प्रबोधनकारांचा सातारा

सातारा आणि प्रबोधनकार यांचं नातं अनोखंच. कर्मवीर भाऊरावांनी सांगितल्याप्रमाणे सातारा ही प्रबोधनकारांची खरी कर्मभूमी आहे. त्याच्या आधुनिक इतिहासावर प्रबोधनकारांची छाप आहे, हे आजच्या पिढीला कुठे ठावूक असेल? सांगताहेत प्रबोधनकारांचे ज्येष्ठ अभ्यासक महावीर मुळ्ये.

जागृत साता-याचा प्राचीन इतिहास
महाराष्ट्राच्या दक्षिण पठाराच्या पश्चिम भागात वसलेला (जुना) सातारा जिल्हा. याचा बराचसा मुलूख डोंगराळ व द-याखो-यांनी व्यापलेला आहे. सातारा शब्दाची व्युत्पत्ती- मूळ सातारे नावापासून सातारा हा शब्द बनला आहे. किंवा सतरावरून सातारा शब्द आला असावा. सातारच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून सात ओढे वाहतात. ते भल्या मोठ्या द-यातून वाहतात. या सातद-यावरूनच सातारा हे नाव पडलं असावं. सातदरे-सातारे-सातारा ही व्युत्पत्ती योग्य वाटते. पिढ्यानंपिढ्यांच्या कर्तबगारीने इतिहास रंगत असतो. प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा आजही या जागृत साता-यानं अभिमानानं आपल्या छातीच्या दगडावरील चिन्हे आणि खुणांनी जपलेल्या आहेत. आगाशिवाच्या डोंगरातील बौद्धलेणी इसवी सनापूर्वी अडीचशे वर्षापासूनची असून ‘गोपालपुरास संघमित्रास लेणं दैयधर्म’ म्हणजे गोपाळाचा पुत्र संघमित्र याचा दानधर्म असे एक लेणे आहे. मगध विद्यापीठाची शाखा आगाशिवाच्या लेण्यात होती.

इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अखेर साता-यात चालुक्य. राष्ट्रकूट, सिंघण, शिलाहार, यादव यांचा अंमल होता. चौदाव्या शतकात देवगिरीचं राज्य संपलं आणि बहामनी राज्याची अस्मानी सुलतानी सुरू झाली. सन १५०० साली आदिल शहानं जावळी प्रांत मोरे घराण्याकडे दिला. मोरे यांनी मर्दुमकी गाजवून परिंद्यांच्या लढाईत बुर्हण निजामाचा पराभव केला. १६३७ साली शहाजी राजे भोसले आदिलशाहकडे चाकर होते. त्यामुळे अहमद आदिल शहानं शहाजीस क-हाड प्रांत बावीस गावाची जहागिरी दिली.
सन १९३९ साली शहाजीच्या मदतीनं मुधोजी आणि बजाजी निंबाळकर साता-याच्या किल्ल्यातून सुटून फिरून फलटनचे जहागीरदार झाले. पुढीलसाठी १६४० बजाजीची बहिण सईबाई हिचं शाहपुत्र ‘शिवाजी’ शी लग्न झालं.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर महाबळेश्वर ते क-हाड पर्यंतचा कृष्ण नदीचा परिसर स्वराज्यात सामील झाला. सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणा-या या जिल्ह्यातील व्यक्तींची खास अशी वैशिष्ट्यं आहेत. मराठमोळी स्वाभिमानी लढाऊ वृत्ती, विशिष्ट शेती व्यवस्था, व भौगोलिक परिस्थिती यामुळे येथील शेतकरी थेट शिवकालापासून ते आजतागायत मानी व स्वातंत्र्यप्रिय आहेत. बेडर आणि त्यागी वृत्ती त्यांच्या नसानसातून खेळलेली आहे. तो कसलाही अन्याय सहन करणारा नाही.

सातारा म्हणजे लढाऊ मराठी बाणा व तेजस्वी छात्र परंपरा गनिमी काव्यानं लढणा-या शूर वीरांचं जणू केंद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला बळकटी आणणारे निष्ठावान मावळे साता-याच्या डोंगराळ व जंगलाच्छादित भागात रहात होते. शौर्य व स्वतंत्रवृत्ती हे सर्वसामान्यांचं ब्रीद होतं. दडपशाहीचा प्रतिकार करण्यास तो खवळून उठतो. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय आंदोलनात त्यानं सातत्यानं धडाडीनं भाग घेतला आहे.
आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीची पाळंमुळं सातारा जिल्ह्यात रूजली. याच जिल्ह्यानं सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सातत्यानं एकाच पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित केली आहेत. सामाजिक क्रांतीत अग्रेसर असणारा आणि भारताच्या भावी स्वातंत्र्याच्या लढ्याची पायाभरणी याच जिल्ह्यानं केली. अशा जागृत सातारा जिल्ह्यात प्रबोधनकारांचं वास्तव्य होतं. महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणजे एक बहुरंगी नि बहुरूपी कर्तृत्ववान पुरूष, त्यांनी उभ्या आयुष्यात निर्भिड पत्रकार, साहित्यिक, नाटककार, छायाचित्रकार, शिक्षक, टंकलेखक, ओजस्वी वक्ते, झुंजार नेते, वादविवादपटू, संपादक, पटकथा, संवादलेखक, चरित्रकार, सत्यशिल इतिहास संशोधक, उद्यमशिल व्यावसायिक, ज्वलंत समाज सुधारक, कनवाळू दलितोद्धारक, आधुनिक सत्यशोधक, प्रतिभावंत कलाकार, अशा विविध भूमिका केल्या. १९२० नंतरच्या पाच दशकात सा-या महाराष्ट्रात त्यांचा मोठा दरारा होता.

प्रबोधनकार मुंबई इथं नोकरीत असताना दादर इथं स्वाध्याय आश्रम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवित होते. आपल्या सामाजिक कार्याच्या विस्तारासाठी स्वत:च्या मालकीचं एक मासिक आपल्या विचाराच्या प्रचारासाठी १६ ऑक्टोबर १९२१ रोजी सुरू केलं, त्याचं नाव होतं, ‘प्रबोधन’. अल्पावधीत प्रबोधन मासिक महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचलं होतं. याच स्वाध्याय आश्रमात सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील येत होते. त्या दोघांची सच्ची मैत्री झाली. दोघंही जन्मजात

संदर्भ प्रकार: