लोकमान्य ते महात्मा: Page 11 of 11

म्हणण्याप्रमाणे शिवाजीचे राज्य जर हिंदुराष्ट्र असेल, तर शिवाजीच्या सैन्यातील व प्रशासनातील मुस्लिमांची संगती लावता येत नाही. सावरकरांच्या हिंदू संघटनेत मुसलमान ही कल्पनाही आपण करू शकत नाही. इतकेच नव्हे, तर जनसंघाने मुस्लिमांना प्रवेश देणेही त्यांना मुळीच आवडले नव्हते.
ठाकरे त्या काळी चालू असलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणावर टीका करतात. त्यात ते संघ आणि सभा या दोहोंचाही समाचार घेतात. ‘जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या प्रत्येक राजकारणी हालचालींची माहिती निरर्गल शब्दांत त्यांच्या पुणेरी पत्रांत दररोज चालू असते,’ याचा उल्लेख करून ठाकरे ‘महात्मा गांधींच्या सर्वच्या सर्व मते सर्वांनाच पटतात, असे नाही, पण ते एक राजकारणी पुरुषोत्तम आहेत, जगदवंद्य महान साधू आहेत. याची साक्ष पंचखंड दुनिया देत असताना पेशवाई पिंडाचा हरएक असामी आणि त्यांची वृत्तपत्रे महात्मा गांधींना शिव्या देत असल्याचे’ ही निदर्शनास आणतात.
ठाकरे यांच्या लिखाणाचे सूत्र गांधींच्या मागे लोक असून, हिंदू महासभा ही मूठभरांची संघटना आहे, हे आहे. ठाकरे यांचे हे सूत्र वस्तुस्थितीला धरून नाही, असे म्हणणे अवघड आहे; पण ठाकरे येथे थांबत नाहीत. ते या मूठभरांची जातही काढतात.

***

संदर्भ प्रकार: