जन्मगावात विस्मृतीत गेलेले प्रबोधनकार

पनवेल हे प्रबोधनकारांचे जन्मगाव. तिथेच त्यांच्यावर संस्कार झाले. जीवनगाथेत त्यांनी पनवेलचा इतिहासही लिहिला. पण आज तिथे त्यांचे साधे स्मारकही नाही. प्रबोधनकार डॉट कॉमसाठी हा लेख लिहिला आहे, पनवेल येथे राहणारे पत्रकार अविनाश चंदने यांनी.
....................
तुम्हाला उध्दव ठाकरे माहित आहेत काय, त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही ओळखता काय, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कुणीही म्हणजे खरोखरच कु..णी..ही अगदी झोपेतही देईल. परंतु त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्याविषयी विचारल्यास आजच्या पिढीपुढे मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. तर मधल्या पिढीला ते शिवसेनाप्रमुखांचे वडील म्हणून ते ठावूक असतील. बस्स!

असे असताना प्रबोधनकारांचे पनवेलशी काय नाते होतं हे कुणालाही ठावूक असण्याची शक्यता फारच दूरची. खुद्द पनवेलकरांनाही कदाचित हे ठावूक नसावे की प्रबोधनकारांचा जन्म पनवेलमध्ये झाला आणि वयाची १८ वर्षे ते इथेच वाढले, शिकले. इथेच त्यांची आई म्हणजे जिला ते आणि संपूर्ण गाव ताई म्हणायचे तिने संस्कार केले आणि घडवले. आजी म्हणजे बय हिचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेलमधील एका झोपडीवजा घरात जन्मलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांचे पनवेलशी असलेलं नातं उलगडण्याचा हा प्रयत्न आहे.

आजोबा (उर्फ तात्या) कृष्णाजी माधव घोडपकर उर्फ ठाकरे, आजी (बय), त्यांचा मुलगा बाळा व सून (ताईः पनवेलकर वामनराव पत्की यांची कन्या काशी) आणि त्यांचे दोन पुत्र केशव व यशवंत हे सर्व पनवेलच्या प्रभूआळीत राहायचे. तात्या कोर्टातून निवृत्त झालेले पण अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांना समाजात मोठा मान होता. तर बय अडलेल्या बायांना निरपेक्ष वृत्तीने सोडवायची. अगदी त्यावेळचे डॉक्टरही अनेकदा बयची मदत घ्यायचे. त्यामुळे त्या काळी ठाकरे कुटुंबीयांना पनवेल आणि पंचक्रोशीत सर्वांकडून आदराची वागणूक मिळत असे. प्रबोधनकारांचे वडील पनवेल कोर्टात बेलिफ होते. हे संपूर्ण घरच जात, भेद, धर्म यापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारे होते. त्याचे कळत-नकळत संस्कार प्रबोधनकारांवर झाले.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचे संपूर्ण घर समाजसुधारकाचे होते. त्यांच्या घरात जात, धर्म, पंथाला थारा नव्हता. तात्या आणि बय नेहमीच सर्वांच्या मदतीला धावणारे. प्रबोधनकारांची आई शिक्षणाची कट्टर पुरस्कर्ती. मुलांनी चांगला अभ्यास करावा, त्यांच्यावर उत्तम संस्कार असावे यासाठी ती माऊली कायम त्यांच्या मागे सावलीसारखी उभी असायची. या सर्वांचा प्रभाव पडल्यामुळेच केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार बनले. याची मुळे पनवेलमध्ये होती.

आयुष्यात आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी उत्कृष्ट वठवली, अनेक प्रसंगांना ते सामोरे गेले, पोटासाठी पांढरपेढेपणा सोडून अनेक कामे केली. म्हणूनच की काय प्रबोधनकार स्वतःला 'नाटक्या' म्हणत. वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर ताईने केलेले संस्कार खूप महत्त्वाचे होते. म्हणजे ताईने त्यांच्यावर केवळ शिक्षणच बिंबवले नाही तर चांगले व्यावहारिक शिक्षणही दिले. ताई त्यांच्याकडून रोज बालबोध आणि मोडी लिहून घ्यायची. ते करताना कागदाला कुठे डाग लागला किंवा अक्षर चांगले आले नाही की गालगुच्चा किंवा कानपिळणी ठरलेली. शब्दोच्चारावर भर देण्यासाठी रोज संध्याकाळी वर्तमानपत्रे मोठयाने वाचून घेण्याचा तिचा शिरस्ता होता.

मुलांच्या अभ्यासावर ताईची करडी नजर असायची. म्हणून ती रोज रात्री त्यांच्या शाळेच्या पिशव्या तपासायची. त्यात काही आक्षेपार्ह सापडले तर सकाळी चहाच्या वेळी चांगलीच धुलाई व्हायची. याबाबत प्रबोधनकारांनी समग्र वाड्मयात दिलेला संदर्भ खूप बोलका आहे. शाळेत असताना प्रबोधनकारांना कुठली तरी लॉटरी लागली. तब्बल ७५ रुपयांची लॉटली होती ती. त्या काळी ७५ रुपये म्हणजे किमान सहा महिने घराचा खर्च सहज भागवणारा होता. परंतु एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये म्हणजे ७४ जणांचे तळतळाट. असला पैशाचा मोह काय करायचा? असे सुनावून अंग मेहनत कर, बुध्दी चालव आणि मिळेल ती चटणी-भाकर निर्धास्त खा. हा जुगारीचा छंद हवाच कशाला, या कडक शब्दांत ताईने प्रबोधनकारांना चांगलेच सुनावले. त्यानंतर आयुष्यात कधीही जुगारीच्या फंदात पडलो नाही, अशी कबुली प्रबोधनकारांनी या समग्र वाड्मयात दिली.

असेच संस्कार

संदर्भ प्रकार: