लोकमान्य ते महात्मा: Page 8 of 11

भीड पडी है ना।
ठाकरे – देखा, सत्याग्रह इज अ बायएज्ड सोर्ड (सत्याग्रह ही दुधारी तलवार आहे.) (गांधी नुसते हसतात.)
ठाकरे – आपको सभास्थानपर जाना ही पडेगा महात्माजी।
गांधी – कैसे जाऊँ, कहो ना।
ठाकरे – सत्याग्रहीयों के छातीपरसे हम आये, वैसे।
गांधी – नहीं, नहीं. मेरे से वैसा नहीं बनेगा. यह तो बडा पाप है।
गांधी ठाकरेमार्गाने जाणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर ठाकरे यांनी पोलिसांरोबर त्या इमारतीची पाहणी केली. बंगल्याच्या मागील बाजूस एक गल्ली होती. ती रहदारीची नव्हती आणि तेथून सभास्थानापर्यंत जाणे शक्य होते. त्या गल्लीच्या बाजूला इमारतीची गॅलरी होती आणि गॅलरीला लागून खाली कुसाची बुटकी भिंत होती. ठाकरे यांनी दोघांना गल्लीत उभे केले, दोघांना कुसावर. गांधींना ‘चलिये महात्माजी, चलिये. सब तयारी हुयी. अब बातही करना नही।’ असे म्हणत उठवून गॅलरीत आणले. पोलिसांच्या साहाय्याने गांधींना गॅलरीतून कुसावरच्या दोघांनी घेतले. तेथून खालच्या दोघांनी अलगद खाली उतरवले. पोलीस अधिका-यांनी धडाधड उड्या मारून त्यांना सोबत केली आणि सारे जण चालत चालत झपाट्याने मैदानाकडे रवाना झाले. दोन-तीन मिनिटांतच ‘महात्मा गांधी की जय’ जयघोषाच्या आरोळ्या मैदानावर होऊ लागल्याचे कानी पडताच अंगणातले सत्याग्रही लडदू भराभर उठून बाहेर पडू लागले. त्यांना दरवाजावर संगिनी रोखून पोलिसांनी अडवून धरले आणि मग गांधींची सभा सुरळीत व सुखरूप पार पडली.
हा सर्व प्रकार शहरवासीयांना कळल्यावर संतापाची लाट उसळली. गांधीविरोधकांची छीः थू होऊ लागली. लोक त्यांच्या घरासमोर जमून त्यांना शिवीगाळी करीत धमक्या देऊ लागले. सार्वजनिक संतापाचे ते विराट स्वरूप पाहून काही व्यापा-यांनी, काही स्थानिक ब्राह्मणेतर पुढारी आणि पोलीस यांच्या मध्यस्थीने कॉटन मार्केटच्या आवारात ठाकरे यांचे व्याख्यान ठरवले. ठाकरे यांनीही घडलेल्या घटनांचा पाढा स्पष्ट बोलून विरोधकांच्या हीन वृत्तीचा खरपूस समाचार घेतला. दोन-तीन मारवाडी व्यापा-यांनीही पश्चात्ताप व्यक्त केला आणि महात्मा गांधींची जाहीर माफी मागितली. त्यामुळे जनतेचा क्षोभ शांत झाला.
या काळात व-हाडमधील ब्राह्मणेतर मंडळी काँग्रेसमध्ये आली होती. चार-पाच दिवसांनंतर मोर्शी येथे झालेल्या सभेत गांधींना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखवले, ते डॉ. पंजाबराव देशमुखांनी. गांधींचा तेथील मुक्काम होता, प्रसिद्ध ब्राह्मणेतर वकील नानासाहेब अमृतकर यांच्या घरी. त्यांनी व पंजाबरावांनी ठाकरे यांनाही तेथे बोलावले होते. तेथील सभेत ठाकरे यांनी गांधींच्या बारीक आवाजातील हिंदी भाषणाचा मराठी सारांश श्रोत्यांना मोठ्याने ऐकवला. त्यामुळे त्यांचा घसा बसून त्याचे खोबरे झाले. सभेनंतर त्यांचा तो आवाज ऐकून गांधींची विनोदबुद्धी जागृत झाली. ते हसून म्हणाले, ‘‘कैसा किया. ठीक हुआ नं? पूनेमें मेरेको ठाकरेजीने भाऊराव पाटील के बारेमें इतना छेडा था, इतना छेडा था, बस, कह नहीं सकता। आज मैंने उस बातका पूरा बदला ले लिया।’’
प्रबोधनकार ठाकरे गांधीवादी कधीच नव्हते, काँग्रेसनिष्ठही नव्हते. ते ब्राह्मणेतर चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते असले, तरी त्यांचे वर्णन ब्राह्मणेतर हिंदुत्ववादी असे करता येईल. हिंदुधर्माच्या –हासाला ब्राह्मणांची पुरोहितशाही जबाबदार आहे, असे समजून त्यांनी आयुष्यभर ब्राह्मणांवर टीकेची झोड उठवली. हिंदु धर्माशी निगडित सर्वच बाबींचे त्यांनी ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे वर्गीकरण केले. अगदी दैवतांचेसुद्धा.
त्यानुसार गणपती हे ब्राह्मणी दैवत आणि साहजिकच टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव हा ब्राह्मणी उत्सव. त्यामुळे त्यात ब्राह्मणेतरांनी भाग घेऊ नये, असे ते सांगत; पण असे सांगून ते पुरेसे ठरणार नाही, हे लक्षात घेऊन ठाकरे यांनी दादर येथे गणेशोत्सवाला पर्याय म्हणून समांतर असा नवरात्रामधील दुर्गापूजेचा उत्सव ब्राह्मणेतरांसाठी सुरू केला. पण हा प्रकार केवळ शह-काटशहाचा मानावा लागेल. मुळात ठाकरे यांचा देवळांनाही विरोध होता.
केशवराव ठाकरे गांधीवादी किंवा काँग्रेसनिष्ठ नसले, तरी महाराष्ट्रातील आधीच्या टिळकानुयायांनी आणि नंतर हिंदुसभावाल्यांनी गांधींना चालवलेला विरोध हा त्यांच्या ब्राह्मणी विचारांचीच निष्पत्ती होय, असा त्यांचा समज होता. तेवढ्यापुरता त्यांचा गांधींना पाठिंबा व हिंदुसभेला विरोध होता. हिंदू महासभेचे राजकारण हे

संदर्भ प्रकार: