पोष्ट तिकिटाच्या निमित्ताने

प्रमोद महाजन केंद्रीय दळणवळण खात्याचे मंत्री असताना १९ मे २००२ रोजी प्रबोधनकारांच्या पोष्ट तिकिटाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी प्रबोधन प्रकाशनने प्रबोधनकारांविषयी माहिती देणारं छोटंसं पत्रक काढलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या वडिलांविषयी सांगितलेले दोन शब्द हे याचं वैशिष्ट्य आहे.

सुधारकाची साक्षात मूर्ती
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे जीवन म्हणजे अन्यायविरुद्ध त्यांनी केलेल्या अखंड संग्रामाचे महाकाव्य असे म्हणता येईल. मिळेल तेथून ज्ञान संपादन करण्यासाठी आधाशाप्रमाणे वाचन करणारे आणि सखोल चिंतन करुन त्यासाठी लढणारे विचारवंत असे त्यांचे वर्णन करता येईल. आजकाल प्रागतिक म्हणून मिरवायाचे असेल तर महात्मा फुले यांना स्मुतीसुमने वाहिली की पुरेसे होते. पण पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून फुले यांचा छळ झाल्यानंतरच्या काळात फुले यांचा लढा पुढे चालविण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे पुण्यात तळ ठोकून राहिले. त्यांच्या मार्गात विरोधकांनी आणलेले सर्व अडथळे त्यांनी मोडून कोढले व त्यांनी केलेल्या छळास तोंड दिले. फुले यांचा लढा त्यांनी पुढे चालवितांना सा-या विरोधकांची दाणादाण उडविली. त्यांची भाषणे आणि त्यांचे लेखन इतके प्रभावी होते की, त्याचे लेखन इतके प्रभावी होते की, त्याच माध्यमातून सत्यशोधकाचा लढा महाराष्ट्राच्या कानाकोप-यांत पोहचला.
तत्वाचा प्रश्न आला की त्यांनी त्याबाबत कधीही तडजोड केली नाही. विधवांच्या केशवपनाची ती अभ्रद रुढी असो, देवालयांतील ब्राह्मण पुजा-यांची हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो वा हुंड्याचा, न्याय मिळण्यासाठी सारख्याच त्वेषाने किंवा तिकडीने लढत रहावे इतकेच त्यांना मोहवश करण्याचा प्रयत्न केला. पण त्या जाळ्यात ते कधीहि सापडले नाहीत. अत्यंत सावधानपूर्वक या मोहापासून दूर राहिले. अन्याय रुढी, जाती व्यवस्था आणि अस्पृशता दूर करण्यासाठी वक्तृत्व लेखन आणि प्रत्यक्ष कृती या माध्यमातून त्यांनी सतत पुराणमतवाद्यांशी लढा दिला.
धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास आणि “धर्म” या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रुढ परिपाठ आहेत, ते सर्व ब्राह्मणांनी स्वत:च्या हितासाठी प्रस्थापित केले आहेत, या दुष्ट रुढींमुळेंच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारापासून वंचित अशा गरीब बहूजन समाजावर अन्याय होतो, असे त्यांना वाटत असल्याने प्रबोधनकारांनी या मूळावर म्हणजे भिक्षुकशाहीवर घाव घालण्याचे ठरविले. सुधारक विचाराच्या, उदारमतवादी ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. म्हणून त्यांनी “खरा ब्राह्मण” नाटक लिहले. या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते राजश्री शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वत:च सुधारणावादी आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे प्रबोधनकारांचे ते चाहते झाले यात आश्चर्य नाही.
नंतर पुढे मुंबईत स्थायिक झाल्यावर त्यांनी हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली. हुंडा पद्धतीवर कडक घणाघाती हल्ले केले. तसेच सर्व जातीची ‘हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना’ स्थापना केली. ही सेना स्वाध्याय आश्रम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केली व त्यासाठी आपल्या प्रबोधन मासिकाचा उपयोग केला. या हुंडा प्रतिबंधक मोहिमेचा इतका चांगला परिणाम झाला की त्यामुळे अनेक वरपित्यांना आधी घेतलेली हुंड्याची रक्कम वधुच्या पित्यांना परत करणे भाग पडले.
ते एक विपुल लेखन करणारे, झपाटलेले लेखक होते. पण त्यांचा भर साहित्यिक गुणविशेषवार नसून सर्व लेखन विशिष्ट ध्येयाच्या प्रसारासाठीच होते. त्यांनी लिहलेली “टाकलेले पोर” आणि “खरा ब्राह्मण” ही दोन्ही नाटके त्याच स्वरुपाची असणे स्वाभाविक होते. या नाटकांनी इतिहास निर्माण केला.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यांचा जीवनातील सर्वात महत्वाचा लढा होता. वार्धक्यामुळे धावपळ अशक्यप्राय होती. तशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला नेतृत्व दिले. आचार्य अत्रे आणि कॉम्रेड भाई डांगे यांच्या बरोबरीने त्यांनी चळवळीचे काम केले. या लढ्यात त्यांनी सर्वात महत्वाची अशी एक भूमिका बजावली ती ही की, अनेक वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना या चळवळीसाठी संघटीत करण्यात त्यांनी यश मिळविले. चळवळ यशस्वी होईपर्यंत सर्वजण एकत्र टिकून राहिले हे प्रबोधनकारांच्या मुत्सद्देगिरीचे आणि अधिकाराचे फलित आहे.
पोस्ट तिकिट प्रकाशनाच्या वेळी छापण्यात आलेल्या प्रबोधनकारांच्या परिचयपुस्तिकेतला हा छोटा इंग्रजी

संदर्भ प्रकार: