंथकारांच्या ग्रंथांच्या ठिकठिकाणी पुरावा घेण्यात आला आहे. त्यांचे व तत्वविवेचक छापखान्यातील मालक व सर्व कामगार लोक यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.

बुधवार, आषाढी एकदाशी

सर्वांचा नम्र लेखक शके 1841, तारीख 9 जुलै 1919 इ. यशवंत शिवराम राजे दादर, मुंबई. प्रकाशक

॥ श्री ॥

ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड

उपोध्दत लेखक : केशव सीताराम ठाकरे

जगांतील कोणत्याही धर्मात पश्चातापाचे महत्त्व फार आहे. कृतकर्माचा उच्चार होऊन त्याबद्दल पश्चाताप झालास, म्हणजे मनुष्य पुनित होतो. तो ते कर्म पुनश्च सहसा करीत नाही. आणि तो पश्चाताप जर खरोखरी नाटकी नसेल तर कृतकर्माची व मनुष्याची पुन्हा यावज्जीव गांठ पडत नाही. परंतु पश्चाताप व्हायला तरी पदरी काही पुण्याई लागते म्हणतात त्यातून कृतकर्माच्या पातकांची स्मृती होणे, हे देखील मनाच्या शुध्दतेचे द्योतक समजले जाते. कृतपापांची तंतोतंत मोजदाद ठेवून त्याची वारंवार आठवण देण्याचे पुण्य कृत्य गतकालाचा इतिहास निस्पृहनाणें करीत असतो. उत्क्रांत्यवस्थेच्या प्रवासात मानवी पायांना गतकालीन पातकांच्या घोडयांवर ठेचाळण्याचा वारंवार प्रसंग येऊ नयें म्हणून हाच इतिहास गतानुभवाची दिवटी घेऊन मानवी सृष्टीच्या पुढें पुढें हुजऱ्याप्रमाणे नाचवित असतो. परमेश्वरी दिव्य इच्छेचे गुढ तत्त्व बरोबरसे नीट न उमगल्यामुळे मनुष्यांच्या हातून जी घोर अमानुष कृत्यें घडतात, ती पुन्हा घडू नयेत म्हणून हाच इतिहास वेळप्रसंग साधून मानवांच्या कृतपापाचा घडा त्यांच्या थोबाडावर निर्भीडपणाने घडाघडा वाचून दाखवून, त्यांची कानउघडणी करतो. भूतकाळामध्ये घडलेल्या क्षुल्लक चुकीचा भयंकर परिणाम वर्तमानकालीन मानवांना स्पष्टपणे सांगून त्यांच्या विचारयंत्राला नियंत्रित करण्याची कामगिरी हाच इतिहास सांगत असतो. भूतकालातील पापांचे पर्वत तुमच्या डोळयांपुढे मूर्तिमंत आणून उभे करणारा आणि 'पहा या उपर तुम्ही जर आपले वर्तन नीट सुधारलें नाहित, तर हेच पर्वत मी साऱ्या जगाच्या प्रदर्शनात मांडून तुमच्या बदनामीचा डंका पिटीत राहीन'' म्हणून सडेतोड दम भरणाराही इतिहासच. कृतपापावर जाणून बुजून पांघरुण घालणाऱ्या आणि डोळयांवर कातडे ओढून पुण्याईचा तोरा मिरविणाऱ्या दांभिकाच्या मुस्कटांत भडकावून,'चल चोरा! पापाचे माप भरल्याशिवाय पुण्याईच्या गप्पा मारतोस? अशी खरमरीत तंबी बिनमुर्वत देणारा इतिहासच. खऱ्याला खोटयाचा आणि खोटयाला खऱ्याचा मुखवटा घालून आडमार्गात ऐतिहासिक विश्वामित्री सृष्टीचे ठाणे देऊन वेळोवेळी डाकेखोरपणा करण्यास सवकलेल्या बिलंदाज टगांचे राजवाडे हुडकून काढणारा पटाईत डिटेक्टीव इतिहासच. पापांचे माप पदरांत बांधण्यात इतिहास जितका निर्दय आणि निस्पृह आहे, तितकाच पुण्याची गाठोडी घेऊन अडीअडचणीच्या वेळी