जसं घडलं तसं

  श्रीकांत ठाकरे

जसं घडलं तसं हे प्रबोधनकारांचे सुपुत्र श्रीकांत ठाकरे यांचं आत्मचरित्र. त्यातलं ‘असे होते प्रबोधनकार’ हे प्रकरण खूपच रंजक आहे. हे पुस्तकदेखील त्यांनी प्रबोधनकारांनाच अर्पण केले आहे. त्याची अर्पणपत्रिका अशी, ‘ज्या भाषाप्रभूने मला एक अनमोल मंत्र दिला, ‘हर हुन्नर शिकून घे, आयुष्यात कधीही उपाशी मराणार नाहीस!’ ज्या माझ्या वडिलांना अनेक कला उपजत होत्या, त्या त्यांनी मला आपल्या रक्तातून दिल्या असल्याने जीवनात मी अनेक पैलू आत्मसात करू शकलो, त्या दिवंगत प्रबोधनकार ठाकरे या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या चरणी हे माझे आत्मचरित्र आदराने नि आत्मविश्वासाने अर्पण!’

प्रबोधनकार ठाकरे यांना १७ सप्टेंबर २००१ला ११५ वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांचे जवळ राहून त्यांचं कणखर कर्तृत्व नि तेजस्वी लेखणी, वाणी, आचरण नि सुधारणा यांचं जे दर्शन  मिळालं नि जो लाभ निळाला त्यांचा  हा शतांश परिपाक आहे. दादांनी आम्हांला संपत्ती नाही ठेवली, पण शब्दसंपत्तीचं जे कोठार दिलयं ते जन्मभर पुरीन रगडाभर उरेल असा आत्मविश्वास आहे. आम्ही या बाबतीत जगातल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक श्रीमंत आहोत. त्यांच्यांबद्दल काय सांगावं नि किती सांगावं? पण एक गोष्ट आवर्जून सांगायला बवी ता अशी की, दूर राहून या उत्तुंग व्यक्तिरेखेला ओळखता येत नाही. त्या व्यक्तीचा सहवास असावा लागतो नि आपल्यात निरिक्षणाची ओढ असावी लागते. दादांची प्रत्येक गोष्ट न् गोष्ट यांचा नीट अभ्यास केला. ती न्याहाळलीय म्हणून त्यांच्यांतले पैलू न् पैलू दिसू शकले. जी मुलं वडिलांच्या पैलूंची पहचान समजू शकत नाहीत ती कर्मदरिद्रीच म्हणायला हवीत. आम्ही जे दिसतो ती त्यांची कृपा नि आशिर्वाद!

दादा ‘प्रबोधन’ बंद झाल्यावरही अनेक वर्तमानपत्रांतून सातत्याने लेखन करीत होते. १९३७-३८ च्या सुमारास ते साप्ताहिक ‘प्रतीद’ च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारून कोणा एका यडबंबू इसमाने बातमी पसरवली होती की प्रबोधनकारांचा मृत्यू झाला. आम्ही लहान होतो. आमच्या आईमध्ये कणखरपणा नि विश्वास होता. तिने बातमी आणणा-या नि भयभीत झालेल्या मंडळींना विचारलं ‘हे कसं नि कशानं घडलं?’ ते म्हणाले, ‘त्यांना अपचन होऊन ते गेले!’ आई म्हणाली, शक्यच नाही. कारण इतके ते खातच नाहीत मग अपचन कसे होणार? खोटं आहे सारं हे मी विश्वासच ठेवणार नाही नि तुम्ही पण ठेवू नका!’ ते गेले. त्यांच्यातला एक आत्मविश्वास जागा झाला. जेव्हा  दादा बोटीने आले त्यावेळी सर्वजण धक्क्यावर जमले होते. दादांना आश्र्चर्य वाटलं, ही मंडळी का जमली आहेत? उतरल्यावर त्यांनी विचारलं तेव्हा मंडळींनी एक आक्रोश केला. तो क्षण आनंदाश्रूंनी डबडबला होता. घरी आल्यानंतर आईची अवस्थाही तीच झाली. तिला काय धीर द्यायचा? तीच मोठ्या धीराची होती. आत्मबळाची होती. त्यानंतर दादांनी आपल्या त्यावेळचा नवीव फोटो छापून फोटोवर तारीख होती ४ मे १९३८- एक लेख लिहिला, ‘माझ्या मृत्यूचा खुलासा’! यात त्यांनी लिहिलं होतं की ‘कुंभारवाड्यातील एका गाढवाने माझ्या मृत्यूची बातमी पसरवली. पण मी जिवंत आहे. नि तो जिवंतपणी मेला!’ आमच्या घरी म्हणजे कृष्णनिवास येथे इतकी गर्दी जमा झाली की सांगता येत नाही!

योगायोग पहा कसा आहे हे लिहित असताना आज मी कृष्णभवन येथे आहे. राजच्या निवासस्थानी. कृष्णाची कृपा! मी ७ वर्षांचा असताना मुंबईत आलो म्हणजे त्या कृष्णनिवास ते कृष्णभवनात यायला ६३ वर्षे लागली. पण जोशी बिल्डिंगमध्ये असताना एक किस्सा घडला तो असा– दादा सगळ्या वर्तमानपत्रांत ज्यांनी लेख मागितला त्याला द्यायचे. त्याच सुमारास ते ‘अग्रणी’ नावाच्या पुण्याच्या एका साप्ताहिकातून लिहायचे, पण अट हीच असायची की मला जे सत्य दिसेल त्यावर खणाणून लिहित, परवडेल असेल तर ‘हो’ म्हणा नाहीतर नाही सांगा!’ कारण आम्हाला दादांची हीच दीक्षा होती. सत्य सांगायला कोणाच्या बापाला घाबरू नका, पण मान झुकवी न का! मी नि बाळासाहेब त्यांच्या वचनाला जागृत राहिलो. जन्मात कधी त्याचा विसर पडू दिला नाही. काहींना

संदर्भ प्रकार: