महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार

प्रबोधनकारांच्या वेबसाईटला दोन वर्षे पूर्ण होतायत. पहिल्याच वर्षी या वेबसाईटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सचिन परब यांनी लिहिलेला हा लेख...

आपल्या सगळ्यांची वेबसाईट prabodhankar.com च्या उदघाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.

गेल्या वर्षभरात आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे. ‘गांधर्ववेद प्रकाशना’ने महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य सरकारच्या ’लोकराज्य’ या मासिकाच्या वाचन विशेषांकात आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.

संधी मिळेल तेव्हा मीदेखील सातत्याने प्रबोधनकारांवर लिहित आलो. विशेषतः ‘या मारुतीचे बाप प्रबोधनकार’ आणि ‘बाबासाहेब आणि प्रबोधनकार’ या ‘नवशक्ती’तील लेखांची चांगली चर्चा झाली. मला विविध ठिकाणी व्याख्यानांसाठी बोलावले जाते. त्या प्रत्येक ठिकाणी विषयाशी संबंधित प्रबोधनकारांचे विचार मांडण्याचा यशाशक्ती प्रयत्न केला. डोंबिवलीत तर फक्त प्रबोधनकार याच विषयावर माझी भाषण झालं. या सगळ्यातून प्रबोधनकारांचं आकलन होण्याच्या दृष्टीने मला मदत झाली, असं मला वाटतं. पत्रकार अनंत गुरव ‘प्रबोधनची पत्रकारिता‘ या विषयावर पुणे विद्यापीठातून डॉक्टरेटसाठी संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांनी वेबसाईटची मदत झाली. प्रबोधनकारांविषयी माहिती मिळवण्यासाठी मला सातत्याने फोन आणि मेल सुरू असतात.

यावर्षीही प्रबोधनकारांच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम करावा अशी इच्छा होती. पुण्याचे डॉ. सदानंद मोरे, औरंगाबादचे डॉ. ब्रम्हानंद देशपांडे या मान्यवर वक्त्यांशी बोलणेही झाले. पण कामांच्या तसेच तब्येतीच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तसेच या वर्षभरात वेबसाईटवर अपेक्षित असलेले अपडलोड्स करण्यात मी कमी पडलो. त्यामुळे दाखवण्याजोगे कामही माझ्याकडे नव्हते. हेदेखील कार्यक्रम न घेण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

या दिरंगाईसाठी मी वेबसाईटशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची माफी मागायला हवी, असंही मला प्रामाणिकपणे वाटते. मात्र सगळा आळस आणि इतर कामांचा पसारा झटकून मी आता पुन्हा कामाला लागलो आहे. काम करावे तितके कमीच आहे. पण लवकरात लवकर म्हणजे प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीपर्यंत, २१ नोव्हेंबरपर्यंत यातले महत्त्वाचे सगळे अपडेट पूर्ण करून वेबसाईटमधे कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन, अशी खात्री देतो. त्यानंतर पुढे त्यातली इंटरऍक्टिविटी वाढवणं, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून साईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ईबूकच्या स्वरूपात प्रबोधनकारांचं साहित्य उपलब्ध करून देणं ही नजीकची टार्गेट आहेत.

परवा १७ सप्टेंबरला प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या ‘नवशक्ति’तल्या कॉलमात एक लिहिला होता, ‘महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार’. हे त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असलं तरी दुर्लक्षित आहे. मूळ लेख जशाच्या तसा कटपेस्ट.

जळगावहून प्रसिद्ध होणारं ‘बातमीदार’ हे साप्ताहिक ब्राह्णणेतर आंदोलनातलं एक महत्त्वाचं नियतकालिक. पण आडगावातलं असल्यामुळे याचं योगदान दुर्लक्षित राहिलं. संपादक नेहतेंच्या प्रेमापोटी प्रबोधनकार ठाकरे १९४०-५० च्या दशकात जवळपास नऊ वर्षं यात लिहित होते. यात प्रबोधनकारांचं एक सदरही चालत असे. ‘वाचकांचे पार्लमेंट’. त्यात वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रबोधनकारांची त्याला दिलेली खुसखुशीत उत्तरं, अशी ही मेजवानी असायची. त्यातले काही लेख आज उपलब्ध आहेत.

‘वेश्यांनी राष्ट्रगीत म्हणणं हा राष्ट्राचा अपमान नाही का’,

संदर्भ प्रकार: