टेलिफिल्म बनवताना

निर्माते राजेश जैन आणि दिग्दर्शक सुरेंद्र केतकर यांनी प्रबोधनकारांच्या जीवनावर ‘कर्मयोगी प्रबोधनकार’ ही टेलिफिल्म बनवलीय. ती बनवताना आलेले अनुभव किस्सेवजा आठवणींच्या रुपाने सांगताहेत सुरेंद्र केतकर.

किस्सा एक
बाल वयातले प्रबोधनकार आपल्या शाळेतील ब्राह्मण सवंगडयांबरोबर शाळेतून घरी परतत असताना त्यांच्या अंगावर शेजारुन जाणा-या अन्या महाराची सावली पडते. सवंगडी त्याला विटाळ झाला म्हणून चिडवतात. प्रबोधनकार धावत आपल्या आजीकडे, बयकडे येतात. त्या चिडवणा-या मुलांना चांगले झापतात आणि पिटाळून लावतात, असा प्रसंग चित्रित करायचा होता. ६-७ वर्षांची ४-६ ब्राह्मणांची मुले चकोट करुन शेंडी ठेवलेली आणि टोप्या घातलेली. सर्व मुलांचे खरेखुरे चकोट केले होते. सुरुवातीला मुले थोडी नाराज होती पण शूटींग होणार म्हणून मुले खुश झाली होती. या मुलांची कामं सुलभा देशपांडेंच्या बरोबर होती. हे चित्रिकरण एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपल्यावर होते. सर्व मुले मेकअप करुन, धोतरं नेसून ख-या चकोटावर खोटया शेंडया लावून, शर्ट घालून, हातात शाळेच्या पिशव्या घेऊन तयार झाली. मुलं तयार होईपर्यंत दुसरे दृष्य चित्रित करत होतो ते संपले. पुढच्या सीनचे म्हणजे मुलांच्या सीनचे लाइटींग सुरु झाले आणि अचानक आभाळ भरुन आले. धो धो पाऊस सुरु झाला. भर दुपारी बारा साडेबाराला काळोख आणि धो धो पाऊस, काय म्हणावं याला? सर्व युनिट जिथे मिळेल तिथे आडोशाला गेले. सर्वांना बसून रहाण्याशिवाय पर्यायच नव्हता. पाऊस थांबायचे नाव नाही. दीड वाजला. युनिटचा लंच टाईम झाला. म्हटलं लंच होईपर्यंत पाऊस थांबेल. पण कसचे काय, पाऊस सुरुच. जोर कमीजास्त होत होता इतकेच. सर्वजण काळजीत. मुलांच्या आया विचारु लागल्या आज होईल ना शूटींग? दिग्दर्शक या नात्याने मी तरी काय सांगणार. पाऊस थांबवणं माझ्या हातात नव्हतं. सुलभाताईंनी मला मेकअप रुममधे बोलावलं म्हणाल्या 'सुरेंद्र कसं होणार उद्या मला मद्रासला जायचंय. १२-१३ दिवस मी नाहीये.' चार वाजले. पाऊस थांबेल या आशेवर होतो. पाऊस लगेच थांबला असता तरी तीन सीन होणे शक्य नव्हते. एक सीन झाला तरी पुरे होते. दोन सीन नंतर केले असते. मुलांना आणि आयांना, मुलांचे चकोट केले आणि काम होत नाही याचेच दुःख होते. पण इलाज नव्हता. निसर्गापुढे कोण काय करु शकणार. सहा वाजले शूटींगची शिफ्ट संपली. पॅकअप करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आया हिरमुसल्या. अबोलाच धरला म्हणा ना. सहाय्यकाला दुस-या दिवशीच्या शूटींगची तयारी करायला सांगून आम्ही निघालो. पुढील दोन-चार दिवस बाकीचे इनडोअरचे प्रसंग चित्रित झाले आणि बाहेर कडकडीत ऊन. म्हटलं कालच अचानक काय झालं होतं? सुलभा देशपांडे मद्रासहून परत आल्यावर १३-१४ दिवसांनी परत शूटींगच्या तारखा ठरल्या. मुलांच्या आयांना तसे फोन केले. त्यांनी विचारलं योवेळेस तरी नक्की शूटींग होईल ना? असं विचारणं वेडेपणाचं होतं. मग मीही अगदी होणार नक्की होणार, असे सांगून मोकळा झालो. त्यानंतर विचारलं मुलांचे केस थोडे वाढलेत आता परत केस कापायला ती तयार नाहीत. मनात म्हटलं ती तयार नाहीत का तुम्हालाच इच्छा नाहीये. मी म्हटलं 'स्टुडिओत जाऊ मग बघू' शूटींच्या दिवशी सर्व कलाकार तंत्रज्ञ नऊ वाजता स्टुडिओत हजर झाले. मुलांच्या डोक्यावर वेलवेटसारखे थोडे थोडे केस उगवले होते. आया आल्यापासूनच म्हणायला लागल्या 'मुलं अजिबात केस कापायला तयार नाहीत.' मनात म्हटलं 'यांना सांगण्यात अर्थ नाही.' चुपचाप मी माझ्या असिस्टंटला आणि स्पॉटबॉयला बोलावलं आणि सांगितलं या पाचही मुलांना घेऊन स्टुडिओबाहेरच्या दुकानात न्या. हवे ते चॉकलेट-बिस्किटं द्या. बाजूच्या न्हाव्याकडे नेऊन एकेक वस्तरा फिरवा. दोघांनी काम चोख बजावले. मुलांनी एकदाच किंचित हुंदका दिल्यासारखं केलं. नंतर गप्प. आयासुध्दा थंड पडल्या. सुलभाताईंनी मुलांना प्रेमाने जवळ घेतलं, मुलांच्या रिहर्सल झाल्या होत्या. त्यामुळे डायलॉगला काहीच त्रास न होता सर्व सीन पार पडले. मुलांनी कामं खरोखरच छान केली आणि ती दिसलीही गोड.

किस्सा दोन

संदर्भ प्रकार: