आई थोर तुझे उपकार: Page 3 of 3

प्रेम या दोन गोष्टी अत्यंत गूढ व मुग्ध असल्यामुळे नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेला त्यांचे सांगोपांग आकलन होणे शक्य नसते. अशा वास्तविक स्थितीत प्रस्तुत लेखकाच्या दुबळ्या लेखणीनेही ‘आई थोर तुझे उपकार’ या सूत्राने आईला, आपल्या भारत जननीला आणि त्या दयानिधि जगन्माउलीला, कृतज्ञतेने तुडुंब भरलेल्या हृदयाला कसेबसे सावरून, साष्टांग प्रणिपात घालण्यापलीकडे अधिक काय करणे शक्य आहे. जननीजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।।

।। वन्दे मातरम् ।।