‘प्रबोधन’कारी तारुण्य

- विद्याधर गोखले

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, खासदार विद्याधर गोखले यांनी लिहिलेला प्रबोधनकारांवरचा मृत्युलेख. हा लेख ‘लोकसत्ते’त छापून आला, ती तारीख होती, २५ नोव्हेंबर १९७३.

काही काही अंत्ययात्राही खूप बोलक्या असतात. दिवंगत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अखेरचा लखलखीत प्रकाशझोत टाकणा-या अचूक भाष्याप्रमाणे असतात! गेल्या बुधवारची प्रबोधनकार केशव ठाकरे यांची निर्वाणयात्राही अगदी तशीच होती. प्रबोधनकारांच्या चिरतरूण व्यक्तिमत्त्वाने मराठी तरुण मन किती भारावले होते याची साक्ष पटविणारी! एरव्ही, ८९ वर्षांच्या वृद्धांच्या अंत्ययात्रेत पन्नाशी ओलांडलेल्या वृद्ध माणसांचीच संख्या अधिक असणे साहजिकच, कारण नव्या पिढीला त्यांचे कर्तृत्व कितीसे ठाऊक असणार? 'दर वीस वर्षांनी एक पिढी बदलतो' हे सामान्य तत्त्व गृहीत धरले, तर आजचा विशीतला तरुण केशवरावांपासून किमान तीन पिढ्या दूर असावयास पाहिजे होता! पण तसे झाले नाही. सुमारे पन्नास हजारांच्या त्या यात्रेतील ९० टक्के माणसे तरुण होती. विशीपासून चाळीशीपर्यंतची! संयुक्त महाराष्ट्राचा हा एक थोर शिल्पकार. 'मराठा तितुका मेळवावा! महाराष्ट्र धर्म वाढवावा' हे ब्रीद आमरण उराशी बाळगणारा हा फटकळ लेखणीचा, वाणीचा, पण निर्मळ करणीचा मर्द मराठा; अंतिम क्षणापर्यंत 'उठ, मराठ्या उठ' असे प्रबोधन करणारा हा सव्यसाची पत्रकार; 'शिवसेने'चा साक्षेपी प्रेरणादाता आजच्या मराठी तरुणांचा असा 'कलेजा' का व्हावा? कर्तबगार वयोवृद्ध माणसे अनेक असतात, पण सर्वच वृद्ध युवकप्रिय असतातच असे नाही. मग केशव सीताराम ठाकरे हा व्यक्तिविशेषच तरुणांना एवढा शिरोधार्य का वाटावा? वार्धक्य कापूर उत्तर उघड आहे. दादासाहेब ठाकरे यांनी आमरण तरुणांच्या व्यथांना, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडली. त्यांना कठोर परिस्थितीशी झुंजवण्यासाठी धीर दिला, हिंमत दिली, आणि- वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फांकडे भ्रांत तुम्हा का पडे? ही जाणीव देऊन त्यांची अस्मिता जागवली! गुणशाली लेखक असो, कलाकार असो, नट असो, गायक असो, गुण-लुब्ध दादांनी तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली नाही, असे कधी घडले नाही. आणि ते सदैव नव्या पिढीबरोबर अशी वाटचाल करू शकले याचे कारण ते स्वत: अखेरपर्यंत वृत्तीने ताजे-टवटवीत नि तरुण होते. एका विख्यात शायराने केलेले वर्णन दादासाहेब ठाकरे यांना तंतोतंत लागू होते- थकली तनू ही जर्जरा ' वार्धक्य-कपूर' हा जरी! तरि यौवनाची आग्रही याच्या वसे नित अंतरी आणि ही गोष्ट सोपी नाही. 'वृद्धत्वी निज यौवनास जपणे' भल्याभल्यांना जमत नाही! प्रबोधनकार अखेरपावेतो रसरशीत तरुण वृत्तीचे होते. सकाळी उठल्यावर ते स्वत:च्या हाताने गुळगुळीत दाढी करून मगच दिनचयेर्ला प्रारंभ करायचे. ओशाळी बावळी चर्या त्यांना खपत नसे! दोन तीन महिन्यांपूवीर्च प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'जीवन-गाथे'ची प्रूफे त्यांनीच तपासली होती. अखेरपर्यंत अनेकविध विषयांवरील त्यांची अनुभव-ज्ञानसंपन्न 'अप टु डेट रनिंग कॉमेंट्री' ते येणा-या जाणा-या तरुण कार्यकर्त्यांना उत्साहाने ऐकवीत. ते सर्व वृत्तपत्रे वाचत. मध्यंतरी दृष्टी फार अधू झाली तरी ते हताश झाले नाहीत. कारण रेडिओवरील बातम्या नि भाषणे लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा परिपाठ अखेरपावेतो कायम होता. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला त्यांना उचलून व्यासपीठावर नेण्याची व्यवस्था कार्यर्कत्यांनी केली, पण त्यांना ती मंजूर नव्हती. ते स्वत:च्या पायांनीच व्यासपीठावर आरुढ झाले. शिवसेनेच्या एका 'बेकार मोर्चा'ला ४-५ हजारच लोक होते. तेव्हा ते तरुण कार्यकर्त्यांवर कडाडले. 'इतकेच लोक? अरे, मुंबईत किमान तीस-चाळीस हजार बेकार आहेत!...कंबर कसून काम करा.' अखेरपावेतो बारीकसारीक गोष्टीत त्यांचे बारीक लक्ष अन् परखड मार्गदर्शन! तरुणांना रुचणारा तडफदारपणा त्यांच्यात होता. अन् मिळमिळीत मुर्दाडपणाचा त्यांना अतिशय तिटकारा वाटे! शेलारमामा हवेत असे तारुण्य वृद्ध देहात असले, तरी तरुण मनाला आकषिर्त करतेच करते. मनाने केव्हाच मरून गेलेले गलितगात्र म्हातारे आपण ठायी ठायी पाहतो अथवा म्हातारपणी विशोभित पोरखेळ करणारे महाभागही अनेक असतात! पण प्रबोधनकारांसारखा चिरतरुण वृद्ध विरळाच. महाराष्ट्रातील 'एकसष्ठी'बहाद्दर वृद्धांनी पेन्शनकडे डोळे लावून भकास जिणे जगण्यापेक्षा हा 'प्रबोधन'कर्ता आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. कारण महाराष्ट्राला आज जशी तरुण तानाजींची

संदर्भ प्रकार: